agriculture story in marathi, guava, custard apple farming, soygaon, aurangabad | Agrowon

हवामानाला सुसंगत पेरू, सीताफळाची शेती
डॉ. टी. एस. मोटे 
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी गावातील शेतकऱ्यांनी हवामानबदल, पाणीटंचाईची बाब वेळीच ओळखून पीकपद्धती व एकूण व्यवस्थापनात बदल केला. मोसंबी, केळीसाठी पूर्वी प्रसिद्ध असलेल्या गावाने सीताफळ, पेरू या कमी पाणी लागणाऱ्या पिकांतून परिवर्तन साधले. मृगबहार, ठिबक, सूरत व स्थानिक बाजारपेठ, संघटन व उत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या जोरावर या पिकांतून आर्थिक सक्षमता त्यांनी वाढवली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी गावातील शेतकऱ्यांनी हवामानबदल, पाणीटंचाईची बाब वेळीच ओळखून पीकपद्धती व एकूण व्यवस्थापनात बदल केला. मोसंबी, केळीसाठी पूर्वी प्रसिद्ध असलेल्या गावाने सीताफळ, पेरू या कमी पाणी लागणाऱ्या पिकांतून परिवर्तन साधले. मृगबहार, ठिबक, सूरत व स्थानिक बाजारपेठ, संघटन व उत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या जोरावर या पिकांतून आर्थिक सक्षमता त्यांनी वाढवली आहे. 

जरंडी हे गाव औरंगाबाद जिल्ह्यात येत असले तरी जळगाव जिल्ह्याच्या सीमेजवळ ते आहे. वाढते तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, पावसातील खंड, बेभरवशाचे मॉन्सूनचे आगमन आदी बाबी वारंवार घडत आहेत. यामुळे शेती बेभरवशाची, जोखमीची झाली आहे. जरंडी गावही त्यातूनच जाते आहे. अजंठा वेरूळ हा लेण्यांसाठी प्रसिद्ध भाग याच गावाजवळ आहे. 
येथील डोंगरावरून पडणारे पाणी हाच काय तो मुख्य जलस्राेत असल्याचे गावातील दिलीप पाटील बोलून दाखवतात. भूगर्भातील पाणीपातळीही दिवसेंदिवस घटत चालली आहे. पाण्याचा उपसा वाढला आहे. जरंडीकरांनी वेळीच जागे होत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे मोर्चा वळवला आहे. 

पेरू, सीताफळावर भर 
जरंडीकरांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा अभ्यास करताना त्यांना चांगली बाजारपेठही आहे का याचा विचार केला. त्यातून पेरू, सीताफळ अशी पिकं प्रकर्षानं पुढे आली. पेरू, सीताफळ, कागदी लिंबू आदी पिकांखालील क्षेत्र आता गावात वाढत चालले आहे. सीताफळ सुमारे १२५ एकर, पेरू १०२ एकर व कागदी लिंबू सात एकर क्षेत्रावर आहे. एकूण १२२८ हेक्टर कापूस लागवडीपैकी सुमारे ८४३ हेक्टर कापूस ठिबक सिंचनाखाली आहे. जरंडीतील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात पूर्वी पाण्याची विपुलता होती. जिकडे पाहावे तिकडे केळी आणि मोसंबीच्या बागा दिसायच्या. जळगाव जिल्ह्याला लागूनच सोयगाव तालुका असल्याने केळीचे कल्चर चांगल्या प्रकारे विकसित झाले. आता मात्र पाण्याच्या टंचाईमुळे गावात केळीचे खोड पाहायला मिळत नाही. मोसंबीचे क्षेत्र केवळ ८२ एकरांपर्यंत उरले आहे. सीताफळ, पेरू या पिकांना अन्य फळपिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते. एखाद्या वर्षी पाऊस खूप कमी झाला तर उत्पादन एकवेळ घेता येणार नाही, परंतु बाग मात्र वाचवता येते. कारण उन्हाळ्यात ही पिके वाळून जात नाहीत. उन्हाळ्यात पाणी कमी पडले तर वर्षानुवर्षे जोपासलेल्या मोसंबीचे जणू सरपण होते. केळीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घटून प्रत बिघडते. मोसंबीच्या तुलनेत कमी पाणी लागणाऱ्या कागदी लिंबाचीही लागवड वाढत आहे. 

सघन पद्धतीने पेरू लागवड

 • बऱ्याच शेतकऱ्यांकडे पेरूची लखनौ ४९ (सरदार) जात. सुमारे ४० एकर पेरू लागवड सघन पद्धतीची असावी. 
 • पाणी कमी असल्यामुळे वर्षातून एकच बहर. मेच्या शेवटी ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात छाटणी. 
 • त्यामुळे बाग चांगली फुटते. माल चांगला येतो. 
 • सुमारे अडीच एकर पेरू असलेले रवींद्र रामदास पाटील सांगतात, की लागवडीनंतर पहिला बहार दुसऱ्या वर्षी घेता येत असला तरी सहा- सात वर्षांनंतर चांगले उत्पादन मिळू शकते. वयानुसार प्रतिझाड ४० ते ४५ किलो फळे मिळू शकतात. जून-जुलैमध्ये फुले. तोडणी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता फार कमी. फक्त झाडे जगवण्यासाठी ठिबकद्वारे एक ते दोन लिटर पाणी. पाणी कमी असले तरी उन्हाळ्यात झाडे वाळत नाहीत. 

