Agriculture story in marathi, forward market of agriculture commodities | Agrowon

कापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढ
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

या सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले. हळद, गवार बी व सोयाबीन यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील.
 
सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जून फ्युचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९२६) मिळेल. गवार बीचे भाव मे मध्ये २ टक्क्यांनी अधिक (रु. ४,४९०) मिळतील. कापसाचे भाव जूनमध्ये ५.५ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,५००). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

या सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले. हळद, गवार बी व सोयाबीन यांचे भाव उतरले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी यांचे भाव वाढतील.
 
सोयाबीन आत्ता स्पॉटमध्ये न विकता जून फ्युचर्समध्ये विकला तर २.४ टक्क्यांनी अधिक भाव (रु. ३,९२६) मिळेल. गवार बीचे भाव मे मध्ये २ टक्क्यांनी अधिक (रु. ४,४९०) मिळतील. कापसाचे भाव जूनमध्ये ५.५ टक्क्यांनी अधिक मिळतील (रु. २०,५००). गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (एप्रिल २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. ११४५ ते रु. ११८५ दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. १,१५९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२१३ वर आल्या आहेत. मे २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,१५२ वर आल्या आहेत. रब्बी मक्याची (एरोड) जून २०१८ च्या डिलिव्हरीची फ्युचर्स किंमत रु. १,३९३ आहे. हमी भाव रु. १,४२५ आहे. नवीन आवकेच्या अपेक्षेने किमती कमी होण्याची शक्यता आहे.

साखर
साखरेच्या (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात उतरत होत्या (रु. ३,२७२ ते रु. २,९५५). या सप्ताहात ९.२ टक्क्यांनी वाढून त्या रु. ३,३६१ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२५६ वर आल्या आहेत. पुढील वर्षी जागतिक उत्पादन व पुरवठा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जुलै (२०१८) च्या फ्युचर्स किमती रु. ३,३६१ वर आल्या आहेत. नवीन हंगामाचे उत्पादन आता सुरू झाले आहे. १९ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार या वर्षी भारतातील साखरेचे उत्पादन २४९ लाख टन होईल. (गेल्या वर्षीचे उत्पादन: २५० लाख टन). साखरेचे भाव काही प्रमाणात चढण्याची शक्यता आहे.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,१८० ते रु. ३,८४९). गेल्या सप्ताहाच्या तुलनेने या सप्ताहात त्या ०.७ टक्क्यांनी उतरून रु. ३,८०६ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती २.५ टक्क्यांनी घसरून रु. ३,८३३ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. ३,९२६ वर आल्या आहेत. हमी भाव (बोनस सहित) रु. ३,०५० आहे.
आंतरराष्ट्रीय व देशातील उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आवक पण कमी झालेली आहे. खाद्यतेल-उद्योगाची मागणी वाढत आहे. शासनाने हमी भावाने सोयाबीन जरी खरेदी करण्याची तयारी दर्शवली असली तरी या वर्षी ती वेळ येणार नाही. पुढील वर्षी सोया पेंडीच्या निर्यातीत वाढ होऊन ती २० लाख टनांवर जाईल, असा अंदाज केला गेला आहे (मागील वर्षीची निर्यात : १५ लाख टन). शासनाचे सोया पेंडीच्या निर्यातीला उत्तेजन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे पुढील काही महिने किमतीत वाढीचा कल राहण्याचा संभव आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१८) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ७,७९२ ते ७,१०४). या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. ६,९५० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०१७ वर आल्या आहेत. जुलै २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.६ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,९१६). वाढीव उत्पादनाची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी वाढती आहे. पुढील काही दिवसांत वाढत्या आवकेमुळे किमती घसरण्याची शक्यता आहे.

गहू
११ जानेवारीपासून गव्हाच्या (एप्रिल २०१८) किमती रु. १,६८६ ते रु. १,७३३ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.१ टक्क्यांनी वाढून रु. १,७८७ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,७२५ वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,७६२). पुढील वर्षाचे उत्पादन चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलपासून मर्यादित घसरण अपेक्षित आहे. शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. १,७३५ आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ४,२०६ ते रु. ४,७०८). या सप्ताहात त्या १.२ टक्क्यांनी घसरून रु. ४,४०५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,४०३ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतीपेक्षा मे २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४९०). मागणी वाढती आहे; किमतीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे.

हरभरा
जानेवारी महिन्यात हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती रु. ३,६७७ व रु. ३,८५६ च्या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.४ टक्क्यांनी वाढून रु. ३,९६३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,०४० वर आल्या आहेत. जून २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमती एवढ्याच आहेत (रु. ४,०४०). शासनाचा हमी भाव (बोनस सहित) रु. ४,४०० आहे. एप्रिल नंतर भाव घसरू नयेत यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील. आयात शुल्क त्यामुळे ३० टक्के लावण्यात आले आहे. विक्रीवरील स्पेशल मार्जिनसुद्धा वाढवले आहे. किमतीत मर्यादित चढ-उतार अपेक्षित आहेत.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१८) किमती जानेवारी महिन्यात रु. २०,२९० व रु. २१,३८० दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २०,१७० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. १९,४२९ वर आल्या आहेत. जून २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ५.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २०,५००). आंतरराष्ट्रीय मागणी कमी आहे. कपाशीचा एप्रिल २०१८ डिलीवरी भाव (एनसीईएक्स) प्रति २० किलोसाठी रु. ९४५ आहे. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com

 

 

इतर कृषिपूरक
अल्पभूधारकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी...केवळ शिक्षण आहे म्हणून व्यवसाय यशस्वी होत नाही,...
शेळीपालन सल्ला करडांचे कप्पे मुख्यतः हवेशीर, कोरडे, उबदार...
गाभण काळात खाद्यासह गोठा व्यवस्थापनाकडे...जनावरांचा गाभण काळ हा अतिशय संवेदनशील काळ असतो....
परदेश अभ्यास दाैऱ्याबद्दल...जळगाव - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्राण्यांद्वारे होणाऱ्या आजारांपासून...जनावरांपासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
बैलातील आतड्याच्या अाजारावर योग्य उपचार...उन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसांत...
चाऱ्याची पचनियता, पाैष्टिकता...उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरता असल्यामुळे जवळपास...
दुभत्या जनावरांमधील उन्हाळी कासदाहउन्हाळी कासदाह हा दुधाळ जनावरांमध्ये उद्भवणारा...
प्रतिबंधात्मक उपायातून रोखता येतो निपाह...निपाह विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने...
बैलामधील खांदेसुजीची कारणे, लक्षणे...उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरवातीला नांगरणी...
मधमाश्यांच्या आहारातील प्रोबायोटिक्स...गेल्या वीस वर्षांपासून मधमाश्यांच्या वसाहती नष्ट...
भारतीय मागूर माशांचे बिजोत्पादन...कमी संवर्धन कालावधी (सहा ते सात महिने), कमी...
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...
प्रतिबंधात्मक उपचारांनी टाळा जनावरांतील... जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघात...
देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या...
स्वच्छता, योग्य व्यवस्थापनातून टाळा...शेडमधील अस्वच्छता अाणि अनियोजित व्यवस्थापनामुळे...
पूर्वतयारीनेच करा मत्स्यबीजाचे संवर्धनमत्स्यसंवर्धनामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास...