आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चमकणारे उत्तराखंडचे तमालपत्र

विविध खाण्याच्या पदार्थांमध्ये तसेच अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी तेजपतचा वापर केला जातो. उत्तराखंड येथील शेतकरी विविध मसाल्याच्या पदार्थांचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतात. त्यामध्ये तेजपत (तमालपत्र) आघाडीवर आहे. येथील तेजपत ‘उत्तराखंड तेजपत’ आणि ‘मिठा तेजपत’ या नावाने ओळखला जातो.

भारतात विविध मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. हळद, लवंग, तमालपत्र (दालचिनीची पाने), वेलची, मिरी, जायफळ, दालचिनी, आले इ. या मसाल्याच्या पदार्थांपैकी आपण मागील काही भागात जीआय मानांकन मिळालेल्या वायगाव हळद, कार्बी अँगलोंग आले आणि अलेप्पी हिरवी वेलची या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांविषयी माहिती करून घेतली आहे. आजच्या भागात उत्तराखंडमधील जीआय मानांकनाने गौरविण्यात आलेल्या आणि उत्तराखंड तेजपत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तमालपत्र या मसाल्याच्या पदार्थाविषयी जाणून घेऊया. विविधतेने नटलेले उत्तराखंड हे भारतातील महत्त्वाचे राज्य आहे. मोठमोठे पर्वत, डोंगर, नद्या, जंगल असे सर्व काही या ठिकाणी आहे. या राज्यातील उत्तरेकडील अधिक भाग हिमालय पर्वत रांगांनी व्यापलेला आहे. महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गंगा आणि यमुना तसेच इतर अनेक नद्यांचे उगम स्थान आहे. या नद्या उत्तराखंडमधील प्रमुख जलसिंचन व जलविद्युत निर्मितीचे मुख्य स्राेत आहेत. या नद्यांच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे.

जीअायसाठी केलेले प्रयत्न

  • औषधी गुणधर्म असलेली उत्तराखंड तेजपत (तमालपत्र) ही उत्तराखंडमधील पहिली जीआय मानांकन मिळालेली वनस्पती आहे.
  • जीआय मानांकन मिळविण्यासाठी उत्तराखंडमधील तेजपत उत्पादक समितीने २०१५ मध्ये चेन्नई येथील जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता.
  • या पदार्थातील वैशिष्टपूर्ण गुणधर्मामुळे ३१ मे २०१६ रोजी जीआय रजिस्ट्रीने बहुमूल्य जीआय मानांकन दिले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
  • तेजपत उत्पादक समिती आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन ५०० शेतकऱ्यांची अधिकृत वापरकर्ता (Authorized User) म्हणून नोंदणी करून घेतली आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक जीआय मानांकन प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला आपला माल देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जीआय टॅग लावून विकता येणार आहे.
  • येथील तेजपतची मागणी चांगलीच वाढली आहे. विदेशातही या उत्तराखंड तेजपतला चांगली मागणी आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये तेजपतचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
  • हा तेजपत यूके, यूसए, जपान, युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया तसेच पाकिस्तान, श्रीलंका व मध्य पूर्व देशांत निर्यात केला जातो.
  • लागवड

  • उत्तराखंड सरकारने क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत ५०० हेक्टर क्षेत्रावर तेजपतची लागवड केली आहे.
  • उत्तराखंड तेजपत हिमालयात आढळते. मुख्यत्वे नैनिताल, चामोली, टिहरी, बागेश्वर, अलामोरा, पिथौरागड आणि चंपावत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
  • येथील हवामान ‘तेजपत’च्या झाडांच्या वाढीसाठी पूरक आहे. माती, पाणी, हवा यामुळे येथील तेजपत इतर ठिकाणी उत्पादित होणाऱ्या तेजपतपेक्षा वेगळे आणि वैशिष्टपूर्ण ठरते.
  • या मसाल्याच्या पिकाची लागवड समुद्रसपाटीपासून ५०० ते २२०० मीटर उंचीवर त्याचबरोबर ओलावा असलेली चिकन माती उपलब्ध असणाऱ्या डोंगराळ भागात केली जाते.
  • तेजपतचे झाड पाच वर्षांत विकसित होते. नवीन वृक्षारोपण जुलै ते ऑगस्ट महिन्यात केले जाते आणि डिसेंबर ते मार्च या दरम्यान पाने कापतात.
  • या पिकासाठी साधारणपणे तापमानाचे प्रमाण १५ ते ३० अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रतेचे प्रमाण १५० ते २५० आवश्यक असते.
  • उपयोग

  • उत्तराखंड तेजपतचा वापर विविध औषधे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
  • मोठ्या प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट अाहेत. याशिवाय पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, सेलेनिअम यांचीही मात्रा अधिक आहे.
  • तेलाचे प्रमाण अधिक आहे. आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते, दररोज तेजपत्त्याचे सेवन केल्याने पोटाचे विकार, कफ, अॅसिडिटी, पित्त या समस्यांतून आराम मिळू शकतो. त्याचबरोबर साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
  • संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जी अाय विषयातील अंतरराष्ट्रीय तज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत. )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com