दिलीप पाटील यांची प्रयोगशीलता 
दिलीप पाटील यांची सुमारे साडेचार एकर सीताफळाची जुनी तर नवी तीन एकर बाग आहे. अडीच एकर पेरू आहे. मोसंबीचे सहा एकर तर डाळिंबाचे तीन एकर क्षेत्र होते. पाण्याअभावी दोन्ही फळांची शेती त्यांनी थांबवली आहे. पेरू, सीताफळाबाबत ते समाधानी आहेत. 

सीताफळ

 • एकरी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न 
 • एकरी पाच टन तर प्रतिझाड २५ ते ३० किलो उत्पादन. 
 • वाण- बाळानगर 
 • सुमारे १० वर्षांपासून बागेचे संगोपन 

पेरू

 • लखनौ वाणाच्या पेरूचे अडीच एकरांतील क्षेत्रात यंदा दोन लाख रुपये मिळाले. 
 • दुष्काळात ही रक्कम बरेच समाधान देऊन जाणारी असल्याचे त्यांना वाटते. 
 • दहा बाय १० फूट अंतरावरील बागेत एकरी सुमारे ४४० झाडांची जोपासना दुष्काळी स्थितीत 

समाधानकारक दर व मार्केट 

 • दोन्ही फळांना सुरत व स्थानिक व्याऱ्यांचे मार्केट मिळवले. 
 • सीताफळ- ए ग्रेड- किलोला ८० ते ९० रुपये, बी ग्रेड मालाला ६० रुपये दर मिळवला 
 • पेरूलाही हीच बाजारपेठ. मागील वर्षी किलोला ३० रुपये तर यंदा २५ रुपये दर. 

शेततळ्याची व्यवस्था 
पाटील यांचे कापूस हेदेखील महत्त्वाचे पीक. सुमारे एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. सध्या त्यात पाण्याची चांगली अवस्था. 

किफायतशीर फळपिके 
पाटील सांगतात की मृगबहार घेतला की पुढे पाण्याची अडचण कमी राहते. या दोन्ही पिकांना मजूरबळ कमी लागते. पेरूचे कल्चर अलीकडील काळात विकसित झाले असले तरी सीताफळाची तीस वर्षांची बागदेखील पाहण्यास मिळते. 

अन्य शेतकऱ्यांचे अनुभव 

 • गावातील सर्वांत जुने सीताफळ उत्पादक श्रीराम तुकाराम पाटील या पिकाचा उत्पादन खर्च 
 • कमी असल्याचे वैशिष्ट्य सांगतात. अन्य फळपिकांप्रमाणे वारंवार फवारणी करावी लागत नाही. मेअखेरीस ते जूनच्या सुरवातीस पेन्सिल आकाराच्या काडीवर सहाव्या पानानंतर ‘कट’ घेतो. लहान आकाराच्या काडया (रिफिल आकार) काढून टाकतो. छाटणी केल्याने फळे जास्त व मोठी लागतात. पावसाळ्यानंतर सप्टेंबरपासून प्रतिझाड २ ते ३ लिटर पाणी दिले जाते. फळ तोडणीनंतर म्हणजे उन्हाळ्यात फक्त झाडे जगवण्यासाठी प्रतिझाड एक ते दोन लिटर पाणी ठिबकद्वारे सोडले जाते. लागवडीनंतर पहिली तीन वर्षे मात्र उन्हाळ्यातही पाणी द्यावे लागते. या कालावधीत झाडे वाळण्याचा धोका असतो. 

अभ्यासपूर्ण शेतकरी 

 • गावातील बहुतांश तरुण मंडळी पदवीधर वा पदव्युत्तर पदवीधारक. त्यामुळे अभ्यासपूर्ण शेती 
 • त्यांचे संघटनही चांगले. शेतकरी उत्पादक कंपनीही स्थापन. 
 • गेल्या वर्षी पाऊस बरा होता. उत्पादन चांगले मिळाले. सुमारे ४००-४५० ग्रॅम सीताफळाच्या सव्वा किलो बॉक्सला ४० ते ६० रुपये तर १५ किलोच्या क्रेटला (ए ग्रेड फळ) किलोला १०० ते ११० रुपये कमाल दर. 

व्यापाऱ्यांना भावणारे फळ 
पेरूची झाडावर असलेली संख्या, झाडाचे वय यानुसार प्रत्येक बागेची किंमत वेगवेगळी मिळते. सरासरी एकरी एक लाख रुपयांना बाग जाते. सुनील पाटील यांची पेरूची बाग नेहमी अधिक किमतीला विकली जाते. 

संपर्क- रवींद्र पाटील – ९९७५०७३६८८ 
दिलीप पाटील – ८२७५३२५७२१ 

(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...
निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश...
काळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...
दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...
संरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...
आधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...
काळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...
यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...
स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
दुष्काळात कामी आले बहुविध पीक पद्धतीतील... नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी...
धरणात जमीन गेली तरी शेतीत नव्याने भरारी...नाशिक जिल्ह्यात आदिवासीबहुल गावंदपाडा- करंजाळी (...