जागतिक अन्नपूर्णा प्रदर्शनात झळकणार महाराष्ट्रातील उत्पादने

जी अायमुळेच वेंगुर्ल्याचे काजू अाणि सांगलीच्या बेदाण्यांना जागतिक प्रदर्शनात स्थान मिळणार अाहे.
जी अायमुळेच वेंगुर्ल्याचे काजू अाणि सांगलीच्या बेदाण्यांना जागतिक प्रदर्शनात स्थान मिळणार अाहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव तसेच जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. वाणिज्य मंत्रालयालाही ‘जीआय’रुपी शस्त्राचे महत्त्व कळाले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला त्या माध्यमातून योग्य दर तसेच जागतिक बाजारपेठ मिळवून देऊ शकतो हे या मंत्रालयाला उमगले आहे. त्यामुळेच सरकार ‘जीआय’ मानांकन मिळालेल्या उत्पादनांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. सरकारचे विधायक पाऊल सरकारकडून उचलले गेलेले विधायक पाऊल म्हणून युरोपियन महासंघाच्या मदतीने थायलंड देशातील बँकॉक येथे भरविण्यात आलेल्या महोत्सवाबाबत सांगता येईल. तो यंदाच्या २९ मे ते ०२ जून २०१७ या दरम्यान भरवण्यात आला होता. ‘थाइफेर्क्स असे त्याचे नाव होतो. येथील वर्ल्ड ऑफ फूड आशिया प्रदर्शनामध्ये ‘जीआय’ मिळालेल्या महाराष्ट्रातील कोकम, नाशिक व्हॅली वाईन, महाबळेश्वर स्ट्राॅबेरी तसेच इतर राज्यांतील मिझो तसेच नागा मिरची आणि तिरुपती लाडू यांचा समावेश केला होता. याच धर्तीवर केंद्र सरकारने ‘बॉम्बे एक्सिबिशन सेन्टर’, मुंबई येथे १४ ते १६ सप्टेंबर या काळात अन्नपूर्णा- वर्ल्ड ऑफ फूड इंडिया, २०१७ हे बारावे जागतीक प्रदर्शन आयोजीत केले आहे. यात जर्मनी, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (फिक्की) व अन्य संस्थांचा संयुक्त समावेश आहे. असे आहे हे प्रदर्शन अन्नपूर्णा हे प्रदर्शन दरवर्षी भारतात आयोजित केले जाते. या प्रदर्शनात जगभरातून वेगवेगळ्या कंपन्या आणि व्यापारी भाग घेत असतात. सन २०१६ मध्ये या प्रदर्शनात १३१ प्रदर्शकांनी तसेच ६१२१ आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी भाग घेतला होता. या वर्षी तुर्की, अमेरिका, कोरीया, थायलंड, फ्रान्स, पोलंड, सिंगापूर असे जगभरातील अनेक देश सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन आपल्या शेजारील देशांबरोबर व्यापार वाढविणे, खाद्यउद्योगाला चालना, किरकोळ व्यापाऱ्यांसाठी नवी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, भारतीय उत्पादने निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या बाबींविषयी माहित करून देणे, नवसंशोधन, व्यापारी धोरणांविषयी माहिती आदी विविध उद्देशांनी आयोजित केले जाते. नवीन उद्योगांनाही यामध्ये चांगली संधी असते. जीआय उत्पादनांसाठी दालन थाईफेक्स प्रमाणे अन्नपूर्णा प्रदर्शनात ‘जीआय’ मिळालेल्या उत्पादनांना महत्त्वाचे स्थान असणार आहे. यामध्ये संपूर्ण भारतातील जीआय मिळालेल्या उत्पादनांना वेगळे दालन उपलब्ध करून दिले आहे. ईशान्य भारतातील मिरची, केरळमधील नवारा तांदूळ, तमिळनाडू व कर्नाटकातील शेतमाल उत्पादने यावेळी सादर करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील वायगाव हळद, नवापूर तूर डाळ, वेंगुर्ला काजू, सांगलीचा बेदाणा, नाशिक व्हॅली वाईन, पुरंदरचे अंजीर आणि नागपूर संत्री यांचाही यात समावेश आहे. सांगलीच्या बेदाण्याला ‘जीआय’ मुळे बांगलादेशातून मोठी ऑर्डर मिळाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्याचप्रमाणे ‘जीआय’मुळे ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या नवीन जीएसटी करप्रणालीत सांगली बेदाण्याला विशेष कर सवलत मिळणार आहे असे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. या सर्व बाबींमुळे भारतात प्रसिद्ध असणारा सांगलीचा बेदाणा अन्नपूर्णा या प्रदर्शनात आपल्या वैशिष्टपूर्ण सोनेरी रंगासह झळकणार अाहे. दार्जिलिंग चहा व महाबळेश्वर स्ट्राॅबेरीप्रमाणे या बेदाण्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास निश्चित सुरू होईल, असे मानले जात आहे. शेतकऱ्यांनी करावे प्रमोशन मागील लेखांत आपण दार्जिलिंग चहाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळालेल्या यशाविषयी जाणून घेतले आहे. प्रत्येक ‘जीआय’ प्राप्त उत्पादनाचे ‘प्रमोशन’ संबंधित भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केल्यास दार्जिलिंग चहाप्रमाणे आपणही जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळवू शकतो.

संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीअाय विषयातील अांतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com