क्षार, जीवनसत्त्वांच्या पूर्ततेसाठी पालेभाज्या

समतोल अाहार
समतोल अाहार

आपल्या आहारातील पिष्टमय, नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्त्वे व पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्त्वे ताज्या भाज्यांमधून मिळतात. त्यासाठी रोजच्या अाहारात हिरव्या, ताज्या पालेभाज्यांचा समावेश हवाच. शरीराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्त्वे गरजेची आहेतच, परंतु आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी 'अ' जीवनसत्त्व, कर्बोदकांच्या पचनासाठी 'ब' जीवनसत्त्व तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी 'ई' जीवनसत्त्वाची गरज असते. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी 'ड' जीवनसत्त्व, रक्ताची घनता ठराविक प्रमाणात ठेवण्यासाठी 'के' जीवनसत्त्व आणि या सर्वांना सावरणार अस 'क' जीवनसत्त्व आपल्याला अहारातून मिळणे गरजेच असते. ही सारी जीनवसत्त्वांची गरज विविध पालेभाज्यांमधून भागवता येते. पालेभाज्यांमध्ये विविध खनिजे अाणि जीवनसत्त्वे विपुल प्रमाणात असतात.

पालेभाजीची उपयुक्तता वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे त्यात असलेला चोथा. या चोथ्यामुळे शरीरात घाण साठून रहात नाही. आतडी कार्यक्षम रहातात. आतड्यातील आवश्यक जिवाणूंची पैदासही या चोथ्यामुळेच होते. त्यामुळे खालेल्या अन्नाच्या विविध घटकांचे अगदी शेवटपर्यंत नेऊन पचन करण शरीराला सहज शक्य होत. शिवाय आतड्यात तयार होणारे पित्तासारखे विषमय पदार्थही या चोथ्यामुळे बाहेर टाकणे शक्य होते. त्यामुळे पालेभाज्या आहारात नित्य असणे गरजेचे आहे. काही पालेभाज्यांचे अाहाराच्या दृष्टीने महत्त्व पुढीलप्रमाणे.

पालक

  • पालक भाजीमध्ये २ टक्के प्रथिने, ७३ मिली ग्रॅम कॅल्शिअम, २१ मिली ग्रॅम फाॅस्फरस, १०.९ मिली ग्रॅम लोह अाणि २८ मिली ग्रॅम क जीवनसत्त्व असते.
  • पालकामुळे शरीरात रक्तवृध्दी होते. रक्त शुद्ध होते तसेच हाडे मजबूत होतात.
  • 'क' व 'ब' जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.
  • पालका मध्ये सल्फर, सोडिअम, पोटॅशियम व अमिनो ॲसिडही असते.
  • मेथी

  • मेथीची भाजी वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे.
  • मेथीच्या भाजीमध्ये प्रथिने ४.४ टक्के, कॅल्शिअम ३९५ मिली ग्रॅम, फाॅस्फरस ५१ मिली ग्रॅम, लोह १६.५ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व ५२ मिली ग्रॅम असतो.
  • मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कमरेचे दुखणे दूर होते. शारीरिक शक्ती वाढते. या भाजीत 'अ' जीवनसत्त्व, कॅल्शिअम, प्रथिने तसेच कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते.
  • कोथिंबीर

  • कोथिंबिरीमध्ये प्रथिने ३.३ टक्के, कॅल्शिअम १८४ मिली ग्रॅम, फाॅस्फरस ७१मिली ग्रॅम, लोह १८.५ मिली ग्रॅम अाणि क जीवनसत्त्व १३५ मिली ग्रॅम असते.
  • कोथिंबिरीची पाने जठराला सशक्त करून त्याला कार्यप्रवण करतात. जठराची जळजळ कमी करून तेथील अंतःस्त्राव वाढवतात. कोथिंबिरीने ताप कमी होतो पित्त शमते, दृष्टिदोष कमी होतो.
  • कोथिंबीर चटणी, कोशिंबीर खिचडी, पुलाव, भात, विविध भाज्या, आमटी, सूप या सर्वाकरिता कोथिंबीर हवीच.
  • कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे.
  • जळजळीत पदार्थ खाणाऱ्यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते.
  • रक्तशुद्धी, रक्तातील उष्णता कमी करण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त अाहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com