शेळीपालन संघटना स्थापनेपूर्वी...

संघटना स्थापनेपूर्वी लक्षात घ्या अावश्यक बाबी
संघटना स्थापनेपूर्वी लक्षात घ्या अावश्यक बाबी

शेळीपालन संघटना स्थापन केल्यामुळे व्यवसायाला चालना मिळते. संघटनेमार्फत एका वेळी सर्व शेळीपालकांना लागणाऱ्या गोष्टी कमी किमतीत विकत घेऊन उपलब्ध करता येऊ शकतात. संघटना स्थापन करताना घ्यावयाची काळजी

  • संघटनेची सुरवात छोट्या प्रमाणात व विशेष उद्देश ठेवून करावी.
  • वास्तववादी अपेक्षा ठेवणे गरजेचे.
  • एकत्रित काम करण्याची इच्छा व खरच व्यवसायाची आवड व कष्ट करण्याची इच्छा असणाऱ्या सदस्यांची नोंदणी.
  • योग्यवेळी योग्य निर्णयक्षमता, कष्टाची तयारी असणारे व व्यक्तिकेंद्रीत फायदा न बघणारी प्रशासनव्यवस्था निवडणे.
  • संघटना सर्वसमावेशक असणे अवघड आहे.
  • संघटनेच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत व योग्य नियमावलीचा वापर करून केल्यास संघटना शेळीपालकांसाठी फायदेशीर ठरू शकते यामध्ये शंका नाही.
  • संघटनेचे तोटे

  • संघटनेच्या विविध निर्णयावर सदस्यांचे लक्ष असावे. सर्व सदस्यांनी सहभाग नोंदविला नाही तर संघटनेचे कामकाज व्यवस्थित चालत नाही.
  • संघटनेने नियमित केलेले वार्षिक रकमेच्या स्वरुपातील योगदान न दिल्यास संस्थेला नवनवीन उपक्रम हाती घेता येत नाहीत व संस्था स्थापनेचा उद्देश असफल होऊ शकतो.
  • संघटना सदस्यांना काही वेळा अनियंत्रित कारणास्तव तोटा सहन करावा लागू शकतो.
  • संघटनेचे कामकाज व्यवस्थित न ठेवल्यामुळे अडचणी वाढू शकतात.
  • सदस्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन नसल्यास संघटना तोट्यात जाऊ शकते.
  • संघटनेचे यश-अपयश हे सदस्यांचे प्रयत्न, एकत्र येऊन काम करण्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.
  • शेळीपालक संघटना शेळीपालकांचा फायदा कसा करून देऊ शकते.

  • संघटनेमध्ये जास्त सदस्य संख्या असल्यामुळे एका वेळी मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी, विक्री करून सदस्यांना जास्त किंमत मिळू शकते उदा. ः निर्यातक्षम कत्तखान्यामध्ये बोकडांची विक्री करून निर्यातीमधून जास्त किंमत मिळविणे.
  • संघटना विविध पद्धतीने सदस्यांचा खर्च ‘कमी’ करू शकते. उदा. बाजारात आपला माल नेण्यासाठी वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था कमीत कमी खर्चात करणे.
  • संघटना सर्व शेळीपालक सदस्यांसाठी एकत्रित व एका ठिकाणी प्रात्यक्षिक देऊन व्यवसायातील अडचणी दूर करू शकते.
  • फीड मीलची स्थापना करणे प्रत्येक शेळीपालकाला शक्‍य नाही. त्यामुळे एका ठिकाणी खाद्य तयार करून (फीड मील) सर्व सदस्यांना बाजारभावापेक्षा कमी भावात भरडा/ पेंड/ खुराक उपलब्ध करून देता येते.
  • संघटना बाकीच्या संघटना ज्या सेवा पूर्ववत नाहीत, अशा सेवा पुरवून शेतकऱ्यांचा फायदा करून देऊ शकते. उदा. ः (गोठ्यावर प्रात्यक्षिक दिवस, एकत्रित विक्रीव्यवस्था इ.)
  • शेळीपालकांच्या विविध अडचणी शासनाकडे मांडून त्यावर त्वरित उपाययोजना करू शकते.
  • गरजेप्रमाणे देशांतर्गत व देशाबाहेरील मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन दिले जाऊ शकते.
  • एका वेळी सर्व शेळीपालकांना लागणाऱ्या गोष्टी कमी किमतीत विकत घेऊन उपलब्ध करता येऊ शकतात. उदा. ः वाळलेला चारा, ओला चारा, लसीकरण, मार्गदर्शक.
  • एका ठिकाणी मटणाचे दुकान किंवा शेळीपालनातून मिळाऱ्या विविध उत्पादनाचे विक्री व्यवस्थापन मोठ्या शहरांत मॉलच्या स्वरुपात केले जाऊ शकते.
  • संपर्क : ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com