Agriculture story in Marathi, imporatnce of mineral mixture in livestock feed | Agrowon

खनिज पुरवठ्यामुळे वाढते प्रजननक्षमता
डॉ. गजानन जाधव, डॉ. सुनीत वानखेडे
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे अाजार उद्भवतात. यामध्ये प्रजननाशी संबंधित अाजारांचे जास्त प्रमाण अाहे. यामध्ये गर्भपात, लवकर माजावर न येणे, मुका माज दाखविणे, शारीरिक वाढ मंदावने, गर्भधारणेचा दर कमी होणे इ. अाजारांचा सामवेश होतो. हे अाजार अोळखून वेळीच उपचार होणे गरजेचे असते.
 

सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये विविध प्रकारचे अाजार उद्भवतात. यामध्ये प्रजननाशी संबंधित अाजारांचे जास्त प्रमाण अाहे. यामध्ये गर्भपात, लवकर माजावर न येणे, मुका माज दाखविणे, शारीरिक वाढ मंदावने, गर्भधारणेचा दर कमी होणे इ. अाजारांचा सामवेश होतो. हे अाजार अोळखून वेळीच उपचार होणे गरजेचे असते.
 
सर्व प्रकारच्या गाभण, दुधाळ, गायी, म्हशी, पैदाशीचा वळू, रेडे, मांसल शेळ्या, मेंढ्या जनावरांच्या निरोगी वाढीसाठी आणि उत्तम उत्पादनासाठी विविध पोषण मूल्यांची आवश्‍यकता असते. त्यामध्ये खनिज हा शरीराला आवश्‍यक असणाऱ्या मूलभूत पोषण मूल्यांपैकी अविभाज्य असा एक घटक आहे. त्यासाठी जनावरांच्या अाहार खनिजांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे अावश्‍यक अाहे.

सूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे आजार
विविध सूक्ष्म खनिजांमुळे वेगवेगळे आजार उद्‌भवतात. यामध्ये विशेषतः

  • गर्भधारणेच्या सुरवातीच्या काळातील गर्भपात.
  • गाय/ म्हैस व्यायल्यानंतर जार पूर्णपणे गर्भाशयातून योग्य वेळेत बाहेर न पडणे अथवा अडकून राहणे.
  • गायी/ म्हशी लवकर माजावर न येणे किंवा मुका माज ओळखण्यास कठीण जातो. आणि बऱ्याचदा तो न ओळखता निघून जातो. परिणामी नुकसानाला सामोरे जावे लागते.
  • प्रजननक्षम वळूंच्या कामोत्तेजनेमध्ये कमतरता निर्माण होते. वीर्यनिर्मितीचे प्रमाण कमी होऊन त्याची गुणवत्ताही खालावते. परिणामी वळूंमध्ये वंध्यत्वाची गंभीर समस्या निर्माण होते.
  • जनावरांची लैंगिक आणि शारीरिक वाढ मंदावून जनावरे उशिरा वयात येतात.
  • गर्भधारणेचा दर (कळण्याचे प्रमाण) कमी होते. गायी/ म्हशी लगेचच उलटतात, त्यामुळे जनावरे फळविण्यासाठी नव्याने माजावर येण्याची वाट पाहावी लागते. परिणामी त्याचा वेळ, खाद्याचा खर्च वाया जातो आणि आर्थिक नुकसान होते.
  • गायी/ म्हशींमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.
  • गर्भाशयाची अपूर्ण वाढ होते. तसेच गर्भधारणेसाठी अनुकूल वातावरणनिर्मितीत बाधा येते.
  • गर्भपाताचे प्रमाण वाढते.
  • प्रदीर्घ काळ प्रसूती वेदनांना सामोरे जावे लागते.
  • कमी वजनाची/ अशक्त वासरे जन्माला येतात.
  • शेळ्या/ मेंढ्या/ डुकरे यांमध्ये एकावेळी अनेक पिले जन्माला येण्याची संख्या कमी होते.
  • गायी/ म्हशी व्यायल्यानंतर गर्भ पूर्वावस्थेत येण्यासाठी दीर्घकाळ लागतो. आणि व्यायल्यानंतर प्रथम माजावर येण्याचा काळही वाढतो.
  • जन्मजात विकलांग वासरे जन्माला येण्याचे प्रमाण वाढते. मेलेली वासरे जन्माला येण्याची संख्या वाढते.
  • कासदाह, गर्भाशयाची सूज व इतर आजाराला जनावरे सहज बळी पडतात.
  • उत्पादन मोठ्या प्रमाणावर खालावते (दुग्ध व मांसल).

डॉ. गजानन जाधव, ७५८८६८९७४७
(स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

टॅग्स

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...
वासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...
रोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...