Agriculture story in Marathi, Geographical indication of bhalia wheat | Agrowon

‘भालीया’ गहू पोचला जागतिक बाजारपेठेत
गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला गुजरातमधील भालीया गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा भारतामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेला एकमेव गहू आहे. भालीया हा गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा कसा? आणि का? वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आजच्या भागात जाणून घेऊया.

भौगोलिक मानांकन (जीआय) मिळालेला गुजरातमधील भालीया गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा भारतामध्ये भौगोलिक मानांकन मिळालेला एकमेव गहू आहे. भालीया हा गहू इतर राज्यांत उत्पादित होणाऱ्या गव्हापेक्षा कसा? आणि का? वैशिष्ट्यपूर्ण आहे हे आजच्या भागात जाणून घेऊया.

जगातील सर्व प्रमुख राष्ट्रामध्ये गव्हाचे पीक घेतले जाते. युरोप हा गव्हाच्या उत्पादनात क्रमांक एकवर तर चीन क्रमांक दोनवर आहे. भारताचा जागतिक क्रमवारीत गव्हाच्या उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो. भारतात कुठेही हॉटेलमध्ये जाणाऱ्या माणसांना पंजाबी खाद्य जेवणासाठी आणि दक्षिणी खाद्य हे न्याहारीसाठी हवे असते असा निष्कर्ष काही सर्वेक्षण करणाऱ्या संस्थानी मांडला आहे.
ग्राहकांकडून प्रामुख्याने गव्हाच्या  रोटीला मागणी असते. गहू हे रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे महत्त्वपूर्ण तृणधान्य वर्गातील पीक आहे. भारतामध्ये गव्हाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाती आहेत. भारतामध्ये गव्हाचे पीक उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने घेतले जाते.  

जीअायमुळे वाढली मागणी

 • सध्या भारतामध्ये गव्हापासून वेगवेगळे पदार्थ बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांना चांगल्या प्रतीच्या गव्हाची आवश्यकता असते. अशातच भालीया गव्हाला जीआय मानांकन मिळाल्यामुळे या गव्हाची मागणी वाढली आहे. महाराष्ट्रातसुद्धा या गव्हाची मागणी वाढली आहे.
 • महाराष्ट्रातही काही भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने गव्हाचे पीक घेतले जाते. महाराष्ट्रात पिकणाऱ्या गव्हाला गुजरातच्या भालीया गव्हाप्रमाणे जीआय मानांकन मिळू शकते. त्यामुळे त्यालाही जागतिक बाजारपेठ मिळू शकते.  
 • आनंद कृषी विद्यापीठाने या भालीया गव्हाच्या जीआय मानांकन मिळण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या संस्थेने १७ डिसेंबर २००९ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे मानांकनासाठी अर्ज सादर केला होता.
 • साधारणपणे दीड वर्षानंतर १४ फेब्रुवारी २०११ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे.
 • जीआय मिळाल्यामुळे गुजरातमधील भालीया हा गहू जागतिक बाजारपेठांमध्ये पोचला आहे. यामुळे येथील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भागात गव्हावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पूरक वातावरण

 • गुजरातमध्ये गहू या पिकाची भाल प्रदेशात (भाल हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ माथा असा होतो.) जास्त प्रमाणात पेरणी केली जाते.
 • या प्रदेशात गव्हाच्या पिकाची योग्य वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक आणि वातावरण आहे.
 • भावनगर, अहमदाबाद आणि आनंद या जिल्ह्यांत असणाऱ्या समतोल तसेच दगड व गारगोटी नसणाऱ्या प्रदेशाला भाल प्रदेश असे म्हणतात.
 • या तीन जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्यामुळे या प्रदेशातील हवा, पाणी, माती आणि तापमान यामुळे येथे पिकणारा गहू इतर गव्हापेक्षा अद्वितीय आहे.
 • भाल प्रदेशामध्ये भालीया गव्हाचे उत्पादन स्वतंत्रपूर्व काळापासून घेतले जाते.  
 • गव्हामध्ये प्रोटिन, कॅरोटीन हे घटक अधिक प्रमाणात आहेत. तसेच ग्लूटीनचे प्रमाण मर्यादित आहे. आकार एकसारखा अाणि रंग करडा पिवळा आहे. या गव्हाला जास्त पाण्याची गरज नसते.

