कॅल्शिअम, लोहाचा उत्तम स्त्रोत ः नाचणी

नाचणी
नाचणी

आहारच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास तत्सम तृणधान्य न संबोधता सत्त्वयुक्त धान्य म्हणणे जास्त योग्य ठरेल. नाचणी हे प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या‍ आदिवासी लोेकांचे प्रमुख अन्न आहे. नाचणी हे एक दुर्लक्षित तृणधान्य आहे. जोंधळ्याच्या चवीची नाचणी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानली जाते. कर्नाटक राज्यात नाचणीचे सर्वाधिक उत्पादन होते. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यात नाचणी भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन आणि रिबोफ्लेविन हे महत्त्वाचे पोषक घटक असतात. कॅल्शियमचे जास्त प्रमाण असल्यामुळे खेळाडू, कष्टाची कामे करणारी, वाढती मुले यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर व आहारतज्ज्ञ देतात.

  • चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय घटक असल्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळूहळू रक्त प्रवाहात मिसळला जातो.
  • नियमित नाचणी सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. आयुर्वेदिकदृष्ट्या नाचणी शीतल असते. त्यामुळे उष्ण, तसेच दमट हवामानाच्या प्रदेशात नाचणीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात.
  • नाचणीमध्ये ७० ते ७३ टक्के पोषक घटक असतात. गव्हाची पौष्टिकता नाचणीपेक्षा कमी (६८ टक्के) असते. परंतु, त्यातल्या पचनाचा भाग मात्र फक्त ३७ टक्केच असतो.
  • विघटन न होणारे तंतू शाळू व मक्यानंतर फक्त नाचणीमध्ये सापडतात. या तंतूमुळे शरीरातील स्निग्धाचे संतुलित पोषण होते.
  • अन्न घटकांचा विचार करताना राखेचा किंवा कार्बनचा विचार केला जात नाही. वास्तविक हाच घटक पित्तशामक असतो. ओट आणि नाचणी या दोन्हीमध्ये हे प्रमाण ३ टक्के असते. म्हणूनच पित्तशमनसाठी आंबिल घेतले जाते. मेंदूला चेतना देणारे काही घटक यात आहेत. उदा. विशिष्ट फोस्फेटस ही केळी आणि नाचणी यात भरपूर असतात. म्हणून केळी दह्यामध्ये केलेले शिकरन आणि नाचणीची भाकरी ही लहान मुलांच्या (वाढीच्या वयात) वाढीसाठी ब्रेन टॉनिक आहे.
  • हाडांचे आजार असणाऱ्यांना आहारात नाचणीशिवाय दुसरा पर्याय नाही. नाचणीमध्ये कॅल्शियमच्या बरोबरीने तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण सर्वांत जास्त असते. नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील शर्करेचे प्रमाण संतुलित राहते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने नाचणीसारखा दुसरा पूरक आहार नाही.
  • नाचणीमुळे शरीराला फक्त ऊर्जाच मिळत नाही, तर 'अमिनो अॅसिड' नावाचे आम्ल मिळत. या आम्लामुळे, तसेच त्यात असणाऱ्या‍ तंतुमय पदार्थामुळे लागणाऱ्‍या भुकेची तीव्रता नियंत्रणात ठेवली जाते.
  • मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने नाचनीयुक्त आहाराला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे नाचनीला बाजारात चांगला दर व मोठी मागणी आहे.
  • नाचणीच्या पीठापासून चपाती, रोटी, शेवया आणि पापड अशा स्वरूपाची मूल्यवर्धित उत्पादने भाजून, उकडून, वाफवून किंवा अंबवून केली असता, अत्यंत सत्त्वयुक्त होतात. नाचणीचे विविध पदार्थ तयार करून त्याचे सेवन केल्यास प्रकृती उत्तम राहील. त्याचबरोबर विक्रीयोग्य पदार्थ बनवून त्याची विक्री केल्यास आर्थिक स्थिती सुधारेल.
  • १०० ग्रॅम नाचाणीतून मिळणारे पोषक घटक

  • कॅल्शियम : ३५० मिलिग्रॅम
  • लोह : ३.९ मिलिग्रॅम
  • नायसीन : १.१ मिलिग्रॅम
  • थायमिन : ०.४२ मिलिग्रॅम
  • रिबोफ्लेविन : ०.१९ मिलिग्रॅम
  • संपर्क ः डॉ. बाबासाहेब वाळुंजकर ,९०७५२५०७२० (श्रमशक्ती कृषी महाविद्यालय, मालदाड, संगमनेर, जि. नगर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com