पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...

 ट्रॅक्टरचलीत टोकण यंत्र अाणि ट्रॅक्टरचलीत बहुपीक टोकण यंत्र
ट्रॅक्टरचलीत टोकण यंत्र अाणि ट्रॅक्टरचलीत बहुपीक टोकण यंत्र

बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा प्रकार बदलू शकतो. काही पिकांच्या पेरणीमध्ये दोन ओळीतील अंतर समान राखावे लागते, तर काही पिकांच्या दोन ओळीतील व दोन रोपातील अंतर एकसमान ठेवावे लागते. यासाठी पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो. टोकण यंत्र

  • मका, हरभरा इत्यादी पिकांची टोकण पद्धतीने पेरणी करताना वाकून एका हातात बियाणे व एका हाताने बोटाच्या किंवा काडीच्या साह्याने जमिनीत बी टोकले जाते. प्रत्येक वेळेस बी टोकताना वाकावे लागते. पिकाची पेरणी करताना २-३ तास सहज काम करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. यामध्ये श्रम जास्त लागते तसेच प्रत्येक वेळेस वाकावे लागत असल्यामुळे कमरेत ताण येतो यामुळे आवश्यक कार्यक्षमता मिळत नाही परिणामी कामाचा वेग कमी असतो.
  • बियाणे टोकण यंत्र वापरले असता टोकण करताना वाकावे लागत नाही. चालता चालता उभे राहून सहजरीत्या टोकण करता येते, यामुळे लागणारे श्रम व थकवा कमी होऊन मजुरांची कार्यक्षमता वाढते.
  • यंत्राची वैशिष्ट्ये

  • उभे राहून चालता चालता बियाणे टोकण करता येते.
  • यंत्र वापरण्यास सहज सोपे व आरामदायक आहे.
  • बियाणे एकसमान खोलीवर टोकत येते.
  • कोरड्या किंवा वाफसा असलेल्या जमिनीत टोकण करता येते.
  • यंत्राबरोबर बियाणे ठेवण्यासाठी दिलेल्या पिशवीत बियाणे ठेवता येते, जी कमरेला बांधता येते.
  • यंत्राच्या पाइपची लांबी १०० सें.मी व व्यास १ सं.मी इतका आहे.
  • यंत्राच्या वरच्या बाजूस बियाणे टाकण्यासाठी नरसाळ्याचा आकार बसवलेला आहे, जेणेकरून बियाणे त्यात टाकणे सोपे होते.
  • टोकण यंत्राला दिलेल्या लिवरच्या साह्याने यंत्राच्या खालचे तोंड चालू व बंद करता करता येते, त्यामुळे टाकलेले बियाणे जमिनीत टोकले जाते.
  • बैलचलित बहुपीक टोकण यंत्र:

  • भुईमूग, करडई, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी, मका, गहू, हरभरा, इत्यादी पिकांची टोकण करता येते.
  • बियाण्याबरोबरच दाणेदार खत २५ते ७०० किलो प्रतिहेक्टरी शिफारशीनुसार देता येते.
  • दोन ओळींतील अंतर पिकाच्या आवश्यकतेनुसार २२.५,३० किंवा ४५ सें.मी.. राखता येते.
  • ओळींतील रोपात साधारणतः शिफारशीनुसार योग्य अंतर राखता येते. याकरिता प्रत्येक पिकासाठी वेगळ्या तबकड्या टोकण यंत्राबरोबर उपलब्ध असतात.
  • रक्टरचलित ज्योती बहुपीक टोकण यंत्र

    भुईमूग, करडई, सूर्यफूल, वारी, मका, गहू, हरभरा, इत्यादी पिकांची टोकण करता येते. बियाण्याबरोबरच दाणेदार खत शिफारशीनुसार देता येते. दोन ओळींतील अंतर: २२.५ ते ४५ से.मी. फणांची संख्या: ५ते९ (दोन ओळींतील अंतराप्रमाणे) ओढण शक्ती: ३५ एच.पी.ट्रॅक्टर कार्यक्षमताः ३ ते३.५ हेक्टर प्रतिदिन ट्रक्टरचलित सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलीत सरी वरंबा बहुपीक टोकण यंत्र विकसित केले आहे.
  • हे यंत्र ५५ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरने चालविता येते. या यंत्राने बियाणाची टोकण ४.३२ सें.मी.खोलीवर करता येते.
  • यंत्राने होणाऱ्या कामाची रुंदी १८० सें.मी एवढी करता येते.
  • यंत्राद्वारे एका तासात ०.४५ हे. क्षेत्रावर टोकण करता येते. या यंत्राद्वारे सरी वरंबा पद्धतीने बियाण्याची लागवड करण्यासठी सरीच्या अंतरानुसार लागवडीचे अंतर बदलता येते.
  • ट्रॅक्टरचलित टोकण यंत्र

  • यंत्रामध्ये दोन ओळीतील अंतर समान ठेवता येते. त्याचबरोबर दोन रोपातील अंतर एकसारखे ठेवता येते.
  • यामध्ये सीड ड्रिलप्रमाणे फ्लूटेड रोलर नसून प्लॅस्टिकच्या ठरावीक अंतरावर खाचा असलेल्या चकत्या असतात. या चकत्यांची मांडणी उभी असते. जेव्हा ग्राउंड व्हील फिरते त्यापासून मिळणारी ऊर्जा एका विशिष्ट गिअर रेशोमध्ये चकत्यांना दिली जाते. या चकत्या जेव्हा फिरतात तेव्हा त्यांच्या खाचांमध्ये एक किंवा दोन बिया बसतात. त्या पुढे बसविलेल्या टोकण यंत्राच्या नळीमध्ये फेकल्या जातात.
  • चकत्या उभ्या असतील तर त्याला `व्हर्टिकल प्लेट प्लांटर` असे म्हणतात आणि जर तिरक्या असतील तर `तिरकस प्लेट प्लांटर` असे म्हणतात.
  • संपर्क ः वैभव सुर्यवंशी,९७३०६९६५५४ (विषय विशेषज्ञ(कृषि शक्ती आणि अवजारे), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com