agriculture story in marathi, importance of bypass proteins in livestock feed | Agrowon

दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास प्रथिने
डॉ. अमोल आडभाई
बुधवार, 26 डिसेंबर 2018

प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर खाद्य पदार्थांवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो व दूध उत्पादनात वाढ मिळते. जनावरांना चारा टंचाइच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करावा.
  

प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर खाद्य पदार्थांवर होणारा अतिरिक्त खर्च कमी करता येतो व दूध उत्पादनात वाढ मिळते. जनावरांना चारा टंचाइच्या काळात हवी तेवढी प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी खाद्यातून प्रथिने मिळविण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करावा.
  
प्रथिने (प्रोटीन) हा जनावरांच्या आहारातील सर्वांत महत्त्वाचा तसेच महाग घटक आहे. प्रथिने उत्तम आरोग्यासाठी तसेच अधिकाधिक दूध उत्पादनासाठी अतिआवश्यक घटक आहे. प्रथिनांचा आहारात वापर आणि जनावरांच्या पोटात आहारातून गेलेल्या प्रथिनांचा वापर कसा व किती प्रमाणात होत आहे हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

प्रथिनांचे मुख्य स्रोत
तेलविरहीत पेंड (सरकी, गवार, शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल) व इतर धान्य.

बायपास प्रथिने का व कधी द्यावीत

 • जनावारांच्या पोटात असणारे सूक्ष्मजीव हे पोटात पचन होणाऱ्या (RDP) प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव-प्रथिने यात करतात, परंतु पोटात तयार सूक्ष्मजीव-प्रथिने फक्त ४०-४५ टक्के अमिनो आम्लाच्या रूपात शोषून घेतले जातात.
 • उत्तम दर्जाचे व अधिक प्रथिने असल्यामुळे संपूर्ण प्रथिनांचे रूपांतर हे सूक्ष्मजीव प्रथिनांमध्ये होत नाही आणि त्याचा काही भाग वाया जातो. म्हणून अशा पोटाच्या पहिला भागात ६०-७० टक्के पचन होणाऱ्या उत्तम दर्जाचे प्रथिने हे विविध कृत्रिम पद्धतीचा वापर करून त्याला फक्त २०-२५ टक्के पचन होण्यास बायपास प्रथिने मदत करते. या पद्धतीला 'बायपास प्रथिने' असे म्हणतात.
 • चाराटंचाईच्या काळात निकृष्ट दर्जाचा चारा वापरला जातो. त्यामुळे जनवराच्या शरीरात पोषणतत्त्वाची कमतरता भासते आणि त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर, तसेच जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. असा परीस्थितीत प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी बायपास प्रथिनांचा वापर करता येतो.
 • जास्त प्रमाणात RDP असणारे प्रथिनानचे रूपांतर RUDP मध्ये करण्यासाठी या पद्धतीचा वापर होतो.

बायपास प्रथिने खाऊ घालण्याचे फायदे

 • खाद्य घटकातील बायपास प्रथिनानच्या प्रमाणाच्या आधारवर चांगल्या प्रतीचे उत्कृष्ट पोषक पशुखाद्य बनवता येते. यासाठी कमी खर्च लागतो.
 • या पद्धतीमुळे पचनशील प्रथिनांचे अमोनिया (उग्र वासाचा वायू) मध्ये रूपांतर कमी प्रमाणात होते व अमोनिया विषबाधेपासून बचाव होतो.
 • शरीरात अमिनो आम्लाचे प्रमाण वाढते, त्यामुळे जनावरांचे दूध उत्पादन ही वाढते.
 • जास्त दूध देणाऱ्या जनावरांसाठी बयापास प्रथिने अतिशय उपयुक्त आहेत. कारण त्यांची गरज भागवली जाते.
 • दुधातील फॅट आणि एसएनएफ वाढण्यास मदत होते.
 • - जनावरांची वाढ व प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

बायपास प्रथिने देण्याच्या विविध पद्धती

 • नैसर्गिक प्रथिनांचा उपयोग करणे ः पशू आहारात कमी पचन होणारे (मका) प्रथिने मिसळावेत.
 • कृत्रिम अमिनो आम्ले ः काही काळ उष्णतेचा समतोल साधून तयार केले जाते. त्यामुळे ते पोटात कमी प्रमाणात पचन होते.
 • पोटामध्ये कृत्रीमरित्या सोडणे ः (बटर, दूध प्रथिने).

बायपास प्रथिने आणि काही महत्त्वाच्या बाबी

 • बायपास प्रथिने हे जास्त प्रमाणात दूध देणाऱ्या जनावरांसाठीच उपयुक्त आहे.
 • सरासरी १०-१५ लीटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या (सरकी पेंड, सोयाबीन मिल, इ.) बायपास प्रथिनांचा वापर करावा.
 • १५-२० लिटर दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांसाठी बाजारात उपलब्ध असलेले नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धतीने बनवलेले बायपास प्रथिने वापरावे.
 • नैसर्गिक बायपास प्रथिने वापरात असताना पूर्ण आहारातून दिल्या जाणाऱ्या एकूण प्रथिनांच्या ५५ - ६० टक्के RDP व ४०-४५ टक्के UDP प्रमाण असले पाहिजे.

संपर्क ः डॉ. अमोल आडभाई, ८८०५६६०९४३
दक्षिणीय विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, बंगळूर (कर्नाटक) 

इतर कृषिपूरक
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...