शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्म

शेवगा पावडर
शेवगा पावडर

शेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या पानांपेक्षा अधिक पोषकत्वे असतात आणि वापरण्यास अगदी सहज व सोपे जाते. शेवगा पानांच्या पावडरची कॅप्सुलदेखील बाजारात उपलब्ध आहे. बचतगटातील महिलांना, शेवगा पावडरचा चांगला उद्योग करता येईल. शेवगा लागवडीसोबत पानांची देखील विक्री करता येते किंवा शेतातच एक प्रक्रिया युनिट सुरू करता येते.   शेवग्याच्या शेंगा, पाने, फुले, खाण्यासाठी तर झाडाची साल डिंक मिळवण्यासाठी वापरतात. शेवग्याच्या झाडाच्या ताज्या हिरव्यागार पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे, अॅन्टीऑक्सिडंट आणि अमिनो अॅसिड असतात. पाने वाळवून पावडर करून ठेवणे व आहारात वापरणे अधिक सोईचे आहे. वाळलेल्या पानांची पावडर वर्षभर टिकते. झाडांची ताजी हिरवीगार पाने तोडून स्वच्छ धुवावीत आणि उन्हामध्ये वाळवावीत. उन्हात वाळवताना त्याला संरक्षित पद्धतीमध्ये शक्यतो सोलार ड्रायरचा वापर करून वाळवावे म्हणजे त्यावर कचरा, धूळ, किडे अथवा इतर घाण बसणार नाही आणि स्वच्छ वाळलेली पाने मिळतील. तसेच वेळही वाचेल. वाळलेली पाने मिक्सरमधून बारीक करून चाळून घ्यावीत. ही पावडर भाजी, वरण, भाकरी, पराठे अथवा सुपमधून वापरता येईल. १०० ग्रॅम शेवगा पानांच्या पावडरमधील पोषकतत्वे

  • ऊर्जा ः २०५ किलो कॅलरी
  • प्रथिने ः १६.५५ ग्रॅम
  • कार्बोदके ः ५०.४ ग्रॅम
  • तंतू ः ४.४० ग्रॅम
  • कॅल्शिअम ः ५६२०.६२ मिलीग्रॅम
  • मॅग्निशिअम ः ३६८ मिलीग्रॅम
  • लोह ः २६.५१ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व अ ६८६८.६६ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व ब १ ः २.६४ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व ब २ ः २०.५ मिलीग्रॅम
  • जीवनसत्व ब ३ ः ८.२ मिलीग्राम
  • जीवनसत्व क ः १८.२१मिलीग्रॅम
  • जीवनसत्व इ ः ११३ मिलीग्रॅम
  • पाने सोलर ड्रायरमध्ये वाळवताना...

  • पानातील ओलावा ७४.५९ टक्के कमी होऊन २५.४० टक्के वाळलेला पाला मिळतो. साधारण १० किलो ताज्या पानांपासून २.५ किलो वाळलेला पाला मिळतो.
  • सोलर ड्रायरमध्ये वाळवल्यामुळे पानांचा रंग आणि गंध टिकून रहातो आणि वेळही वाचतो.
  • पानाचे आरोग्यादायी फायदे

  • लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे रक्तक्षय कमी होण्यास मदत होते.
  • हाडांना मजबुती येते.
  • मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर.
  • शरीरातील दाह कमी होतो.
  • झिंकचे प्रमाण असल्यामुळे केस गळती थांबून केसांच्या वाढीस मदत होते.
  • जीवनसत्व अ, क आणि इ चे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्वचा निरोगी राहाते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
  • कॉलेस्ट्रोल कमी करून रक्त गोठण्यापासून वाचवते.
  • जीवनसत्व अ डोळ्यांना निरोगी ठेवते.
  • रक्तदाब नियंत्रित राहातो यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते रक्तदाब कमी करते.
  • मानसिक ताणताणाव कमी करण्यासाठी शेवगा पावडर उपयुक्त आहे.
  • अँटिऑक्सिडेंटस भरपूर असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या वाढीस देखील अटकाव करते.
  • शेवगा पावडर जीवनसत्व क युक्त असल्यामुळे पचन शक्ती सुधारते.
  • पाल्यातील चोथ्याचे प्रमाण बद्धकोष्टता कमी करते.
  • अल्सरमध्ये उपयोगी.
  • शेवग्याचा पाला अँटिवायरल, अँटिबॅक्टेरीएल, अँटिफंगल आहे. या औषधी गुणधर्मामुळे शरीरातील जंतू संसर्ग नष्ट होऊन शरीर शुद्धीकरण होते. तसेच जखम भरून येण्यास देखील मदत होते.
  • मधुमेहात फायदेशीर.
  • लहान मुलांमधील कुपोषण टाळण्यास किंवा कमी करण्यास उपयोगी.
  • टीप ः शेवगा पावडर आहारात वापरण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. संपर्क ः माधुरी रेवणवार, ९४०३९६२०१४ (गृह विज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com