उत्पादनवाढीतून फळे, भाजीपाला निर्यातवाढीला संधी

अाधुनिक काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामुळे फळे, भाजीपाल्याची निर्यात अजून वाढविणे शक्य अाहे.
अाधुनिक काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामुळे फळे, भाजीपाल्याची निर्यात अजून वाढविणे शक्य अाहे.

भारताला फळे अाणि भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहे. भारतातून कांदा, भेंडी, कारले, हिरवी मिरची, अळिंबी आणि बटाटे या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. तर फळांमध्ये द्राक्षे, केळी, डाळिंबाची निर्यात केली जाते. भारतात वैविध्यपूर्ण हवामानामुळे फळे आणि भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. चीननंतर फळे आणि भाजीपाला उत्पादनात भारत दुसऱ्या स्थानावर आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डानुसार, २०१४-१५ मध्ये भारतात ८६.६०२ दशलक्ष मेट्रिक टन फळे आणि १६९ .७८ दशलक्ष मेट्रिक टन भाज्यांचे उत्पादन झाले. ६.११० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर फळझाडांची तर ९.४२९ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड झाली. त्यामुळे भारताला फळे अाणि भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी प्रचंड संधी उपलब्ध आहे.

भारतातून कांदा, भेंडी, कारले , हिरवी मिरची, अळिंबी आणि बटाटे या भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते, तर फळांमध्ये द्राक्षे, केळी, डाळिंबाची निर्यात केली जाते. खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीव्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्राने घेतलेला पुढाकार, आपेडाची मदत अाणि एकात्मिक काढणीपश्‍चात तंत्रज्ञानामुळे निर्यातीला प्रात्साहन मिळत अाहे. त्यामुळे फळे, भाजीपाल्याची निर्यात अजून वाढविणे शक्य अाहे.

फळे आणि भाजीपाल्याचे मुख्य अायातदार देश यूएई, बांगलादेश, मलेशिया, नेदरलंड, श्रीलंका, नेपाळ, यूके, सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि कतार.

कांदा

  • जगभरात भारतीय कांद्याला मागणी आहे.
  • २०१६ - १७ मध्ये २४,१५,७५७.११ मेट्रिक टन (३,१०६.५० कोटी रु.) कांद्याची निर्यात झाली.    
  • प्रमुख अायातदार देश (२०१६-१७) ः बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमीरात आणि नेपाळ.
  • इतर भाज्या

  • भारतात प्रामुख्याने बटाटा, कांदा, टोमॅटो, फूलकोबी, काकडी, मटार, लसूण आणि भेंडी या भाज्यांचे उत्पादन होते.  
  • वर्ष २०१४-१५ मध्ये भाजीपाला उत्पादनाच्या लागवडीखालील क्षेत्र ९४ हजार हेक्टर होते आणि १६९ .४८ दशलक्ष टन उत्पादन झाले.
  • कांद्याच्या तुलनेत जगात १०,०२,३९६.८७ मेट्रिक (२,८१५.३८ कोटी रु.) ताजा भाजीपाला निर्यात झाला.  
  • प्रमुख अायातदार देश (२०१६-१७) ः  संयुक्त अरब अमिरात, पाकिस्तान, नेपाळ, युनायटेड किंगडम आणि कतार.
  • आंबा   

  • आंबा उत्पादक राज्यांमध्ये प्रमुख आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात आणि तमिळनाडू आहे. आंब्याचे उत्पादन २३.४७ टक्के आणि उच्चतम उत्पादनक्षमतेसह उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे.
  • भारत जगातील प्रमुख आंबा निर्यातदार देश आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये ५३,१७७.२६ मेट्रिक टन (४४५.५५ कोटी रु.) ताज्या आंब्याची निर्यात झाली.  
  • प्रमुख अायातदार देश (२०१६-१७)ः संयुक्त अरब अमीरात, युनायटेड किंगडम, सौदी अरेबिया, कतार आणि कुवैत.
  • द्राक्ष

  • महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांसह उत्तर-पश्चिम क्षेत्रामध्ये द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
  • २०१६-१७ मध्ये २,३२,९४०.७६ मेट्रिक टन (२०८८.३५ कोटी रु.) द्राक्षाची निर्यात करण्यात अाली.  
  • प्रमुख अायातदार देश (२०१६-१७)ः नेदरलॅंड, युनायटेड किंगडम, रशिया, संयुक्त अरब अमीरात आणि जर्मनी.
  • (संदर्भ ः अपेडा)

    संपर्क ः बालाजी रुद्रवार, ९०२८६२३६६८. (अन्न व्यापार व व्यवसाय व्यवस्थापन विभाग, के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com