अाहारातून जनावरांना करा खनिजांचा पुरवठा

जनावरांना खनिजांचा पुरवठा होण्यासाठी गोठ्यामध्ये खनिजमिश्रणाच्या चाटणविटा ठेवाव्यात.
जनावरांना खनिजांचा पुरवठा होण्यासाठी गोठ्यामध्ये खनिजमिश्रणाच्या चाटणविटा ठेवाव्यात.
सूक्ष्म खनिजे शरीराला अतिशय कमी प्रमाणात आवश्‍यक असतात, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये आणि खासकरून गाभण आणि दुधाळ जनावरांमध्ये विविध समस्या निर्माण होऊन उत्पादनात घट होते. परिणामी, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. खनिजांचे शरीराच्या आवश्‍यकतेनुसार मोठी आणि सूक्ष्म खनिजे असे प्रकार पडतात. मोठ्या खनिजांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडिअम, क्लोरिन, सल्फर, मॅग्नेशिअम इ. महत्त्वाचे आहेत, तर सूक्ष्म खनिजांमध्ये लोह, झिंक, कॉपर, मॉलिबडेनम या खनिजांचा समावेश होतो. खनिजांची आवश्‍यकता इतर पोषणमूल्यांप्रमाणे गाभण काळात, तसेच विल्यानंतर (दुग्ध) उत्पादनाच्या काळात अधिक असते. यातील सूक्ष्म खनिजांबाबत आपण समजून घेणार आहोत. स्रोत
  • जनावरांना चारा (हिरवा आणि कोरडा) व इतर खाद्य (ढेप/पेंड) यामधून खनिजे पुरविली जातात. यामधील खनिजांचे प्रमाण हे भौगोलिक रचनेच्या वैविध्यतेनुसार जमिनीतील खनिजांची उपलब्धता, गवत, झाडपाला, पिकाचे अवशेष त्यांच्या वाढीची स्थिती यांवर अवलंबून असते, तसेच बदलत्या हवामानाचाही यावर परिणाम झाल्याचे आढळते.
  • हिरवा चारा/धान्य, मुरघास यामध्ये सूक्ष्म खनिजांचे प्रमाण अधिक असते. सामान्यतः द्विदल धान्यामध्ये आणि त्यांच्या चाऱ्यामध्ये गवताच्या चाऱ्याच्या प्रमाणात खनिजाचे प्रमाण अधिक असते. जनावरांना देण्यात येणारा चारा/आहार हा इतर पोषकघटकांनी जरी युक्त असला, तरी त्यामध्ये खनिजांची कमतरता आढळते.
  • दुभत्या जनावरांवर अधिकाधिक उत्पादनासाठी आणि निरोगी वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. तरीसुद्धा गाभण काळात आणि विल्यानंतर दुग्धउत्पादना दरम्यान विविध समस्या निर्माण होतात. या समस्या उद्‌भवण्याची कारणे शेतकऱ्यांना बहुधा अनभिज्ञ असतात अाणि उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. यातील बहुतेक समस्या या सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे होतात.
  • सूक्ष्म खनिजे देण्याचे प्रमाण
  • जनावरांना खाद्यातून खनिज मिश्रणाचा पुरवठा नियमितपणे करणे आवश्‍यक असते. सूक्ष्म खनिजांची आवश्‍यकता ही जनावरांची शारीरिक अवस्था, वय, गाभणकाळ दूध देण्याचे प्रमाण, शरीरातील खनिजाचे प्रमाण/उपलब्धता यावर अवलंबून असते.
  • विविध भौगोलिक रचनेनुसार मातीमध्ये विशिष्ट खनिजाची प्रामुख्याने कमतरता जाणवते. त्यानुसारही खनिजाची उपलब्धता जनावरांना करून घ्यावी.
  • खनिजे आवश्‍यकतेपेक्षा जास्त प्रमाणात दिल्यास त्याचे शरीरावर विपरीत परिणाम झाल्याचे आढळतात. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने, आवश्‍यकतेनुसार जनावरांना खाद्यातून खनिजे पुरवावी.
  • संपर्क ः डॉ. गजानन जाधव, ७५८८६८९७४७ (स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
     

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com