agriculture story in marathi, giriraja poultry rearing | Agrowon

मुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त : गिरिराज कोंबड्या
डॉ. के. डब्लू. सरप, डॉ. एस. यु. नेमाडे
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या आणि अंडी आणि मांस या दुहेरी उत्पादनासाठी गिरिराज या कोंबड्यांच्या जाती उपयुक्त आहेत. वार्षिक अंडी उत्पादन १५० असून, वजन १.५ किलोपर्यंत भरते. अंड्यांचा रंग तपकिरी असतो. कोंबड्या जगण्याचे प्रमाण ९५ ते ९८ टक्के असते.

सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या आणि अंडी आणि मांस या दुहेरी उत्पादनासाठी गिरिराज या कोंबड्यांच्या जाती उपयुक्त आहेत. वार्षिक अंडी उत्पादन १५० असून, वजन १.५ किलोपर्यंत भरते. अंड्यांचा रंग तपकिरी असतो. कोंबड्या जगण्याचे प्रमाण ९५ ते ९८ टक्के असते.

 • गिरिराज जातीमधील नर पक्षी १० ते १२ आठवड्यांत जास्तीत जास्त वजन देतात, त्याचप्रकारे मादी पक्षीसुद्धा १५० अंडी प्रतिवर्षी मुक्त पद्धतीत देतात.
 • उपलब्ध खाद्य व पूरक खाद्यावर ही जात उत्तम प्रकारे वाढू शकते.
 • या मुक्त पद्धतीने वाढणाऱ्या कोंबड्या त्यांना आवश्यक असणारे प्रथिने कीटकांपासून मिळवतात, त्यामुळे त्यामधील ऊर्जेमध्ये कमतरता असू शकते, त्यासाठी विविध धान्यांपासून बनविलेले खाद्य या जातीसाठी उपयुक्त आहे.

वैशिष्टये

 • विविध रंगांतील आकर्षक पंख
 • कमीत कमी खर्चात राहण्याची क्षमता
 • मोठ्या आकाराची अंडी
 • उत्तम रोग प्रतिकार शक्ती
 • अंड्याचा रंग तपकिरी
 • देशी कोंबडीसुद्धा गिरिराज या जातीचे अंडी उबवू शकते .

लहान पिल्लांच्या संगोपनासाठी पूर्वतयारी
शेड उपलब्ध असेल तर पुढीलप्रमाणे तयारी करावी.

 • शेडमधील पिण्याच्या पाण्याची व खाद्याची भांडी स्वच्छ धुवून वळवून घ्यावी.
 • लाइट फिटिंग व्यवस्थित आहे किंवा नाही, याची पाहणी करावी. ब्रुडिंग करण्यासाठी जास्त पावरचे बल्ब लावावे लागतात, त्याप्रमाणे सोय करून घ्यावी.
 • शेडमधील जुने लिटर (भुसा) काढून शेडपासून दूर विल्हेवाट लावावी.
 • शेडमधील जाळे, धूळ, भिंतीला लागलेली घाण स्वछ धुवून काढावी, उंचावर असलेली कोळ्याची जाळी काढून टाकावी.
 • शेड स्वच्छ धुतल्यानंतर भिंतीचे कोपरे व जाळी अडकलेली कोळ्याची जाळी फ्लेमगनने जाळून घ्यावीत.
 • शेड चांगल्या प्रेशरच्या पाण्याने धुवून घ्यावे व जंतुनाशकाचा फवारा करावा व शेड वाळल्यानंतर गनीबॅगचे पडदे लावून घ्यावीत.
 • पिले शेडमध्ये आणण्यापूर्वी एक आठवडा अगोदर शेड पूर्णपणे तयार करून झाले पाहिजे, प्रत्येक बॅचला नवीन भुसा वापरावा.
 • पिले येण्यापूर्वी ब्रुडरमध्ये भाताचे तूस २ ते ३ इंच जाडीचा थर पसरून घ्यावे, त्यानंतर त्यावर जुने वर्तमानपत्र पसरावे, ज्यामुळे पिले भुसा खाणार नाहीत.
 • पिले येण्यापूर्वी काही तास अगोदर लाइट चालू करून शेडमधील तापमान उबदार करावे.

ब्रुडिंग

 • ब्रुडिंगसाठी एका पिलासाठी २ वॅट इतकी उबेची आवश्यकता असते. ब्रुडिंग ३ ते ४ आठवडे करावे लागते.
 • १०० पक्ष्यासाठी २०० वॅटचा एक बल्ब लावावा. त्याप्रमाणे लाइटचे बल्ब लावावेत.
 • ब्रुडरमध्ये पिले एका ठिकाणी जमा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • पिलांची हालचाली मर्यादित ठेवण्यासाठी १५ ते १८ रुंदीच्या पुठ्याचे किंवा पत्राचे गार्ड करून गोल भाग तयार करून घ्यावा व त्यातच पिले सोडवीत.

आहार

 • सुरवातीच्या चार आठवड्यांच्या काळात बाजारात उपलब्ध असलेले लेयर खाद्य व ग्रोवर खाद्य दिले जाऊ शकते.
 • गिरिराज जातीचे पक्षी खुल्या क्षेत्रातील आहार सहजतेने घेऊ शकतात.
 • चार आठवड्यांपर्यंत लागणारे अतिरिक्त पूरक खाद्य हे पक्षी कोणत्या कारणाकरिता पाळले जाणार आहेत, यावरती अवलंबून आहे.
 • जर मांस उत्पादनासाठी संगोपन करायचे असेल, तर कोंबड्यांना ब्रॉयलर स्टार्टर खाद्य देणे आवश्यक आहे. जर, या कोंबड्या अंडी उत्पादनासाठी वाढवल्या जाणार असतील, तर लेयर ग्रोवर खाद्य ४ आठवड्यापर्यंत देणे आवश्यक आहे.

आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठळक वैशिष्टये

 • १ दिवसाच्या पिलाचे वजन ः ४५ -४६ ग्रॅम
 • रंग ः विविध रंगी
 • ८ आठवडे पक्ष्यांचे वजन ः १.६ किलो
 • जगण्याची क्षमता ः ९४ टक्के
 • मांसाची गुणवत्ता ः उत्तम
 • चव ः गावरान कोंबडीप्रमाणे
 • वार्षिक अंडी उत्पादन ः १५० अंडी
 • लागणारे खाद्य सरासरी ः ६५ किलो

संपर्क ः डॉ. के. डब्लू. सरप, ९०९६८७०५५०
Email id : ishasarap@gmail.com
(विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ) 

टॅग्स

इतर कृषिपूरक
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...
जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल करणे...कोवळा चारा, निकृष्ट दर्जाचा चारा किंवा बुरशीची...
जनावरांतील रोगनिदानासाठी प्रयोगशाळा...तात्काळ रोगनिदान व योग्य उपचार केल्यामुळे औषधांचा...
गाई, म्हशींची दुग्धोत्पादन क्षमता वाढवा...सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्डेड सीमेन,...
ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणेजनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...