agriculture story in marathi, grape advisary | Agrowon

जुना डाऊनी, भुरी प्रादुर्भाव वाढणार नाही, याकडे लक्ष द्या
डॉ. एस. डी. सावंत
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

हवामान अंदाज
सर्वच द्राक्ष विभागांमध्ये गुरुवारपर्यंत वातावरण कमी-अधिक प्रमाणात ढगाळ राहिले. त्यात सांगली विभागातील जत, उमदी, खानापूर, पळशी या भागांमध्ये मागील ३ दिवसांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मात्र, आज शुक्रवारी (ता. २६) व पुढेही काही काळ उर्वरित द्राक्ष विभागामध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवडाभर कमाल तापमान ३०-३१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते. मात्र, हळूहळू रात्रीचे तापमान १६ -१७ अंशापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

उपाययोजना

हवामान अंदाज
सर्वच द्राक्ष विभागांमध्ये गुरुवारपर्यंत वातावरण कमी-अधिक प्रमाणात ढगाळ राहिले. त्यात सांगली विभागातील जत, उमदी, खानापूर, पळशी या भागांमध्ये मागील ३ दिवसांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. मात्र, आज शुक्रवारी (ता. २६) व पुढेही काही काळ उर्वरित द्राक्ष विभागामध्ये निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण आठवडाभर कमाल तापमान ३०-३१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहू शकते. मात्र, हळूहळू रात्रीचे तापमान १६ -१७ अंशापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.

उपाययोजना

  • सध्याच्या परिस्थितीनुसार कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होण्याची लक्षणे दिसत नाहीत.
    ज्या ज्या ठिकाणी मागील दोन दिवसांमध्ये पाऊस झालेला आहे, अशा ठिकाणी जुन्या डाऊनीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. त्यामुळे डाऊनीचा जुना प्रादुर्भाव आहे किंवा आजूबाजूला न छाटलेल्या बागांमध्ये डाऊनी आहे, फक्त अशाच बागांमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशके फवारणीसाठी वापरणे फायद्याचे होऊ शकेल. अन्यथा डाय थायोकार्बामेट वर्गातील बुरशीनाशक (मॅन्कोझेब किंवा प्रोपीनेब किंवा मेटीराम, प्रमाण- २ ग्रॅम प्रतिलिटर) स्वतंत्रपणे फवारल्यास किंवा फोसेटिल एएल किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ॲसिड ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणे मिसळून फवारल्यास नवीन फुटी डाऊनीपासून सुरक्षित राहतील.
  • ढगाळ वातावरण आणि रात्री होणारे कमी तापमान या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी दिसतात, तिथे भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्‍यक राहील. सर्वसाधारणपणे सल्फर (८० डब्ल्यूजी) दीड ते दोन ग्रॅम या प्रमाणात चांगले कव्हरेज मिळेल अशा प्रकारे भुरी नियंत्रणासाठी फवारावे.
  • मागील काही दिवसामध्ये हलका पाऊस झालेल्या ठिकाणी भुरीसाठी जैविक नियंत्रण चांगले काम करू शकेल. ज्या ठिकाणी ट्रायअझोल वर्गातील बुरशीनाशके वापरलेली नाहीत व फक्त सल्फर वापरलेले आहे, अशा ठिकाणी ट्रायकोडर्मा ५ मि.लि. प्रतिलिटर किंवा बॅसिलस सबटिलिस २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारावेत. चांगली आर्द्रता असलेल्या ठिकाणी सल्फर व जैविक नियंत्रणाचे घटक दोन्ही मिळून आंतरप्रवाही बुरशीनाशकांइतकेच चांगले काम करू शकते. म्हणून ज्या ठिकाणी हलके पाऊस झालेले आहेत, अशा ठिकाणी वरील प्रमाणे सल्फर व जैविक नियंत्रणाचे वर नमुदे केलेले घटक जरूर वापरावेत.

 

इतर ताज्या घडामोडी
परिषदेत पहिल्याच दिवशी राज्य सरकारची...मुंबई : विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते...
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागांवर...नारायणगाव, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील द्राक्ष...
कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी...परभणी  : मानवत तालुक्यासह जिल्ह्यातील...
नाशिक जिल्ह्यात ३५०० द्राक्षप्लॉटची...नाशिक  : युरोपियन राष्ट्रांसह रशिया आणि अन्य...
शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका ः आदित्य...बुलडाणा   ः तुम्ही संकटात असताना...
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...