Agriculture story in marathi, impliments for vegetable processing | Agrowon

सुधारित यंत्रामुळे वाढेल उत्पादनांची गुणवत्ता
डॉ. एस. डी. कुलकर्णी
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन आपल्या भागामध्ये होते, त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू करणे शक्‍य आहे. भाज्या वाळवण्याच्या उद्योगासाठी मुख्य यंत्रांमध्ये भाजी धुण्याची यंत्रणा, भाज्यांचे अनुपयोगी भाग काढून टाकण्यासाठी टेबल, चाकू, उष्णता प्रक्रियासाठी ब्लांचर, ड्रायर, वाळवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारा ड्रायर व मेकॅनिकल ड्रायरची गरज आहे. यामुळे वाळवणीचा खर्च कमी होतो.

वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन आपल्या भागामध्ये होते, त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू करणे शक्‍य आहे. भाज्या वाळवण्याच्या उद्योगासाठी मुख्य यंत्रांमध्ये भाजी धुण्याची यंत्रणा, भाज्यांचे अनुपयोगी भाग काढून टाकण्यासाठी टेबल, चाकू, उष्णता प्रक्रियासाठी ब्लांचर, ड्रायर, वाळवण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारा ड्रायर व मेकॅनिकल ड्रायरची गरज आहे. यामुळे वाळवणीचा खर्च कमी होतो.

विशिष्ट तापमानावर भाज्या वाळवाव्या लागतात.वाळवलेल्या भाज्या चांगल्या राहाव्यात यासाठी उष्णता प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया वेगवेगळ्या भाज्यांसाठी थोड्याफार फरकाने वेगवेगळी असते. ही प्रक्रिया पद्धती नीट समजण्यासाठी प्रशिक्षण घेतले पाहिजे. अशा उद्योगासाठी दीड ते दोन लाख रुपयांचे भांडवल आवश्‍यक असते.

बरेचसे गृहउद्योग विविध पदार्थ तयार करून विकतात लोणची व चटणी जर चांगल्या गुणवत्तेसहित तयार केली तर त्यांना शहरात तसेच देशाबाहेरही मागणी वाढू शकते. हिरवी मिरची, गाजर, कोबी आले, वांगे, इत्यादीची लोणची तयार केली जातात. वर्षभर हिरवी व लाल मिरची वापरून तयार केलेल्या ठेच्याला मागणी असते. 

कैरीपासून आमचूर पावडर हा एक चांगला पदार्थ आहे.
काहीवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे भाज्या व फळांचे थोडे नुकसान होते. अशा शेतमालावर  प्रक्रिया करून आर्थिक लाभ मिळवता येतो. वादळ-वारे आल्यावर बऱ्याचदा कैऱ्या झाडावरून पडतात. थोडेसे नुकसान झाल्यामुळे दर मिळत नाही. अशा कैऱ्यांवर प्रक्रिया करून त्यापासून आमचूर (प्रक्रिया केलेली पावडर) तयार करता येते. आंबा कोईपासून तेल काढता येते. तसेच स्टार्च तयार करता येतो. केळी खोडाच्या सालीपासून धागे निर्मिती करता येते.  

बटाट्याच्या चकत्या करणारे यंत्र
आपल्याकडे वर्षभर बटाटे मिळतात. ग्राम स्तरावर बटाट्याच्या चकत्या तयार करण्याचा उद्योग चांगल्या प्रकारे चालू शकतो. बटाट्याची पावडर (पीठ) हा एक चांगला लघू उद्योग आहे.

या उद्योगासाठी बटाटा साल काढण्याचे यंत्र, बटाट्याच्या चकत्या तयार करण्याचे आणि वाळवण्याचे यंत्र आवश्‍यक असते. त्याचबरोबर वजन करणे व पॅक करण्याचे लहानसे यंत्र गरजेचे अाहे. वाळवण्यासाठी सोलर ड्रायरचा वापर करावा. बटाट्याचे साल काढणे, चकत्या बनवण्याचे यंत्र भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले आहे.

संपर्क : डॉ. एस. डी. कुलकर्णी,  ९७५२२७५३०४
(लेखक  केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था,
भोपाळ येथे कार्यरत होते)

 

 

टॅग्स

इतर टेक्नोवन
शेततळ्यातील बाष्पीभवन रोखण्याचे विविध...सध्या सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. पिके...
हरितगृहातील प्रकाशाचे नियंत्रण...हरितगृहातील प्रकाशाच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी...
गूळ प्रक्रियेच्या आधुनिक पद्धतीआरोग्यासाठी गूळ उत्तम असून, त्याची लोकप्रियता...
जलनियंत्रण बॉक्सद्वारे कमी करता येईल...अधिक काळ पाण्याखाली राहत असलेल्या जमिनीतून...
योग्य पद्धतीनेच वापरा पॉवर टिलर पॉवर टिलर चालू करीत असताना डेप्थ रेग्युलेटर चालू...
शेतात केले पेरणी ते मळणी यांत्रिकीकरणनंदुरबार जिल्ह्यातील आडगाव (ता. शहादा) येथील...
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल...सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत....
छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभया वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी...
पेरणी यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो...बियाण्यांच्या लहान मोठ्या अाकरावरून पेरणीचा...
कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर)...
पाच मिनिटांत एका एकरवर फवारणी !...शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आले पाहिजे, असे जो तो...
रोपांच्या मुळांची गुंडाळी टाळण्यासाठी...ट्रे किंवा प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपांची...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सुधारित अवजारे करतात कष्ट कमीवैभव विळा : १) गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत...
सुधारित ट्रेलरमुळे कमी होईल अपघाताचे...ट्रॅक्टर व उसाने भरलेला ट्रेलर हे ग्रामीण...
कांदा बी पेरणी यंत्राने लागवड खर्चात बचतश्रीरामपूर (जि. नगर) येथे साधारण बारा वर्षांपासून...
मका उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी...विविध पिकांची लागवड देशभरामध्ये होत असते. मात्र,...
मळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...
योग्य पद्धतीने वापरा मळणी यंत्रसुरक्षित मळणी करण्यासाठी आयएसआय मार्क असलेले...
घरीच तयार करा सौरकुकरआपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे,...