Agriculture story in Marathi, Geographical indication of tejpur litchi | Agrowon

स्वादिष्ट, पौष्टिक, आकर्षक तेजपूर लिची
गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

लिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ असून, जगातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक आहे. या फळाचा उगम चीनमधील आहे, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. प्रामुख्याने या फळाचे उत्पादन भारत, बांगलादेश, दक्षिण तैवान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर व्हिएतनाम या देशांत घेतले जाते. भारतामध्ये आसाम, बिहार, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यात काही प्रमाणात लिची या फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी आसाममधील तेजपूर लिची आणि बिहारमधील शाही लिचीला भारत सरकारच्या जीआय रजिस्ट्रीने जीआय प्रमाणपत्र दिले आहे.

लिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ असून, जगातील सर्वोत्कृष्ट फळांपैकी एक आहे. या फळाचा उगम चीनमधील आहे, असा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. प्रामुख्याने या फळाचे उत्पादन भारत, बांगलादेश, दक्षिण तैवान, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका आणि उत्तर व्हिएतनाम या देशांत घेतले जाते. भारतामध्ये आसाम, बिहार, ओडिशा, पंजाब, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच इतर राज्यात काही प्रमाणात लिची या फळ पिकाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी आसाममधील तेजपूर लिची आणि बिहारमधील शाही लिचीला भारत सरकारच्या जीआय रजिस्ट्रीने जीआय प्रमाणपत्र दिले आहे. आजच्या भागामध्ये जीआय मानांकन मिळालेल्या तेजपूर लिची या नावाने प्रचलित असलेल्या लिची फळाविषयी माहिती करून घेऊयात.

पूरक हवामान परिस्थिती
तेजपूर हे शहर आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तेजपूर हे आसाममधील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्रह्मपुत्र नदीच्या उत्तरेला वसलेले आहे. हे शहर फक्त ऐतिहासिक नसून या शहराला निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे लिची या फळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे उत्पादित होणारी लिची वैशिष्टपूर्ण आहे.

जीअायसाठी प्रयत्न

 • उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) या संस्थेने या लिचीचे वेगळेपण ओळखून जीआय मानांकन मिळण्यासाठी  २९ ऑगस्ट २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता.
 • साधारणपणे दीड वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर २७ मार्च २०१५ मध्ये त्यांना जीआय मानांकन मिळाले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे या लिचीला मागणी वाढली आहे. तसेच नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उत्पादनात वाढ झाली आहे.  
 • या लिचीला अमेरिका तसेच स्वित्झर्लंडमध्ये जीआय मानांकन मिळाल्यामुळे चांगली मागणी आहे.  

जीअायमुळे उत्पादनात वाढ

 • लिचीचे पीक तेजपूर शहर आणि पोरवा या दोघांमध्ये असणाऱ्या "लिचू पुखुरी" या भागात घेतले जाते. लिचू पुखुरी हे तेजपूरपासून ३ किमी अंतरावर आहे. येथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते.
 • जीआय नोंदणीनंतर या लिचीचे लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पोरवामधील जवळजवळ ५५ हेक्टर क्षेत्रामध्ये या लिचीच्या बागा आहेत.
 • उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड (NERAMAC) यांच्या माहितीनुसार १९५४ मध्ये पोरवा या गावात लिचीचे उत्पादन घेण्यास सुरवात झाली होती. या ठिकाणी जीआय नोंदणीनंतर लिचीची गुणवत्ता टिकवण्यासाठी किंवा चांगली रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे, त्याचबरोबर येथील शेतकरी शेतीबरोबरच रोपवाटिका व्यवसाय करत आहेत.  
 • तेजपूर लिचीच्या झाडांना साधारणपणे फेब्रुवारीमध्ये फुले येण्यास सुरवात होते. मे महिन्यात फळे तयार होतात. जूनमध्ये या फळांची काढणी सुरू होते.
 • फळे साधारणपणे तीन दिवस टिकतात. साधारणत: वार्षिक उत्पन्न सरासरी ७००० ते ८००० फळे जुन्या झाडांना, तर ३००० ते ४००० फळे नवीन झाडांकडून मिळतात. वरिष्ठ कृषी विकास अधिकारी, तेजपूर, यांच्या अहवालानुसार तेजपूर लिचीचे सरासरी उत्पन्न १६०० किलो प्रतिहेक्टर एवढे आहे.

