Agriculture story in marathi, forward market of agriculture commodities | Agrowon

कापूस, मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ
डाॅ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

गेल्या सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव चढले. इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळितामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील.

गेल्या सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव चढले. इतरांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, मका, सोयाबीन व गवार बीचे भाव वाढतील. साखरेचे भाव वाढत्या गळितामुळे कमी होतील. अधिक रब्बी उत्पादनाच्या अपेक्षेने गहू व हरभरा यांचे भाव उतरतील.

मागील वर्षी बहुतेक पिकांचे चांगले उत्पादन आले होते. याही वर्षी खरीप पिकांचे उत्पादन वाढलेले आहे. त्याचा परिणाम किमतींवर होऊ नये म्हणून शासनाने या सप्ताहात दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. एक म्हणजे खाद्यतेलाच्या (पामतेल व सोयातेल) आयातीवरील कर मोठ्या प्रमाणावर (६० ते १०० टक्क्यांनी) वाढवला. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील बंधने उठवण्यात आली. यामुळे तेलबिया, खाद्यतेले व कडधान्यांच्या किमती वाढाव्यात अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

मका
खरीप मक्याच्या (डिसेंबर २०१७) किमती  या सप्ताहात त्या पुन्हा ०.४ टक्क्यांनी घसरून रु. १३६५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (निझामाबाद) रु. १३५८ वर आल्या आहेत.  फेब्रुवारीमधील फ्युचर्स किमती रु. १३८० वर आल्या आहेत. हमीभाव गेल्या वर्षी रु. १३६५ होता. या वर्षी तो रु. १४२५ वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी खरीप मक्याचे उत्पादन घसरून १८.७३ दशलक्ष टनांवर होणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १९.२४ दशलक्ष टन). मागणी चांगली आहे. खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती हमीभावाच्या खाली राहण्याचा संभव आहे.

साखर
साखरेच्या (डिसेंबर २०१७) किमती १७   या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ३२७१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३७३२ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मे (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३२७१ वर आल्या आहेत. सध्या साठा पुरेसा आहे. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी भारतातील उसाचे उत्पादन वाढून ते ३३७.३ दशलक्ष टनांवर येणार आहे .

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती या सप्ताहात ३.१ टक्क्यांनी वाढून रु. २९३६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. २८६४ वर वाढल्या आहेत. मार्च २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३०८६ वर आल्या आहेत. हमीभाव (बोनससहित) गेल्या वर्षी रु. २७७५ होता. या वर्षी तो रु. ३०५० वर नेला आहे. २२ सप्टेंबर रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रथम अंदाजानुसार या वर्षी सोयाबीनचे उत्पादन घसरून १२.२ दशलक्ष टनांवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : १३.८ दशलक्ष टन).

गेल्या वर्षीचा साठा अजून शिल्लक आहे. अमेरिकेतील व जागतिक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. सोयातेलाच्या आयातीवरील कर यापूर्वी १७.५ टक्के होता, तो वाढवून ३० टक्क्यांवर नेला आहे. कच्च्या पामतेलाच्या आयातीवरील करसुद्धा १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर वाढवला आहे.  सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमती काहीशा वाढण्याची शक्यता आहे.  

हळद
हळदीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती  या सप्ताहात मात्र त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ७१६६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७३९५ वर आल्या आहेत. मे २०१८च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.८ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ७,२६२). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. निर्यात मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत किमती वाढण्याचा संभव आहे.

कापूस
 कापसाच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती  या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी वाढून रु. १८,५९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १८,१४७ वर आल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १८,५१०). प्रथम अंदाजानुसार या वर्षी कापसाचे उत्पादन घसरून ३२.३ दशलक्ष गाठींवर येणार आहे (गेल्या वर्षीचे उत्पादन : ३३.१ दशलक्ष गाठी). मागणी चांगली आहे. लांबवरचा कल वाढता आहे. मात्र, खरीप पिकाच्या पुढील काही महिन्यांतील आवकेमुळे किमती मर्यादित प्रमाणात घसरण्याचा संभव आहे.
(सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठ).

