Agriculture story in marathi, fruit crop advisary | Agrowon

फळबाग सल्ला
डॉ. विजय अमृतसागर, डाॅ. मंजूनाथ पाटील
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

 बोर :
    फळाची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.

आवळा :
    जमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
    फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ते २ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.

 बोर :
    फळाची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.

आवळा :
    जमिनीमध्ये वाफसा स्थिती टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा आच्छादन म्हणून वापर करावा.
    फळांची गुणवत्ता व आकारमान वाढण्यासाठी ०.५ टक्के फेरस सल्फेट (५ ग्रॅम प्रतिलिटर) किंवा ०.१ टक्के (१ ते २ ग्रॅम प्रतिलिटर) चिलेटेड लोहची फवारणी करावी.

पीक संरक्षण :
पेरू :
कीड ः खवले कीड, फुलकिडे, पांढरी माशी, खोडात जाळी करणारी अळी, सूत्रकृमी
रोग ः फळसड, फांदीमर
१. फळसड ः
लक्षणे : फळाच्या देठापासून पांढऱ्या बुरशीची वाढ होते. फळाच्या वाढीबरोबर बुरशीचीही वाढ होते.
नुकसान ः फळांच्या प्रादुर्भावग्रस्त भाग आतून मऊ होतो. फळगळ होते.

२. फांदीमर ः
लक्षणे : बुरशीने फांदी व खोडावरील भागाचे नुकसान केल्यामुळे त्या ठिकाणी विविध आकाराचे चट्टे दिसून येतात.
नुकसान : फांदीतील उतींची मर होऊन फांदीमर होते. फळांवरही देठापाशी तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅंकोझेब २ ग्रॅम  

कीड  
१. मिलीबग :
लक्षणे : पाने, फुले व फळे यांच्यामधून रसशोषण करतात.
नुकसान : प्रादुर्भावग्रस्त फळांचा वेडावाकडा होऊन दर्जा खालावतो. इतर कीड-रोगांना ती सहज बळी पडतात.

२. खवले कीड :
लक्षणे : किडीच्या रसशोषणामुळे पाने व खोडावर काळे डाग पडलेले दिसतात. झाडावर काळी बुरशी वाढलेली दिसते.
नुकसान : ही कीड पाने, खोड व फांद्या यांना चिकटून त्यातून रसशोषण करते. फांद्या कमकुवत होऊन झाडांची वाढ खुंटते.

३. फुलकिडे :
लक्षणे : पानांवर, फळांवर भुरक्या रंगांचे ओरखडे पडलेले दिसतात.
नुकसान : पाने, फळे यांच्यावर ओरखडे करून त्यातून रस शोषण करतात. ही कीड विषाणूजन्य रोगाच्या प्रसारास कारणीभूत ठरते.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
क्‍लोरपायरीफॉस - १.५ मि.लि. किंवा
डायमिथोएट - १.५
 

बोर 
रोग ः  भुरी
लक्षणे : नवीन पालवीवर पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. फळांची वाढ पूर्ण न होता ती आकुंचित राहतात.
नुकसान : मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन फळांचीही मोठ्या प्रमाणात गळ होते.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम किंवा
मँकोझेब २ ग्रॅम किंवा
डिनोकॅप ०.५ मि.लि. (५ मि.लि. प्रति १० लिटर)

आवळा ः
रोग  ः रिंग रस्ट ब्ल्यू गोल्ड आणि नेक्रॉसिस
१. रिंग रस्ट ब्ल्यू गोल्ड :
लक्षणे : पानांवर तांबड्या रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.
नुकसान : प्रादुर्भाव वाढल्यानंतर फळांवरही ठिपके दिसून येतात. साधारणपणे १०-२० मि.मी. व्यासाचे गोलाकार ठिपके पडून फळांचा दर्जा खालावतो.    

२. नेक्रॉसिस :
लक्षणे : फळांवर गोलाकार ठिपके पडून ठिपक्याच्या आतील लालसर पडण्यास सुरवात होते.
नुकसान : फळ काळे पडते. घट्ट होऊन आतील भाग लिबलिबित होतो.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
मँकोझेब २.५ ग्रॅम  

कीड ः  साल खाणारी अळी, मावा
१. साल खाणारी अळी :
लक्षणे : फांद्या व खोड यांच्यावर उपजीविका करते. विशेषत: दुर्लक्षित बागेत ही समस्या जाणवते.
नुकसान : फांद्या ठिसूळ होऊन झाडांची उत्पादन क्षमता घटते.

२. मावा :
लक्षणे : पाने, फळांतील रसशोषण करतात.
नुकसान : झाडांची उत्पादन क्षमता व फळांचा दर्जा घटतो.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर
डेल्टामेथ्रीन १.५ मि.लि.

संपर्क ः डॉ. विजय अमृतसागर, ९४२०७५९२८६ (विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर)
 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही...कोल्हापूर : उर्वरित एफआरपीबाबत साखरेची मागणी...
उसाला प्रतिटन २०० ते २२५ अनुदान मिळणार...नवी दिल्ली : साखर कारखान्यांन्या साखरेच्या...
संत्रा, मोसंबी नुकसानीचा अहवाल द्या ः...नागपूर ः संत्रा, मोसंबी पिकांचा बहुवार्षिक पिकात...
शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर...सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
साखरेच्या विक्री दरात क्विंटलला २००...नवी दिल्ली : साखर विक्रीचा दर २९०० वरून ३१००...
काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'...श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात "...
एक रुपयाची लाच घेतल्यास भ्रष्ट...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण विभागात...
सांगलीत दुष्काळाच्या तीव्रतेत वाढसांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
शेती-पाणी धोरणात हवा अामूलाग्र बदलयंदा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यातच अभूतपूर्व ‘...
फूल गुलाब का...व्हॅ लेंटाइन डे हा फूल उत्पादक तसेच...
`पॉलिहाउस, शेडनेटधारकांना कर्जमुक्ती...नगर : सरकारची धरसोडीची धोरणे, दुष्काळ,...