Agriculture story in Marathi, imporatnce of green fodder in livestock feed | Agrowon

जनावरांच्या अाहारात हिरवा चारा महत्त्वाचा
डॉ. सुनीत वानखेडे, डॉ. रुपेश कोल्हे, डॉ. आनंद रत्नपारखी
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

जनावरांच्या आहारातील खुराक हा दूध उत्पादन आणि चाऱ्याचे प्रमाण हे शारीरिक वजनावरून ठरविले जाते. सकस हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जनावरांच्या संख्येनुसार चाऱ्याचे नियोजन करावे.
 

जनावरांच्या आहारातील खुराक हा दूध उत्पादन आणि चाऱ्याचे प्रमाण हे शारीरिक वजनावरून ठरविले जाते. सकस हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जनावरांच्या संख्येनुसार चाऱ्याचे नियोजन करावे.
 
जनावरांच्या समतोल आहाराच्या दृष्टीने खुराक, हिरवा चारा, वाळलेला चारा यांचे योग्य प्रमाण असावे लागते. जनावराच्या शारीरिक वाढीसाठी व दुग्ध उत्पादनासाठी आवश्‍यक असणारी पोषणमूल्ये सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्यापासून मिळतात. सकस हिरव्या चाऱ्यात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामधील पोषणमूल्ये सहज विद्राव्य स्वरूपात मिळतात. त्यामुळेच हिरवा चारा पचनास हलका असतो प्रत्येक जनावराची दूध उत्पादनाची ठराविक क्षमता असते. त्या शक्तीचा पुरेपूर वापर करून घेणे व्यावसायाच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते.

जनावराची दुग्धोत्पादनाची क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यासाठी जनावरांचा संतुलित अाहार देणे अावश्‍यक अाहे. जनावरांच्या आहारात चाऱ्याचे ६५-७० टक्के प्रमाण आवश्‍यक असते. त्यातही दुभत्या जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचे महत्त्व असाधारण आहे.

चाऱ्याचे प्रकार

 • जनावराच्या चाऱ्याचे वाळलेला चारा व हिरवा चारा असे दोन प्रकार असतात. परंतु कोणताही हिरवा चारा हा सकस असतोच असे नाही. ज्या हिरव्या चाऱ्याचे पोषणमूल्य जास्त असते, त्याला सकस हिरवा चारा म्हणतात.
 • सकस हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल व द्विदलवर्गीय चारापिके असतात.
 • सकस हिरव्या चाऱ्याचे नियोजन म्हणजे भविष्यात लागणाऱ्या चाऱ्याचा वर्षभर पुरवठा होण्यासाठी जनावरांची संख्या अाणि उपलब्ध क्षेत्र, हंगामानुसार चारा पिकाची निवड, सुधारित वाणांचा वापर, आधुनिक लागवड तंत्र आणि एकदल व द्विदल चारा पिकांचे योग्य प्रमाणात मिश्रण याचा जनावराच्या अाहारात अंतर्भाव असणे.
 • हिरव्या चाऱ्यासाठी प्रामुख्याने ज्वारी, मका, बाजरी, संकरित नेपिअर, गिनीगवत, ओट, दिनानाथ, यशवंत, जयवंत गवत इ. एकदलीय अाणि चवळी, लसूणघास, बरसीम स्टायलो हे द्विदलीय चारापिके घेता येतात.
 • पोषणमूल्यांच्या दृष्टीने द्विदलीय चारापिके सकस असतात. कारण त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. एकदलीय वैरणीत प्रथिनांचे प्रमाण ४ ते ७ टक्के असते, तर द्विदलीय वैरणीत ते १५ ते २० टक्के असते.

हिरव्या चाऱ्याचे आहारातील महत्त्व

 • हिरव्या चाऱ्यामध्ये वाळलेल्या चाऱ्याच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण अधिक असते. हिरवा चारा चवदार असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. त्यामुळे चारा वाया जात नाही.
 • जनावरांना सहज विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा होतो. त्यामुळे हा चारा पचनास सुलभ असतो.
 • द्विदलीय हिरव्या चाऱ्यातून खनिज व प्रथिनांचा पुरवठा होतो.
 • हिरवा चारा रुचकर, रसदार असल्यामुळे पौष्टिक असतो. त्याच्या सेवनामुळे जनावरांची भूक भागविण्यास मदत होते.
 • हिरवा चारा नेहमी दिल्यामुळे जनावरांचे स्वास्थ्य चांगले टिकून राहते.
 • जनावरास ताजी पोषकद्रव्ये नैसर्गिक स्वरूपात मिळत असल्यामुळे चाऱ्यातील पोषक घटकांचा शरीराला चांगला फायदा होतो.
 • जनावरांच्या शरीरात जीवनसत्त्व अ (कॅरोटिन)चा पुरवठा होऊन रातांधळेपणा टाळण्यास मदत होते. त्वचाही उत्तम राहते.
 • तंतुमय पदार्थ जनावरांच्या शरीराला मिळतात त्यामुळे जनावरांना मलावरोधाचा त्रास होत नाही.
 • हिरव्या चाऱ्यातील अधिकाधिक घटक विद्राव्य स्वरूपात असतात. त्यामुळे पचनाचा जनावरांच्या शरीरावर ताण पडत नाही.
 • आर्जीनीन, ग्लुटॅमिक आम्लासारख्या महत्त्वाच्या आम्लाचा शरीराला पुरवठा होतो.
 • गर्भावस्थेतील जनावरांच्या आहारातून हिरवा चारा पूर्णपणे वगळल्यास जन्मणारी वासरे कमजोर, आंधळी अथवा अन्य शारीरिक अपंगत्व घेऊन जन्माला येतात.
 • जनावरांचे किमान ८ लिटर दूध केवळ संतुलित पौष्टिक हिरवा चारा देऊन टिकविता येऊ शकते.
 • अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक काळ उत्तमरीत्या टिकवून ठेवण्याकरिता हिरवा चारा दैनंदिन आहारात देणे गरजेचे आहे.

संपर्क ः डॉ. रुपेश कोल्हे, ७५०७९९१९८९
(स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

इतर कृषिपूरक
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...
रेबीज रोगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची...पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज या...
दूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजनादुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर...
जनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचनबऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून...
पशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजनाजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण...
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...
दुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...
दुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...