agriculture story in marathi, importance of mineral mixture in livestock | Agrowon

दुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणे
डॉ. अमित शर्मा, डॉ. गाैरी नळकांडे
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

जनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात दिला जातो; परंतु खनिज द्रव्यांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. उत्तम अारोग्यासाठी अाणि शरीराच्या चांगल्या वाढीसाठी जनावरांच्या आहारात ऊर्जा आणि प्रथिनांशिवाय खनिज द्रव्यांचे व जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असणे महत्त्वाचे असते.
 

जनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात दिला जातो; परंतु खनिज द्रव्यांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. उत्तम अारोग्यासाठी अाणि शरीराच्या चांगल्या वाढीसाठी जनावरांच्या आहारात ऊर्जा आणि प्रथिनांशिवाय खनिज द्रव्यांचे व जीवनसत्त्वाचे पुरेसे प्रमाण असणे महत्त्वाचे असते.
 
जनावरांच्या आहारामध्ये सामान्य क्रिया घडवण्यासाठी कर्बोदके, प्रथिने व क्षार जास्त प्रमाणात तर जीवनसत्त्वे व खनिजे कमी प्रमाणात लागतात. जनावरांच्या आहारामध्ये एकूण २२ खनिजांची आवश्यकता असते. ज्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, गंधक, सोडिअम, पोटॅशिअम आणि क्लोरिन ही सात प्रमुख खनिजे आहेत. सूक्ष्म खनिजांमध्ये मुख्यतः लोह, जस्त, मॅंगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट आणि सेलेनिअम अशा १५ सूक्ष्म खनिजांचा समावेश होतो.

दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये मुख्यतः धान्य, ढेप, हिरवा व सुक्या चाऱ्याचा वापर होतो. ज्यामधून आवश्यकतेनुसार प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ उपलब्ध होतात; परंतु खनिजांची पूर्तता होऊ शकत नाही. दुधाळ जनावरांची खनिजांची गरज पूर्ण न झाल्यामुळे दूध उत्पादनावर व प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतात. जनावरांच्या चयापचय क्रियेसाठी खनिजांची गरज असते.

जनावरांच्या आहारामध्ये नियमित लागणारी खनिजांची मात्रा.

मुख्य खनिजे प्रमाण (टक्के) सूक्ष्म खनिजे प्रमाण (मिलि ग्रॅम/किलो आहार)
कॅल्शिअम ०.६६ लोह ५०
फॉस्फरस ०.४१ तांबे १०
मॅग्नेशिअम ०.२५ जस्त ४०
पोटॅशिअम १.०० मॅंगेनीज ४०
गंधक ०.२० आयोडीन ०.६
सोडियम ०.१८ सेलेनीअम ०.३
क्लोरीन ०.२५ कोबाल्ट ०.१

खनिजांचे महत्त्व

  • दुधाळ जनावरांमध्ये दुग्धोत्पादन व प्रजनन टिकवून ठेवण्यासाठी खनिजे महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
  • जनावरांच्या शरीरामधून वेगवेगळ्या मार्गाने खनिजे बाहेर पडतात, त्यांची उणीव भरून काढण्यासाठी खनिज मिश्रणाची आवश्यकता असते.
  • हाडांमध्ये कॅल्शिअम अाणि फॉस्फरसची मात्रा राखून ठेवण्यासाठी, रक्तात लाल पेशींच्या निर्मितीसाठी व पाचक रसांच्या उत्तम कार्यासाठी खनिजे आवश्यक असतात.

खनिज कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम

  • दूध उत्पादनात कमतरता आढळून येते.
  • जनावर माजावर येत नाही आणि माजावर आल्यास मुका माज दाखविते.
  • गर्भाशयामध्ये दोष निर्माण होण्यास सुरवात होते.
  • दुधाळ जनावरांचा भाकड काळ वाढतो, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो.

जनावरांना खनिज मिश्रण किती प्रमाणात द्यावे?
शरीराची खनिजाची गरज भागविण्यासाठी जनावरांच्या आहारामध्ये १ टक्का मीठ व २ टक्के खनिज मिश्रण पुरवावे.

  • दुधाळ गाई व म्हशी मध्ये ६० ते ७० ग्रॅम प्रती जनावर प्रती दिवस
  • वासरे व कालवडी ४० ते ५० ग्रॅम प्रती जनावर प्रती दिवस
  • लहान वासरे, बकरी व मेंढी २५ ते ३० ग्रॅम प्रती जनावर प्रती दिवस

संपर्क : डॉ. अमित शर्मा, ८८८८३३३४५०
(पशुपोषण शास्त्र विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाणा)

इतर कृषिपूरक
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...