कल्शियम, प्रथिनांचा उत्तम स्त्रोत नाचणी, मका

समतोल अाहार
समतोल अाहार

पचनास हलकी तसेच ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. मका हे तृणधान्य वजन कमी करण्यासाठी अाणि डोळ्यांच्या अारोग्यासाठी उत्तम अाहे. त्यामुळे उत्तम अारोग्यासाठी अाहारात या दोन तृणधान्यांचा समावेश असणे फायदेशीर अाहे. नाचणी

  • नाचणीमध्ये कल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे.
  • ताकद वाढविते, पित्ताचे शमन करते, रक्तातील दोष दूर करते. नाचणी उष्ण नसून शीतल आहे. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थाच्या तुलनेत सर्वात जास्त कल्शियम आहे. १०० ग्राम नाचणीमध्ये ३४४ मिलिग्रॅम कल्शियम असते जे इतर धान्यापेक्षा १० पटीने जास्त अाहे. त्यामुळे हाडे बळकट होतात.
  • नाचणीच्या १०० ग्रॅम दाण्यांमध्ये ६.४ मिलिग्रॅम लोह असते जे इतर धान्यापेक्षा जास्त आहे. अनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज नाचणीच्या पदार्थातून भागते. म्हणून गरोदर मातांना गर्भ विकासासाठी, हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त आहे.
  • नाचणीमध्ये प्रथिनांचे प्रमाण ७ ते १२ टक्के आहे. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणीतील ट्रीफ्टोफन हे अमिनो आम्ल उपयुक्त ठरते. नाचणीच्या अन्नाचे कमी वेगाने पचन होत असल्याने मनुष्य जास्त कॅलरीज घेण्यापासून सहजरीत्या परावृत्त होतो.
  • नाचणीतल्या तंतुमय पदार्थामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात ७२ टक्के कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नाॅनस्टार्चच्या स्वरुपात असतात. आयसोल्युसीसमुळे मासपेशी (स्नायू) तंदुरुस्त राहतात, रक्त गोठत नाही, त्वचा सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.
  • नाचणीतील लेसिथीन आणि मिथीओनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृता मधली जादा चरबी कमी होते. नाचणीत भात गव्हापेक्षा तंतुमय जास्त असल्याने आणि रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्याने नाचणी हे मधुमेही रुग्णासाठी चांगले अन्न आहे.
  •    मका

  • मका या धान्यात बेटाकेरोटिन आढळते. मक्याला पिवळा रंग देणारे ल्युटिन हे एक उत्तम ॲंटिऑक्सिडन्ट आहे. बीटाकॅरोटीन व ल्युटीन हे दोन्हीही डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. मक्यामध्ये सिस्टिन व मेथीओनीन हे अमिनो अाम्ले भरपूर प्रमाणात असून यकृताच्या आरोग्यासाठी चांगली आहेत.
  • मक्याच्या लाह्या (पॉपकॉर्न) या वेटलॉस फूड आहेत. यात तंतू भरपूर असून फॅट्‌स कमी असतात, त्याचबरोबर त्या भूकही लवकर भागवतात. हायकोलेस्टेरॉल, गाउट व स्थौल्य या विकारांमध्ये पॉपकॉर्न किंवा भाजलेले मक्याचे कणीस खावे.
  • १०० ग्रॅम मक्याच्या दाण्यात निव्वळ १२५ उष्मांक व ०.९ ग्रॅम फॅट्‌स असतात. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत मक्याचे दाणे वाफवून त्यात मटार अथवा शेंगदाणे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून घेतल्यास उत्तम वेट लॉस मिल तयार होते. या उलट बटर कॉर्न, चॉकलेट कॉर्न, मक्याचा चिवडा हे मात्र वजन वाढवणारे आहेत. १०० ग्रॅम मक्याच्या चिवड्यात तब्बल ३५ ग्रॅम फॅट्‌स असतात.
  • संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com