पेरूची टॉफी, स्क्वॅश, गर

पेरु प्रक्रिया
पेरु प्रक्रिया

पेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, ग्लुकोज, ऍन्टिऑक्‍सिडंट मुबलक प्रमाणात असतात. पेरूपासून टॉफी, स्क्वॅश आणि गर बनवून चांगला फायदा मिळवता येतो. १) टॉफी

  • पिकलेले फळे घेऊन त्यापासून गर तयार करावा. टॉफी तयार करण्यासाठी पल्प १ किलो, साखर ६५० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ८० ग्रॅम, दूध पावडर ६० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड २ ग्रॅम व वनस्पती तूप १०० ग्रॅम या प्रमाणात वापरावे.
  • गर भांड्यामध्ये घेऊन त्यात वनस्पती तूप मिसळून गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा. घेतलेल्या प्रमाणानुसार साखर, दूध पावडर, सायट्रिक ॲसिड हे घटक मिसळून मिश्रण एकजीव करावे.
  • मंद आचेवर मिश्रण चांगले ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज मिसळून मिश्रणाचा ब्रीक्‍स ७० ते ७२ अंश दरम्यान आल्यावर गॅस बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून ठेवावे.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे काप करावे व तयार टॉफी बटरपेपरमध्ये किंवा टॉफी रॅपरमध्ये पॅक करावी.
  • २) स्क्वॅश

  • पूर्णतः पिकलेली फळे कापून त्यापासून गर तयार करावा. स्क्वॅश तयार करताना प्रथम गराचा ब्रीक्‍स तपासून घ्यावा. स्क्वॅशमध्ये मूळ रसाचे प्रमाण २५ टक्के ठेऊन साखरेचे प्रमाण ३५ टक्के व आम्लता १ टक्के ठेवावी.
  • १ किलो गरामध्ये १६०० ग्रॅम साखर, २७ ग्रॅम सायट्रिक ॲसिड, १३०० मिली पाणी व २ ग्रॅम पोटॅशियम मेटाबायसल्फाईड मिसळावे.
  • गाळून घेतलेल्या गरामध्ये साखर व पाणी दिलेल्या प्रमाणामध्ये मिसळावे. शेगडीवर ठेऊन त्याला उष्णता द्यावी. द्रावण उकळण्यास सुरवात झाल्यानंतर ५ मिनिटांमध्ये त्यामध्ये प्रमाणानुसार पोटॅशियम मेटाबायसल्फाईड पाण्यात विरघळून त्यामध्ये मिसळावे.
  • हे द्रावण ८०-८५ सेल्सिअस तापमानाला १५ मिनिट उकळून घ्यावे. तयार झालेला स्क्वॅश गाळून घ्यावा व निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये हवाबंद करून कोरड्या जागेत ठेवावा.
  • ३) गर

  • पेरू फळाच्या हंगामात त्यापासून गर तयार करून तो हवाबंद कॅन/ बाटल्यामध्ये दीर्घकाळ साठवून ठेवता येतो व फळांचा हंगाम नसताना त्याचा वापर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी होऊ शकतो.
  • पेरू पाण्याने स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी कराव्यात. स्क्रू टाईप पल्परमध्ये पेरूच्या फोडी टाकून गर वेगळा केला जातो. पेरूच्या गराचा ब्रीक्‍स २० ते २२ अंश करून त्याची आम्लता ०.५ टक्के ठेवावी.
  • गर चांगला टिकवण्यासाठी पोटॅशियम मेटाबायसल्फाईडचा वापर करावा किंवा गर भरून ठेवलेल्या बाटल्या ८०-८५ अंश सेल्सिअस तापमानाला १०-१५ मिनिटे गरम पाण्यात ठेवाव्यात.
  • संपर्क ः सोनल चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com