दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास प्रथिने
दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास प्रथिने

दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास प्रथिने

प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर खाद्य पदार्थांवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो व दूध उत्पादनात वाढ मिळते. जनावरांना चारा टंचाइच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करावा.    प्रथिने (प्रोटीन) हा जनावरांच्या आहारातील सर्वांत महत्त्वाचा तसेच महाग घटक आहे. प्रथिने उत्तम आरोग्यासाठी तसेच अधिकाधिक दूध उत्पादनासाठी अतिआवश्यक घटक आहे. प्रथिनांचा आहारात वापर आणि जनावरांच्या पोटात आहारातून गेलेल्या प्रथिनांचा वापर कसा व किती प्रमाणात होत आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रथिनांचे मुख्य स्रोत तेलविरहीत पेंड (सरकी, गवार, शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल) व इतर धान्य. बायपास प्रथिने का व कधी द्यावीत

  • जनावारांच्या पोटात असणारे सूक्ष्मजीव हे पोटात पचन होणाऱ्या (RDP) प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव-प्रथिने यात करतात, परंतु पोटात तयार सूक्ष्मजीव-प्रथिने फक्त ४०-४५ टक्के अमिनो आम्लाच्या रूपात शोषून घेतले जातात.
  • उत्तम दर्जाचे व अधिक प्रथिने असल्यामुळे संपूर्ण प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये होत नाही आणि त्याचा काही भाग वाया जातो. म्हणून अशा पोटाच्या पहिला भागात ६०-७० टक्के पचन होणाऱ्या उत्तम दर्जाचे प्रथिने हे विविध कृत्रिम पद्धतीचा वापर करून त्याला फक्त २०-२५ टक्के पचन होण्यास बायपास प्रथिने मदत करते. या पद्धतीला 'बायपास प्रथिने' असे म्हणतात.
  • चाराटंचाईच्या काळात निकृष्ट दर्जाचा चारा वापरला जातो. त्यामुळे जनवराच्या शरीरात पोषणतत्त्वाची कमतरता भासते आणि त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर, तसेच जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. असा परीस्थितीत प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी बायपास प्रथिनांचा वापर करता येतो.
  • जास्त प्रमाणात RDP असणारे प्रथिनानचे रूपांतर RUDP मध्ये करण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो.
  • बायपास प्रथिने खाऊ घालण्याचे फायदे

  • खाद्य घटकातील बायपास प्रथिनानच्या प्रमाणाच्या आधारवर चांगल्या प्रतीचे उत्कृष्ट पोषक पशुखाद्य बनवता येते. यासाठी कमी खर्च लागतो.
  • या पद्धतीमुळे पचनशील प्रथिनांचे अमोनिया (उग्र वासाचा वायू) मध्ये रूपांतर कमी प्रमाणात होते व अमोनिया विषबाधेपासून बचाव होतो.
  • शरीरात अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते, त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन ही वाढते.
  • जास्त दूध देणाऱ्या जनावरांसाठी बयापास प्रथिने अतिशय उपयुक्त आहेत. कारण त्यांची गरज भागवली जाते.
  • दुधातील फॅट आणि एसएनएफ वाढण्यास मदत होते.
  • - जनावरांची वाढ व प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.
  • बायपास प्रथिने देण्याच्या विविध पद्धती

  • नैसर्गिक प्रथिनांचा उपयोग करणे ः पशू आहारात कमी पचन होणारे (मका) प्रथिने मिसळावेत.
  • कृत्रिम अमिनो आम्ले ः काही काळ उष्णतेचा समतोल साधून तयार केले जाते. त्यामुळे ते पोटात कमी प्रमाणात पचन होते.
  • पोटामध्ये कृत्रीमरित्या सोडणे ः (बटर, दूध प्रथिने).
  • बायपास प्रथिने आणि काही महत्त्वाच्या बाबी

  • बायपास प्रथिने हे जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या जनावरांसाठीच उपयुक्त आहे.
  • सरासरी १०-१५ लीटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या (सरकी पेंड, सोयाबीन मिल, इ.) बायपास प्रथिनांचा वापर करावा.
  • १५-२० लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी बाजारात उपलब्ध असलेले नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतीने बनवलेले बायपास प्रथिने वापरावे.
  • नैसर्गिक बायपास प्रथिने वापरात असताना पूर्ण आहारातून दिल्या जाणाऱ्या एकूण प्रथिनांच्या ५५ - ६० टक्के RDP व ४०-४५ टक्के UDP प्रमाण असले पाहिजे.
  • संपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३ दक्षिणीय विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, बंगळूर (कर्नाटक) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com