अाहारात असावा चुका, शेपू, चाकवत

समतोल अाहार
समतोल अाहार

अाहारात क्षार व जीवनसत्त्वे ताज्या भाज्यांमधून मिळतात. शरीराची विविध जीवनसत्त्वांची गरज विविध पालेभाज्यांमधून पूर्ण होते. त्यामुळे अाहारात पालोभाज्यांचा समावेश असावा. आंबटचुका

  • अांबट चुक्यामध्ये प्रथिने १.६ टक्के, कॅल्शिअम ६३ मिली ग्रॅम, फाॅस्फरस- १७८ मिली ग्रॅम, लोह ८.७ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व १२ मिली असतात.
  • बाराही महिने मिळणाऱ्या चुक्याच्या भाजीची छोटी पाने अाणि देठ भाजीकरिता वापरतात.
  • चुका उष्ण, पाचक व वातानुलोमन करणारा आहे.
  • पचायला कठीण असणाऱ्या पदार्थाबरोबर चुक्याची पाने वापरावी.
  • शेपू

  • शेपूमध्ये प्रथिने ३.० टक्के, कॅल्शिअम १९० मिली ग्रॅम, फाॅस्फरस- ४२ मिली ग्रॅम, लोह १७.४ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व २५ मिली असतात.
  • शेपूची भाजी रेचक, पचायला हलकी असल्याने त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते.
  • शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होते. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे.
  • करडी

  • करडी भाजीमध्ये प्रथिने २.५ टक्के, कॅल्शिअम १८५ मिली ग्रॅम, फाॅस्फरस- ३५ मिली ग्रॅम, लोह ५.७ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व १५ मिली असतात.
  • ही पालेभाजी खूप उष्ण आहे. चरबी वाढू नये म्हणून करडीच्या तेलाचा उपयोग करतात.
  • कफ प्रकृतीच्या लठ्ठ व्यक्तींना करडईची भाजी उपयुक्त आहे. राजगिरा
  • राजगिरा भाजीमध्ये प्रथिने ५.९ टक्के, कॅल्शिअम ५३० मिली ग्रॅम, फाॅस्फरस- ६० मिली ग्रॅम, लोह १८.४ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व ८१ मिली ग्रॅम असतात.
  • ही पालेभाजी रक्तशुद्धीकरिता उपयुक्त आहे.
  • शरीरस्वास्थ्याकरिता लागणारी द्रव्ये राजगिरा पाने व बिया या दोन्हींमध्ये असतात.
  • तांदुळजा

  • तांदुळजा भाजीमध्ये प्रथिने ४.० टक्के, कॅल्शिअम ३९७ मिली ग्रॅम, फाॅस्फरस-८३ मिली ग्रॅम, लोह २५.५ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व ९९ मिली ग्रॅम असतात.
  • तांदुळजा लाल, हिरवा कुठेही केव्हाही सहज येतो ज्यांना शरीरात सी जीवनसत्त्व हवे आहे त्यांनी तांदुळजाची भाजी खावी ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध व शीतवीर्य आहे.
  • उष्णतेच्या तापात विशेषत गोवर, कांजिण्या व तीव्र तापात फार उपयुक्त आहे.
  • नेत्रविकार, पित्तविकार, मूळव्याध, यकृत व पांथरी वाढणे या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी.
  • चाकवत (चंदन बटवा)

  • चाकवत भाजीमध्ये प्रथिने ३.७ टक्के, कॅल्शिअम १५० मिली ग्रॅम, फाॅस्फरस ८० मिली ग्रॅम, लोह ४.२ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व ३५ मिली ग्रॅम असतात.
  • चाकवतमध्ये लोह, क्षार, कॅरोटिन, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियमयुक्त आहे. चाकवत डोळे, लघवी व पोटासंबंधी तक्रारीसाठी विशेष लाभदायक आहे.
  •   विषय विशेषज्ञ(गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com