वासरांची लहानपणापासून योग्य देखभाल आणि चांगले पोषण असेल तर मोठेपणी कालवडींपासून चांगले उत्पादन मिळते.
वासरांची लहानपणापासून योग्य देखभाल आणि चांगले पोषण असेल तर मोठेपणी कालवडींपासून चांगले उत्पादन मिळते.

नवजात वासरांचे पोषण

नवजात वासरे कालवडींचे वैज्ञानिक पद्धतीने पालन पोषण केल्यास मृत्युदरावर नियंत्रण तर होतेच, शिवाय भविष्यात चांगली दुधाळ जनावरे तयार होतात.   नवजात वासरांकडे लहानपणापासूनच लक्ष देणे गरजेचे असते. लहानपणापासून योग्य देखभाल आणि चांगले पोषण असेल तर मोठेपणी या कालवडींपासून चांगले उत्पादन मिळते. याकरिता वयोमानानुसार आहार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. नवजात वासरांच्या पोषणपद्धती पोषणाच्या मुख्यत्वे करून दोन पद्धती आहेत. १. पारंपरिक पद्धत या पद्धतीमध्ये वासरांना आई सोबत ठेवले जाते. आवश्यकतेनुसार व मर्जीनुसार आईचे दूध पिण्यासाठी सोडले जाते. मोठ्या प्रमाणावर ही पद्धत अवलंबली जाते, परंतु ही पद्धत अवैज्ञानिक आहे. २. वैज्ञानिक पद्धत ही पद्धत आजकाल प्रगत डेअरी फार्मवर अवलंबली जाते. वासरु जन्मल्यानंतर आईपासून वेगळे केले जाते. त्यांना कृत्रिम साधनांद्वारे आईचे दूध निश्चित मात्रेत व निश्चित वेळेवर पाजतात. याशिवाय अन्य आहारदेखील निश्चित मात्रेत दिला जातो. वैज्ञानिक पद्धतीचे फायदे

  • वासराला दिला जाणारा आहार योग्य मात्रेत स्वच्छ, गुणवत्तापूर्ण व संतुलित असतो.
  • गाई किंवा म्हशीचे दूध उत्पादन अचूकपणे मोजता येते.
  • वासरांकडून गायीचा सडांना होणाऱ्या­ इजा टाळता येतात.
  • आईकडून संक्रमित होणा­ऱ्या आजारांपासून वासरांचा बचाव करता येतो.
  • वासरांचा आकस्मितपणे मृत्यू जरी झाला तरी गायीच्या दूध उत्पादनावर विपरित परिणाम होत नाही.
  • या पद्धतीद्वारे पशुपोषणावर होणाऱ्या खर्चाचे अचूक आकलन होते. म्हणून अधिक नफ्यासाठी कालवडी / वगारींना वैज्ञानिक पद्धतीने पोषण द्यावे.
  • वासरांना चीक पाजण्याचे फायदे नवजात वासरांना जन्मानंतर दोन तासाच्या आत चीक पाजावा. त्या नंतर पुढील तीन ते चार दिवस त्यांच्या वजनाच्या दहा टक्के (साधारणत: २ ते २.५ किलो) चीक प्रतिदिवस द्यावा. चीक गरम न करताच ताजा द्यावा. हा चीक पाजल्याने कालवडी/वगारींना खालील लाभ होतात.

  • चिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते (साधारणपणे १७ टक्के). या प्रथिनांमध्ये मुख्यत्वेकरून ग्लोब्युलिन असते, ज्यामध्ये संक्रामक आजारापासून बचाव करणारे तत्त्व (अँटिबॉडीज) असतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्त्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजलाच पाहिजे.
  • जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात जी वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आवश्यक असतात.
  • चीक पचण्यास अवघड असतो, परंतु नवजात वासरांचे पहिले शेण बाहेर पडण्यास चीक मदत होते, त्यामुळे वासरांचे पोट साफ होते.
  • जर चीक पाजल्यानंतरही वासराने शेण टाकले नाही तर एक लिटर कोमट पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा टाकून एनिमा करावा.
  • चौथ्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत वासरांना वजनाच्या दहा टक्के दूध पाजावे. दूध पाजण्यासाठी वापरात येणारे भांडे नेहमी गरम पाणी व साबणाने स्वच्छ करावे.
  • वासराचे आहार व्यवस्थापन

  • पंधराव्या दिवसापासून दूध हळूहळू कमी करावे. दुधावरची साय काढून टाकलेले दूध वासरांना द्यावे. चांगल्या प्रकारे कुट्टी केलेला कडबा व कोवळे गवत सुरू करावे. यांचे प्रमाण हळूहळू वाढवावे.
  • चौथ्या महिन्यापासून हिरवा चारा देण्यास सुरवात करावी. जर द्विदल वनस्पतींचा चारा उपलब्ध असेल तर हा चारा ३-४ तास सूर्यप्रकाशात वाळवावा आणि नंतरच वासरांना खण्यास द्यावा; अन्यथा या चाऱ्याने वासरांना पोटफुगी होण्याची शक्यता असते.
  • द्विदल वनस्पतींचा चारा अत्यंत पौष्टिक असतो. अर्थात हया चा­याची मात्रा थोडी थोडी करून वाढवावी.
  • सहा महिन्यांच्या वयात वासराचे कोठीपोट चांगल्याप्रकारे विकसित होते. शिवाय या वयात सर्व प्रकारचा चारा पचनीय असतो, मात्र वासरू निरोगी राहावे व त्यांचा विकास योग्यरीतीने व्हावा यासाठी वासरांच्या आहारात अचानकपणे बदल करू नये.
  • कोणत्याही नवीन आहाराची पचण्याची क्षमता ही पचन संस्थेमध्ये हळूहळू विकसित होते. वासरांना नेहमीच पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे. पाणी पाजण्यासाठी उपयोगात येणारे भांडी, टाक्या यांची नियमित सफाई करावी.
  • सहा महिन्यांच्या कालवडी/वगारींच्या पोषक तत्वाची गरज ही हिरव्या चा­ऱ्यासोबतच भुसा किंवा अन्य चारा दिल्याने भागते.
  • द्विदल वनस्पतींचा हिरवा चारा उपलब्ध नसेल तर एकदल वनस्पतींचा हिरवा चारा द्यावा. सोबतच विविध डाळींचा भरडा द्यावा. हिरवा चारा/ कडबा नेहमी कुट्टी करूनच द्यावा यामुळे चा­ऱ्याची बचत होते
  • संपर्क ः डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com