Agriculture story in marathi, fruitdrop in sweet orange | Agrowon

रोगामुळे होणारी मोसंबीतील फळगळ
डॉ. एम. बी. पाटील
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

वातावरणातील बदलामुळे मोसंबीमध्ये फळगळ होते, शिवाय काही बुरशीजन्य रोगामुळेही मोसंबीमध्ये फळगळ दिसून येते. पावसाची संततधार व त्यानंतर कोरडे हवामान यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत असून, त्यानुसार उपाययोजना कराव्यात.

रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारी फळगळ :
यंदा काही दिवस पावसाची संततधार व त्यानंतर कोरडे हवामान असे वातावरण आहे. त्यामुळे फळांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कोलेटोट्रीकम व फायटोप्थोरा या बुरशींचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होत आहे.

वातावरणातील बदलामुळे मोसंबीमध्ये फळगळ होते, शिवाय काही बुरशीजन्य रोगामुळेही मोसंबीमध्ये फळगळ दिसून येते. पावसाची संततधार व त्यानंतर कोरडे हवामान यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होत असून, त्यानुसार उपाययोजना कराव्यात.

रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारी फळगळ :
यंदा काही दिवस पावसाची संततधार व त्यानंतर कोरडे हवामान असे वातावरण आहे. त्यामुळे फळांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. कोलेटोट्रीकम व फायटोप्थोरा या बुरशींचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होत आहे.

कोलेटोट्रिकम बुरशीमुळे होणारे नुकसान :
फळांचे देठ पिवळे पडतात. त्यानंतर देठाजवळ काळा डाग पडतो. प्रादुर्भाव वाढल्यामुळे फळगळ होते.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
कार्बेन्डाझिम - १.५ ग्रॅम

फायटोप्थोरा बुरशीमुळे होणारे नुकसान :
मोसंबीच्या खालील बाजूची फळे अगोदर सडण्यास सुरवात होते. त्यानंतर वरील भागातील फळे सडून फळगळ होते.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
मेटॅलॅक्‍झिल + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
टीप : पंधरा दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.

अंबिया बहरातील फळगळीच्या अवस्था :
    प्राथमिक अवस्था : फळधारणा झाल्यानंतर त्वरित ही फळगळ होते. नैसर्गिकरित्या जास्त फुले येऊन फळधारणा झाल्यामुळे ही फळगळ होते. ही फळगळ अपरिहार्य असून, झाडाच्या आरोग्यासाठी फायद्याची असते.
    दुसरी अवस्था : ही फळगळ मुख्यतः उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे होते. उष्ण व कोरड्या हवामानात या फळगळीचे प्रमाण जास्त असल्याने तिला उन्हाळी फळगळ म्हणतात.
    तिसरी अवस्था : या अवस्थेमध्ये पूर्ण वाढलेल्या परंतु अपरिपक्व फळांची गळ होते. ही फळगळ आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असते. तोडणीपूर्वीची फळगळ असेही तिला म्हणतात.

संपर्क :  डॉ. एम. बी. पाटील, ९४२२८७३४१७
(मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर)

 

 

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...