प्रथिने, खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी हिरवा चारा

हिरवा चारा हा रुचकर, पाचक, तसेच चविष्ट असल्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात
हिरवा चारा हा रुचकर, पाचक, तसेच चविष्ट असल्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात

अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक काळ उत्तमरीत्या टिकवून ठेवण्याकरिता हिरवा चारा दैनंदिन आहारात देणे गरजेचे आहे.   जनावराच्या आहारात साधारणपणे ७० टक्के हिरव्या चाऱ्याचे प्रमाण असावे लागते. यामध्ये चाऱ्याची हिरवा चारा व कोरडा चारा अशी विभागणी होते. हिरव्या चाऱ्यामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, खनिजे व जीवनसत्त्वे हे मुबलक प्रमाणात असतात. दुधाचे उत्पादन हे जनावराच्या आहारावर व त्याच्या वजनावरून ठरविता येते.

  • हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल वर्गीय चारा पिकांपैकी ज्वारी, बाजरी, मका, यशवंत, जयवंत, गुणवंत, दशरथ या चारा पिकांचा समावेश होतो तर द्विदल पिकामध्ये बरसीम, लसूणघास, चवळी, स्टायलो या पिकांचा समावेश होतो.
  • शारीरिकदृष्ट्या हिरव्या चाऱ्यामध्ये पोषक अाणि सकस घटक भरपूर प्रमाणात असतात.
  • प्रथिनांचे प्रमाण एकदल वर्गीय चाऱ्यामध्ये ४ - ७ टक्के असतात, तर द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये १५ - २० टक्के प्रथिने असतात. त्यामुळे शेतात जनावराच्या संख्येनुसार चाऱ्याचे नियोजन करावे.
  • हिरव्या चाऱ्याचे महत्त्व

  • हिरवा चारा हा रुचकर, पाचक, तसेच चविष्ट असल्यामुळे जनावरे चारा आवडीने खातात.
  • हिरव्या चाऱ्याच्या तुलनेने वाळलेल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. जनावरांना खनिजे, प्रथिने ही हिरव्या चाऱ्यातून मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.
  • हिरव्या चाऱ्यामध्ये विविध घटक हे विद्राव्य स्वरूपात असल्यामुळे जनावरांना पचनाचा त्रास होत नाही.
  • कॅरोटीन असल्यामुळे जनावराची त्वचा तजेलदार राहण्यास अाणि रातांधळेपणा टाळण्यास मदत होते.
  • ग्लुटेमिक, आर्जींनिन आम्ल असल्यामुळे जनावरांनादेखील या आम्लांचा पुरवठा होतो.
  • गाभण जनावरांच्या आहारातील हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे जन्मनारी वासरे ही अशक्त, कमजोर असतात.
  • दुधाची उत्पादन क्षमता ही जास्त काळ टिकवायची असेल, तर जनावरांच्या आहारात हिरवा चारा असलाच पाहिजे.
  • हा चारा पचनास सुलभ असतो.
  • हिरव्या चाऱ्यापासून मुरघास तयार करून ठेवावा. त्याचा उपयोग इतर हंगामात म्हणजेच उन्हाळ्यात देखील करता येतो.
  • ज्वारीचा चारा अोला अाणि वाळलेला म्हणून वापरला जातो. नेमक्या कोणत्या प्रकारच्या चाऱ्याची गरज अाहे हे लक्षात घेऊन ज्वारी पिकाच्या लागवडीचे नियोजन करावे.
  • संपर्क ः के. एल. जगताप, ९८८१५३४१४७ (विषय विशेषज्ञ पशू संवर्धन व दुग्धशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, खामगाव, जि. बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com