जनावरांना खुराकासोबत द्या बायपास फॅट, प्रोबायोटिक्‍स

बायपास प्रथिनांपासून जनावरांना आवश्‍यक असणारे प्रथिने मिळतात.
बायपास प्रथिनांपासून जनावरांना आवश्‍यक असणारे प्रथिने मिळतात.

संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे ही पाैष्टिक सत्त्वे असावीत. गायी, म्हशींचे शारीरिक पोषण, वाढ, दुग्ध वाढ अाणि प्रजननासाठी ती उपयोगी ठरतात. संतुलित अाहारामध्ये विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण या घटकांचाही समावेश होतो. गाभण गाई, म्हशींना योग्य प्रमाणात खुराक दिल्यास शरीराला आवश्‍यक असणारे पौष्टिक घटक मिळतात व गर्भाशयामध्ये वासरांची वाढ चांगली होते. खुराकासोबत आणखी काही महत्त्वाचे पौष्टिक घटक द्यावेत ते पुढीलप्रमाणे. १. बायपास फॅट/ बायपास (प्रोटिन) प्रथिने ः

  • बायपास फॅट हे स्निग्ध पदार्थांच्या कॅल्शिअम सॉल्टसोबत संयुग करून तयार केलेली असतात.
  • बायपास फॅटचे कोटीपोटामध्ये विघटन न होता, ते सरळ अबोमॅझम व लहान आतड्यात जाऊन त्यांचे शरीरात शोषण होते.
  • बायपास प्रथिनांपासून जनावरांना आवश्‍यक असणारे प्रथिने मिळतात.
  • बाजारामध्ये विविध कंपनीचे बायपास फॅट/ बायपास प्रथिने उपलब्ध आहेत. त्यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने पशुआहारात वापर करावा.
  • २. खनिज पदार्थ

  • जनावरांना देत असलेल्या चाऱ्यामध्ये बरेचसे खनिज पदार्थ हे कमी प्रमाणात असतात. हव्या त्या प्रमाणात जनावरांना खनिज पदार्थ उपलब्ध होत नाहीत. म्हणून ओला आणि वाळलेल्या चाऱ्यासोबत खनिज पदार्थ द्यावेत.
  • हाडांची वाढ, शारीरिक वाढ, दूध उत्पादन, चयापचय क्रिया इ. गोष्टींसाठी खनिज पदार्थ हे महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • खनिज पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दूध उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • खनिज पदार्थांच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरांमध्ये बरेचसे आजार उद्‌भवतात जसे की उरमोडी, अस्थिभंग इ. हे टाळण्यासाठी व दूध उत्पादन वाढण्यासाठी जनावरांना खनिज पदार्थ तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावेत.
  • ३. प्रोबायोटिक्‍स

  • प्रोबायोटिक्‍स हे शरीराला घातक नसणाऱ्या आणि शरीराला उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून बनलेले असते.
  • प्रोबायोटिक्‍स हे कोटीपोटामध्ये पचनक्रियेसाठी लागणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते व शरीराचे कार्य वाढवते.
  • प्रोबायोटिक्‍समधील सूक्ष्मजीव जनावरांच्या पचनक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
  • जनावरांना संतुलित आहारासोबत प्रोबायोटिक्‍स द्यावेत. यामुळे कोटीपोटातील पचनक्रिया वाढून दूध उत्पादनात वाढ होते.
  • बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे प्रोबायोटिक्‍स उपलब्ध आहेत, ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यावेत.
  • संतुलित आहाराचे फायदे

  • दूध उत्पादन वाढते. त्यामुळे नफ्यामध्ये वाढ होते.
  • वासरे लवकर माजावर येतात.
  • रोगप्रतिकार क्षमता वाढते, असे जनावरे रोगास कमी बळी पडतात. यामुळे औषधे उपचारावरील खर्च वाचतो.
  • जनावरांचे आरोग्य सुधारते.
  • संपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५ संपर्क ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com