agriculture story in marathi, fruit fly infestation in guava | Agrowon

पेरू बागेत फळमाशीचा प्रादुर्भाव
डॉ. धीरज कदम, विवेक सवडे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत असून, बागेमध्ये फळमाशींचा प्रादुर्भाव वाढत आहे. फळमाशींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फळमाशी (फ्रूटफ्लाय) ही जगभरातील प्रमुख कीड असून, तिच्या सुमारे ४ हजार प्रजाती आहेत. त्यातील १० टक्के प्रजाती पिकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. भारतात सुमारे २०० प्रजाती असून, त्यातील ५ ते ६ प्रजाती पिकांसाठी थेट आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहेत.

सध्या पेरू बागा फळधारणेच्या व काढणीच्या अवस्थेत असून, बागेमध्ये फळमाशींचा प्रादुर्भाव वाढत आहे. फळमाशींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करणे अत्यावश्यक आहे. फळमाशी (फ्रूटफ्लाय) ही जगभरातील प्रमुख कीड असून, तिच्या सुमारे ४ हजार प्रजाती आहेत. त्यातील १० टक्के प्रजाती पिकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. भारतात सुमारे २०० प्रजाती असून, त्यातील ५ ते ६ प्रजाती पिकांसाठी थेट आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पेरू बागेत फळमाशीच्या बॅक्‍ट्रोसेरा प्रजातीचा २० ते ४५ टक्क्यांपर्यंत प्रादुर्भाव दिसत आहे.

भारतात आढळणाऱ्या महत्त्वाच्या प्रजाती 

 • बॅक्‍ट्रोसेरा डॉरसॅलिस, बॅक्‍ट्रोसेरा झोनाटा अणि बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा.
 • प्रमुख पिके - प्रामुख्याने पेरू, आंबा, सीताफळ.
 • पोषक पिके : पेरू, बोर, आंबा, सीताफळ, वेलवर्गीय भाज्या इ.

फळमाशीची ओळख व जीवनचक्र 

 • फळमाशी पिवळसर सोनेरी, घरगुती माशीपेक्षा थोडी मोठी असते.
 • मादी फळाच्या सालीखाली १०० ते १२० अंडी देते.
 • अंडी घातल्यानंतर त्यातून २ ते ३ दिवसांत पांढऱ्या रंगाच्या आणि डोक्‍याकडे निमुळत्या अशा अळ्या बाहेर येतात. त्या फळाच्या आतील गरावर उपजीविका करतात. अळी अवस्था सुमारे ११ ते १२ दिवसांची असून, ती फळामध्येच पूर्ण होते.
 • पिकलेली फळे अळ्यांसह जमिनीवर पडल्यानंतर अळ्या जमिनीमध्ये कोषावस्थेत जातात. कोष अवस्था ८ ते १० दिवसांची असते.
 • एका वर्षात साधारणत: फळमाशीच्या ८ ते १० पिढ्या पूर्ण होतात.

प्रदुर्भावाचा प्रकार 
अंडी घातलेली जागा तांबूस तपकिरी पडते.
अळ्या फळातील गरावर उपजीविका करत असल्याने फळे सडून गळून पडतात. काही फळे बाहेरून चांगली दिसली तरी आतून खराब व कुजलेली असतात.

व्यवस्थापन 

 • आर्थिक नुकसानीची पातळी - ५ टक्क्यांपेक्षा अधिक फळे खराब होऊन गळ होणे.
 • फळमाशीग्रस्त, बागेत पडलेली फळे यातून फळमाशीची उत्पत्ती वाढते. ती टाळण्यासाठी फळे गोळा करून नष्ट करावीत.
 • बॅक्‍ट्रोसेरा डॉरसॅलिस फळमाशीची कोषावस्था जमिनीत २ ते ३ सेंटिमीटर खोलीवर असते. झाडाखालील माती हलवून किंवा निंदून घ्यावी. या मातीमध्ये शिफारशीत दाणेदार कीटकनाशक मिसळावे.
 • फळे झाडावर पिकलेल्या अवस्थेत असताना झाडाखालची माती खुरप्याने २ ते ३ सेंटिमीटर उकरून त्यावर क्लोरोपायरीफॉस २ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे तयार केलेले द्रावण माती पूर्णपणे ओली होईपर्यंत फवारावे. याचा फायदा होत असल्याचे आमच्या प्रयोगात आढळले आहे.
 • अळी अवस्था फळाच्या आत असल्याने फवारणीद्वारे कीटकनाशक अळीपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे नियंत्रणासाठी फवारणीऐवजी सापळ्यांचा व विषारी आमिषाचा वापर करणे हा पर्यावरणपूरक पर्याय ठरतो.

अ) रक्षक सापळे 
या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवलेला असतो. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्‍या सापळ्यामध्ये आकर्षित होतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात.
प्रमाण : हेक्‍टरी २० ते २५ सापळे - पिकाच्या उंचीप्रमाणे ४ ते ५ फूट अथवा झाडावर टांगून ठेवावेत.
काळजी ः १८ ते २० दिवसांनी मिथाईल युजेनॉलचा बोळा बदलावा. सापळ्यातील मेलेल्या माश्‍या काढून सापळे स्वच्छ ठेवावेत.
ब) विषारी आमिष 
केवळ द्रव पदार्थ खाण्यायोग्य असे फळमाशीच्या तोंडाचे अवयव असतात. त्यासाठी योग्य ते विषारी आमिष तयार करावे. अमिष तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच तयार करावेत.
 
डॉ. धीरज कदम (सहयोगी प्राध्यापक ), ९४२१६२१९१०
विवेक सवडे (आचार्य पदवी विद्यार्थी), ९६७३११३३८३
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

 

इतर फळबाग
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...
द्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...
केसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने...सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत...
फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्यासध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम...
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म...द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू...
द्राक्ष : नवीन वाढ करण्यासाठी आवश्यक...द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या...