Agriculture story in Marathi, imporatnce of mineral mixture in buffalo feed | Agrowon

म्हशींना खाद्यासोबत द्या खनिज मिश्रणे
डॉ. एम. व्ही. इंगवले
बुधवार, 24 जानेवारी 2018

म्हशीच्या चयापचय क्रियेसाठी, शारीरिक वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्तीकरिता, दूध उत्पादन वाढ व उत्पादन टिकून राहण्याकरिता, गर्भातील वासराच्या वाढीसाठी, प्रजनन क्षमता उत्तम राहण्याकरिता विविध क्षारांची मुबलक प्रमाणात आवश्‍यकता असते. म्हशीच्या आहारातील चारा, पशुखाद्यामधून पूर्ण होत नाही. याकरिता खाद्यासोबत जीवनसत्त्वयुक्त खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.
 
अाहारातील खनिज मिश्रण/ क्षार मिश्रणाचे महत्त्व

म्हशीच्या चयापचय क्रियेसाठी, शारीरिक वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्तीकरिता, दूध उत्पादन वाढ व उत्पादन टिकून राहण्याकरिता, गर्भातील वासराच्या वाढीसाठी, प्रजनन क्षमता उत्तम राहण्याकरिता विविध क्षारांची मुबलक प्रमाणात आवश्‍यकता असते. म्हशीच्या आहारातील चारा, पशुखाद्यामधून पूर्ण होत नाही. याकरिता खाद्यासोबत जीवनसत्त्वयुक्त खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.
 
अाहारातील खनिज मिश्रण/ क्षार मिश्रणाचे महत्त्व

  • कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच मॅग्नेशिअम व क्षाराचा दूध उत्पादन व चयापचयामध्ये प्रमुख उपयोग होतो; म्हणून याचा वापर दररोज करावा.
  • झिंक, मॅग्नीज, सेलेनियम, आयोडीन यांसारखे सूक्ष्म क्षार रोगप्रतिकारकशक्ती तसेच प्रजनन कार्यात अत्यंत गरजेचे आहेत.
  • क्षार मिश्रणामुळे खाल्लेल्या आहाराची पाचकता सुधारते.
  • रेडकांची वाढ जोमाने होते.
  • विण्याच्या जवळपास होणारे आजार तसेच चयापचयाचा रोग (मिल्क फिवर, किटोसीस इ.) प्रतिबंध होतो.
  • म्हशीची प्रजननक्षमता चांगली होऊन उत्पादन वाढते.
  • चांगल्या प्रतीचे खनिज मिश्रण योग्य प्रमाणात म्हशींना द्यावे.

दुग्धोत्पादनाकरिता पाण्याचे महत्त्व

  • पाणी हा आहारासोबत आवश्‍यक घटक असून, म्हशींना पिण्यास स्वच्छ, गोड व जंतुविरहित पाणी देणे गरजेचे आहे.
  • म्हशीचे पाणी पिण्याचे प्रमाण शरीराचा आकार, चारा, हवामान, गाभण स्थिती व दूध उत्पादन क्षमता इ. गोष्टींवर अवलंबून असते.
  • सरासरी १ लिटर दूध उत्पादनाकरिता ५ लिटर पाण्याची गरज असते, यामुळे जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हशींना सतत पाण्याचा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे.
  • म्हशींना सतत पाणीपुरवठा नसेल तर दिवसातून चार वेळा पाणी द्यावे.
  • उन्हाळ्यामध्ये पाण्याची आवश्‍यकता जास्त असते यामुळे थंड पाणी द्यावे.
  • पाणी पिण्याचा हौद स्वच्छ असावा व दर महिन्यांनी हौदाला चुना लावावा.
  • आजारी व रोगी म्हशींसाठी शक्‍यतो पाण्याची स्वतंत्र व्यवस्था असावी.
  • क्षारयुक्त तसेच जड, अस्वच्छ पाणी म्हशींना देऊ नये.

संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला.

इतर कृषिपूरक
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...
प्रतिबंधात्मक उपचारांनी टाळा जनावरांतील... जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघात...
देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या...
स्वच्छता, योग्य व्यवस्थापनातून टाळा...शेडमधील अस्वच्छता अाणि अनियोजित व्यवस्थापनामुळे...
पूर्वतयारीनेच करा मत्स्यबीजाचे संवर्धनमत्स्यसंवर्धनामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास...
कृत्रिम बुद्धिमत्ता करते गाईंच्या...परदेशातील पशुपालकांकडे पीक लागवड क्षेत्राच्या...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
पशुपालन सल्ला शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी दोन वर्षाला...
जनावरांमध्ये वजन मापनाचे महत्त्वजनावरांना दैनंदिन व्यवस्थापनात त्यांच्या शरीर...
अोळखा जनावरांतील शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
उत्तम आर्थिक नियोजनातून व्यावसायिक...आंतरवाली (ता. नेवासा, जि. नगर) येथील अंकुश कानडे...
पशुपालन सल्लावाढत्‍या उष्‍णतेमुळे जनावरांच्या आहारावर विपरीत...
जिरायती भागात आठ वर्षे यशस्वी पोल्ट्री...चिंचनेर वंदन (ता. जि. सातारा) या सैनिकी परंपरा...
शस्त्रक्रियेने बरा होतो जनावरांतील...मूतखडा हा रोग प्रमुख्याने खच्चीकरण केलेला बैल,...
जनावरांतील गर्भाशय संसर्ग ः लक्षणे अन् ...प्रसूतीनंतर उद्‌भवणारा गर्भाशय संसर्ग हा त्या...
कुक्कुटपालन सल्लाकुक्कुटपालन व्यवसायात ६५ टक्के फायदा...
गाभण गाईंचे योग्य व्यवस्थापन ठेवा...गाभण गाईची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. गर्भाची...
जनावरांमध्ये ताणाची तीव्रता मोजण्यासाठी...उन्हाळ्यातील वाढते तापमान अाणि आर्द्रतेमुळे...