जीआय मानांकन मिळविण्यात मोगरा अाघाडीवर

भारतातील चार ठिकाणच्या मोगऱ्याला जीआय मानांकन देण्यात आले आहे.
भारतातील चार ठिकाणच्या मोगऱ्याला जीआय मानांकन देण्यात आले आहे.

जीआय मानांकन मिळविण्यात मोगरा अाघाडीवर भारतामध्ये विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फूलशेती केली जाते. तमिळनाडू व कर्नाटकमधील मदुराई, म्हैसूर, उडपी आणि हदगली या मोगऱ्याच्या चार वेगवेगळ्या जातींना भौगोलिक मानांकन म्हणजे जीआय मिळालेले आहे.

भारतामध्ये सध्या भौगोलिक मानांकन हा विषय खूप चर्चिला जातोय. पश्चिम बंगालचा रसगुल्ला आता जीआय मानांकित झाला आहे. भारतात इतर उत्पादनांबरोबर विविध फुलांनासुद्धा भौगोलिक मानांकन मिळालेले आहे. त्यामध्ये मोगरा भौगोलिक मानांकन मिळविण्यात आघाडीवर आहे.

फुलासंगे मातीस गंध लागे अशी म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे. पण जीआय मानांकनामुळे भारतातील अनेक फुलांना मातीमुळे सुगंध प्राप्त झाला आहे. मातीतले गुणधर्म जसे फळे व भाजीपाल्याना मिळतात आणि त्यांना योग्य बाजारपेठ व मोबदला मिळवून देतात, मग तो दार्जिलिंगचा चहा असो किवा महाबळेश्वर स्ट्रोबेरी, अशाच प्रकारे काही विशिष्ट ठिकाणी असणाऱ्या मातीमुळे फुलांना विशिष्ट प्रकारचा सुगंध प्राप्त होत असतो. त्यामुळे इतर फुलांपेक्षा वेगळे विशिष्टपूर्ण गुणधर्म असणऱ्या फुलांना जीआय मानांकन प्राप्त होऊ शकते.

भारतात फुलाच्या वेगवेगळ्या चार जातींना त्याच्या वेगवेगळ्या मनमोहक सुगंधासाठी जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्या फुलाचे नाव सर्वांना प्रचलित असणारे जास्मिन.! आपल्याकडे आपण त्याला मोगरा, जाई, जुई, चमेली, साईली, नेवाळी अशा अनेक प्रकारांत ओळखले जाते. महिलांना मिळाला हक्काचा रोजगार

  • मदुराई येथील डोंगर भागातून एक कायम स्वरूपी पाण्याचा प्रवाह वाहत असतो. त्या प्रवाहाला दक्षिण भारतातील प्रतिगंगा असे समजले जाते.
  • भारतातील प्रमुख अय्यपा मंदिरापैकी एक मंदिर या प्रवाहाच्या काटावर  वसले आहे. या सतत वाहणाऱ्या पाण्यावर येणारा मोगरा सुगंध देणार नाही तर नवलच.
  • विविधतेने नटलेल्या भारत देशात इतिहास, शास्त्र आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अगणित वास्तू आणि वस्तू याचे उत्तम उदाहरण मदुराई आहे.
  • मदुराई मंदिर वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे, तर मदुराई पेंटिंग आणि मदुराई मोगरा फूल हे वस्तुकल्प आहे. या दोघांनाही जीआय मिळाला आहे.    
  • जीआयमुळे या फुलांच्या माळा करून विकणाऱ्या अनेक महिलांना हक्काचा रोजगार आणि मोबदला मिळायला लागला आहे. शिवाय मदुराई मंदिराला शेकडो परकी पर्यटक भेट देतात, तेसुद्धा मदुराईच्या जास्मिनचा गंध सातासमुद्रापलीकडे घेऊन जातील.
  • मदुराईच्या जास्मिन फुलाचा गंध आता कायमस्वरूपी अंगाला लावणाऱ्या साबणापासून तोंडाला लावणाऱ्या पावडरपर्यंत पोचला आहे.
  • मनमोहक सुगंधाचा मदुराई मोगरा

  • मोगरा आपल्या देशात शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहे आणि आपल्याला त्यांच्या मनमोहक सुगंधाचा आनंद देत आहे. पण मोगऱ्याची फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्याला जर टिकवायचे असेल, तर त्याला त्याच्या मेहनतीचे आणि परंपरा टिकवण्याचा योग्य मोबदला द्यायला हवा. याच विचाराने भारतातील चार ठिकाणच्या मोगऱ्याला जीआय मानांकन देण्यात आले आहे.
  • मदुराई हे शेकडो वर्षापूर्वीच्या मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. मदुराई येथे मदुर मीनाक्षीचे मंदिर आहे. मीनाक्षीदेवीच्या सजावटीत हमखास वापरला जाणारा आणि नंतर तमिळनाडूच्या घराघरांत आपला सुगंध दरवळवणाऱ्या जास्मिनसाठी जीआयचा अभ्यास करण्यात आला.
  • हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर असे लक्षात आले, की मंदिराचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या मदुराई या भागात उत्पादित होणारा मोगरा अप्रतिम गुणवत्तेचा आहे. येथील मोगऱ्याचे उत्पादन घेणारे शेतकरी यांनी येथील मोगऱ्याचे पीक टिकवण्यासाठी जीआय मानांकन मिळावे म्हणून मदुराई माळी शेतकरी संघटनेने २०११ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला.
  • २०१३ मध्ये या मोगऱ्याला जीआय मानांकन मिळाले.
  • संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com