गहू     
 गव्हाच्या (डिसेंबर २०१७) किमती  या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. १७१६ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (दिल्ली) रु. १८४० वर स्थिर आहेत. फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ४ टक्क्यांनी कमी आहेत (रु. १७६६). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमीभाव (बोनससहित) रु. १७३५ आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती ऑक्टोबर महिन्यात घसरत होत्या (रु. ३९५० ते रु. ३६१३). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. ३७१९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ३७६७ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा फेब्रुवारी २०१८ मधील फ्युचर्स किमती २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ३८६९). आवक वाढती आहे. मात्र मागणीसुद्धा वाढती आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (डिसेंबर २०१७) किमती  या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी घसरून रु. ४८७७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४९१३ वर आल्या आहेत. उत्पादनवाढीच्या अपेक्षेने मार्च २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा १३.५ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ४२८३). एप्रिल डिलिवरीचा सध्याचा भाव रु. ४३५९ आहे. शासनाचा हमीभाव (बोनस सहित) रु. ४४०० आहे.

arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
रब्बी मका, हळदीच्या भावात वाढया वर्षी सर्वसाधारण पाऊस पडेल असा अंदाज भारतीय...
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करणेच अधिक...शेतीवरील संकटाला तोंड देण्यासाठी भावांतर योजना...
अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारतावर...अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ...
सोयाबीन, हरभरा, तुरीत मंदीचे ढग कायमसोयाबीन, हरभरा आणि तूर या तिन्ही पिकांमध्ये सध्या...
साखर उद्योगाला दिलासा नाहीसाखरेचे भाव गडगडल्यामुळे निर्माण झालेल्या ...
उन्हाळी 'कॅश क्रॉप'कडून अपेक्षामा गच्या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत (जून ते...
कापसाच्या किमतीत वाढीची शक्यतागेल्या सप्ताहात किमतींचा आलेख काहीसा घसरता होता....
पिवळा वाटाणा आयातीकडे व्यापाऱ्यांचा कलनवी दिल्ली ः देशात कडधान्यांचे भाव पडल्यानंतर...
साखर उद्योगासाठी सरकारने १४० कोटींची...भवानीनगर, जि. पुणे : आजमितीस साखर प्रतिक्विंटल...
मका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...
शेतीमाल दर संरक्षणासाठी शासनाच्या तीन...शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा...
दैनंदिन खर्चाची तजवीज, दरवर्षी बचत अन्...कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोची (ता. हातकणंगले)...
`मार्केट डेव्हलपमेंट`साठी एकत्रित...द्राक्षाचा चालू वर्षाचा हंगाम जवळ जवळ संपला आहे....
अक्षयतृतीयेनंतर डाळिंबात नरमाईडा ळिंबासाठी २०१७ हे वर्ष सर्वाधिक तोट्याचे होते...
कापूस, साखरेच्या भावात वाढीचा अंदाज गेल्या सप्ताहात मका, हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...
मक्याच्या फ्युचर्स भावात घटया सप्ताहात मका व हळद वगळता सर्वांचे भाव घसरले...
देशात साखर उत्पादन ८२ लाख टनांनी वाढलेकोल्हापूर: यंदाच्या हंगामात देशात महाराष्ट्रातून...
विदर्भात विस्तारतो आहे पोल्ट्री व्यवसायकडक उन्हाळ्यामुळे पोल्ट्री व्यवसाय विदर्भामध्ये...
मका, हरभरा वगळता सर्व पिकांच्या भावात...या सप्ताहात हळद वगळता सर्वांचे भाव घसरले किंवा...
साखर खरेदीचा प्रस्ताव मंजुरीच्या...कोल्हापूर : घसरत्या साखर किमती रोखण्यासाठी राज्य...