गव्हाचा उपयोग

 • या गव्हाचा उपयोग पिझ्झा, नूडल्स, बटर तसेच येथील स्थानिक पोळी बनविण्यासाठी   करतात.
 • या गव्हाची पोळी इतर गव्हाच्या पोळीपेक्षा स्वादिष्ट आणि पौष्टिक असते. असे अर्जदारांनी सिद्ध केले आहे.
 • या गव्हापासून शिरा, चुरमा असे अनेक गोड पदार्थ बनविले जातात.  
 • गुजरातमध्ये प्रचलित असलेले थूली (जदारीयू) हे देशी उत्पादन बनविले जाते.  
 • GW-1 हे वाण गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे.

संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
सप्ताहात कापूस, सोयाबीन, गव्हाच्या...या सप्ताहात कापूस, सोयाबीन व गहू यांचे भाव चढले....
अंडी, ब्रॉयलर्सच्या बाजारात सातत्यपूर्ण...पुणे : मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
अल्पभूधारक भलमे यांची 108 एकर शेती !चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव (धरण) (ता. वरोरा)...
कापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढया सप्ताहात सोयाबीन व गवार बीचे भाव मोठ्या...
क्रॅकिंग टाळण्यासह भुरी नियंत्रणाकडे...सध्या सर्वच द्राक्ष विभागांमध्ये थंडीची लाट आलेली...
तेलंगणमध्ये मिरची उत्पादन घटणारहैदराबाद, तेलंगण : गेल्या वर्षी मिरचीच्या जास्त...
गहू, हरभऱ्याच्या भावावर ठेवा लक्षया सप्ताहात रब्बी मका, गवार बी व हरभरा वगळता...
द्राक्ष बाजारात गुणवत्तेचा मुद्दा कळीचाराज्यातील द्राक्ष उत्पादक पट्ट्यात यंदा ३० ते ३५...
कापूस निर्यातीत १५ टक्के वाढकापसाच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे चालू हंगामात (...
'कृषी स्टार्टअप' कंपन्यांसाठी महास्पर्धादेशातील शेती क्षेत्रापुढील प्रमुख १२ समस्यांवर...
कांद्यातील तेजी-मंदीचे सूत्रकांदा बाजाराच्या दृष्टीने नव्या वर्षाची सुरवात...
खाद्यतेलाच्या बदल्यात साखर निर्यातीचा...इंडोनेशियाकडून खाद्यतेल विकत घेण्याच्या बदल्यात...
खासगी कंपनीप्रमाणे शेतीचे नियोजनएखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर,...
मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावांत वाढया सप्ताहात खरीप मका व हरभरा वगळता सर्वच...
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी...कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित...
जागतिक कापूस उत्पादनात होणार घट मुंबई ः भारत, आॅस्ट्रेलिया, पाकिस्तानच्या कापूस...
नाताळ, नववर्षाच्या उत्सवी माहोलामुळे...नाताळ ते ३१ डिसेंबर या वर्षातील सर्वाधिक खपाच्या...
अकोटमध्ये कापसाचे दर पोचले ५६६० रुपयांवरअकोला : या अाठवड्यात कापसाच्या दरात सातत्याने...
अधिक उत्पादनामुळे गहू, हरभरा फ्युचर्स...या सप्ताहात खरीप मका व साखर वगळता सर्वच...
साखर उत्पादन यंदा तेवीस टक्क्यांनी...नवी दिल्ली ः देशात यंदा (२०१७-१८) सुमारे २४९ लाख...