जागतिक मानांकनामुळे मंगळवेढ्याच्या ज्वारीला स्वतंत्र अोळख

 जीअाय मानांकन
जीअाय मानांकन

प्रसिद्ध आहार विशेषज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या मार्गदर्शन सत्रांत अनेक वेळा ज्वारीचा वापर आहारात सातत्याने करा, असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे याच ज्वारीने म्हणजे मंगळवेढा ज्वारीने जीआयदेखील प्राप्त केला आहे. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांविषयी या भागात आपण जाणून घेणार आहोत.

भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेला व ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेला मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यातील तालुका आहे. ही भूमी दामाजीपंत, चोखामेळा, कान्होपात्रा यांसारख्या संतांनी पावन झाली आहे. हा तालुका सोलापूरपासून सुमारे ५४ किलोमीटर; तर पंढरपूर (दक्षिण काशी)पासून केवळ २३ किलोमीटर अंतरावर आहे.

मंगळवेढा हा कायमच्या दुष्काळी पट्ट्यातील भाग आहे. ज्वारी हे इथले कोरडवाहू पीक आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर ते घेतले जाते. येथील सरासरी पर्जन्यमान ५१९.८ मिमी आहे. येथील हवामान उष्ण व कोरडे असते. या भागात ४० ते ५० फूट खोली असलेली काळी सुपीक जमीन आहे. हे हवामानच मंगळवेढा भागाचे खास वैशिष्ट्य आहे.

उत्पादनास मोठा वाव मंगळवेढ्याच्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. साधारण १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात सुमारे एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी सध्या ४० ते ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे पीक घेतले जाते. हलक्या जमिनीत सरासरी एकरी ५ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीत १५ ते २० आणि चांगल्या जमिनीत २५ ते ३० क्विंटल ज्वारीचे उत्पादन होऊ शकते. अर्थात पाणी, हवामान व शेतकऱ्याने केलेले पीक व्यवस्थापन यावर ते अवलंबून असते. येथील ज्वारी मालदांडी नावाने प्रसिद्ध आहे.

चाराही पोषक माल देणारी दांडी असाही अर्थ लावण्यात येतो. या ज्वारीच्या दांडीचा उपयोग दुभत्या गायींसाठी चारा म्हणूनही केला जातो. या दांडीमध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात आहेत. नुकतेच सातारा येथील एका दूध उत्पादक संघाने दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांसाठी पोषक अशा या मंगळवेढा ज्वारीच्या दांड्यांनी भरलेले ट्रक मागवून घेतले. त्याचा गायींच्या दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

मंगळवेढा ज्वारीचे वैशिष्ट्य इथल्या मातीत येणाऱ्या ज्वारीचे प्रमुख वैशिष्ट्य असे आहे, की कमी तापमानाला ती प्रतिकारक्षम आहे. दाणा टपोरा असून, त्याची व चाऱ्याची प्रत उत्तम आहे. या ज्वारीची भाकरी चविष्ट असते. तिच्यातग ग्लुटेनचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाकरी मऊ होते. या ज्वारीमध्ये खोडमाशी व मावा यांसारख्या किडीवर तसेच खडखड्या व तांबेरा यांसारख्या रोगांवर मात करण्याचा उपजत गुण आहे. त्यामुळे या ज्वारीवर कीडनाशकांची फवारणी करण्याची गरज फारशी पडत नाही. ज्वारीला आयुर्वेदातदेखील खूप महत्त्व असल्याने मधुमेह असलेल्या रुग्णांना या ज्वारीचा मोठा फायदा होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सज्ज कोळश्याच्या खाणीत जसा हिरा दडलेला असतो तसा मंगळवेढ्याच्या काळ्या मातीतला मालदांडी ज्वारीरूपी हिरा जीआयच्या रूपाने जगासमोर आला आहे. ‘जीआय’मुळे येथील ज्वारीला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तसेच गुणवत्तेची खात्री आणि प्रतिष्ठा मिळाल्याने ही ज्वारी जगभरातील बाजारपेठेत पोचण्यासाठी सज्ज झाली आहे.

आपली स्वादिष्ट आणि नैसर्गिक गुणधर्म प्राप्त मंगळवेढा ज्वारी सातासमुद्रापार ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले पॅकिंग आणि ब्रँडिंग करणे आवश्यक ठरेल. मंगळवेढा येथील मंगळवेढा ज्वारी विकास संघ व प्रशांत काटे यांनी या ज्वारीला प्रोत्साहन देण्याचे विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांतून या ज्वारीला जीआय मिळण्यात यश आले.

शेतकऱ्यांनो संधी घ्या अजूनही अनेक शेतकऱ्यांना जीआय मानांकन म्हणजे काय, त्याचे फायदे काय, त्याचा वापर कसा करायचा, याबाबत पुरेशी माहिती नाही. त्यासाठी अधिक प्रमाणात जीआय विषयातील कार्यशाळा होणे तसेच सर्वांनी एकत्र येऊन वैयक्तिक नावाने आपल्या शेतमालाच्या जीआयची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. या संघाने जीआयचे प्रमाणपत्र केवळ संघापुरते ठेवले नाही. तर शेतकऱ्यांच्या नावाने जीआय नोंदणी करून देण्यास सुरवात केली.

आत्तापर्यंत मंगळवेढा भागातील ३० शेतकऱ्यांनी आपल्या ज्वारीला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्यासाठी व्ययक्तिक नावाने ‘जीआय रजिस्ट्री’त नोंद करून घेतली आहे. त्याचे जीआय प्रमाणपत्र केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. येथील शेतकऱ्यांनी नेहमीचा दुष्काळ ही अडचण न मानता ती एक संधी मानली. आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मोठे पाऊल उचलले.

  सर्व ज्वारी उत्पादकांचे हित या संघाने जीआयचे प्रमाणपत्र केवळ संघापुरते ठेवले नाही. तर शेतकऱ्यांच्या नावाने जीआय नोंदणी करून देण्यास सुरवात केली. आत्तापर्यंत मंगळवेढा भागातील ३० शेतकऱ्यांनी आपल्या ज्वारीला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्यासाठी व्ययक्तिक नावाने ‘जीआय रजिस्ट्री’त नोंद करून घेतली आहे. त्याचे जीआय प्रमाणपत्र केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे. येथील शेतकऱ्यांनी नेहमीचा दुष्काळ ही अडचण न मानता ती एक संधी मानली. आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी मोठे पाऊल उचलले.

जीआय मानांकन अशा या विविधतेने नटलेल्या ज्वारीला २०१६ मध्ये जीआय (भौगोलिक मानांकन) मिळाले. ज्वारीचे कोठार म्हणून मंगळवेढ्याची अोळख मधल्या काळात थोडी पुसट झाली होती. बदलती बाजारपेठ आणि सातत्याने बदलत गेलेल्या पीक पद्धतीमुळे ही अोळख मागे पडली होती. जीआयच्या निमित्ताने ती पुन्हा जगासमोर आली अाहे.

कायम दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या परिसरातील बळिराजालादेखील त्या माध्यमातून आता चांगले दिवस येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्वारीला समाधानकारक भाव मिळत नसल्याने दुसऱ्या खर्चिक पिकांकडे वळून कर्जबाजारी बनू लागलेल्या इथल्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या मूळ पिकाकडे परतण्याची संधी मिळाली अाहे. यातूनच पुन्हा ज्वारीची मोठी बाजारपेठ म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख ठळक होणार आहे.

संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com