तेजपूर लिची खाण्याचे फायदे

 • काही सरकारी नोंदीनुसार तेजपूर लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण मुबलक असल्याने लिची खाण्याने शरीरातील पाणी संतुलित ठेवण्यास मदत मिळते.
 • पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि जीवनसत्व क असल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि घशाचे आजार पसरण्यापासून प्रतिबंधित करते.

पाैष्टिक लिची

 • लिचीचा वापर ताजे असताना जास्त केला जातो. या लिचीला विशिष्ट आकार, आकर्षक चमकदार लाल रंग, स्वादिष्ट चव आणि नैसर्गिकरीत्या पौष्टिक आहे.
 • जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण जास्त असल्यामुळे जीवनसत्व क चा मुख्य स्राेत मानला जातो आणि पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम हे पौष्टिक घटकसुद्धा मुबलक प्रमाणात आहेत. जीवनसत्व ब काही प्रमाणात आढळते.
 • या लिचीच्या गराचा रंग किंचित करडा पांढरा आहे. एका फळाचे वजन २५ ते ३० ग्रॅम असून, भारतात येणाऱ्या सर्व लिचीच्या वजनापेक्षा जास्त आहे. साखरेचे प्रमाणही इतर लिची जातींपेक्षा जास्त आहे.
 • या फळांमध्ये उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन निगम लिमिटेड यांच्या माहितीनुसार फायबरचे प्रमाण ६ ते ६.५ टक्के एवढे आहे.
 • साखर १५.५ ते १६.२ टक्के, कर्बोदके १८.२ ते १८.५ टक्के, प्रथिनांचे प्रमाण ०.७१ ते ०.७३ टक्के आहे. एस्कॉर्बिक ऍसिड प्रति १०० ग्रॅम मध्ये साधारणत: ५४ मि.ली. ग्रॅम इतके आहे.  

संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

 

इतर कृषी प्रक्रिया
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
प्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...
टोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
विविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....
प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...
मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...
अाैषधी गुणधर्मांनीयुक्त अाल्याचे लोणचे...आले हे स्वयंपाकात सूप, बिस्किटे आणि वड्यांच्या...
रोजगार शोधार्थ गाव सोडलेले निवृत्ती...शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाची हमी नसल्यामुळे कोकर्डा...
शेतमाल प्रक्रियेसाठी सोपी यंत्रेभारतीय कृषी संशोधन परिषदेची ‘सिफेट’ ही अत्यंत...
प्रक्रियेपूर्वी तपासा दुधाची गुणवत्तादूध काढल्यानंतर दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण...
प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रेप्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता...
पाैष्टिक गुणवत्तेचे सोया दूधसोयाबीनमध्ये ४० टक्के प्रथिने, २० टक्के तेल व...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती...सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
अर्जुन लागवडीसाठी निवडा दर्जेदार रोपेअर्जुन हा वृक्ष वनशेतीसाठी उत्तम आहे. अर्जुन...
मसाला प्रक्रिया उद्योगात अाहेत संधीमसाले व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त पदार्थांना...
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
गिरणी उद्योगातून उभारला उत्पन्नाचा शाश्...जळगाव शहरातील पुष्पा विजय महाजन यांनी एका...
भोंगळेंचा शुद्ध नीरेचा ‘कल्पतरू' ब्रँडमाळीनगर (ता. माळशिरस, जि.सोलापूर) येथील नीलकंठ...
मका उत्पादनवाढ अन् प्रक्रियेलाही संधीमका उत्पादकता वाढीसाठी एकेरी संकरित, उशिरा पक्व...