agriculture story in marathi, importance of records in dairy and farm | Agrowon

शेती, पशूपालनाच्या नोंदी महत्त्वाच्या...
डॉ. तेजस शेंडे
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्यातील नोंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती व्यवसायातील जमा, खर्च, विविध शेतीकामाच्या वेळा, त्याला लागलेले कष्ट, जमिनीची प्रतवारी, दर वर्षाचे उत्पन्न, नफा, तोटा याच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. शेती तसेच पशूपालनातील नोंदी ठेवल्या तर व्यवसायात आपण कुठे चुकतो, त्यावर उपाय काय हे समजू शकते.

व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्यातील नोंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती व्यवसायातील जमा, खर्च, विविध शेतीकामाच्या वेळा, त्याला लागलेले कष्ट, जमिनीची प्रतवारी, दर वर्षाचे उत्पन्न, नफा, तोटा याच्या नोंदी ठेवणे गरजेचे आहे. शेती तसेच पशूपालनातील नोंदी ठेवल्या तर व्यवसायात आपण कुठे चुकतो, त्यावर उपाय काय हे समजू शकते.

प्रत्येक जनावरांच्या विषयी नोंदी:
शेतीपूरक व्यवसायात कोणती जनावरे आहेत, जात, नाव, पाळण्याचा उद्देश, एकूण संख्या, एकूण नर, एकूण माद्या, दररोज सरासरी किती उत्पादन मिळते, उत्पन्नापासून सरासरी मिळालेली एकूण रक्कम (रु.), जनावरांची विक्री दिनांक, किती व कोणते विकले, मिळालेली रक्कम (रु.) इ. नोंदी ठेवाव्यात. यामधून आपल्याला आपला शेतीपूरक व्यवसाय पशुपालन याची स्थिती कशी आहे व कुठल्या जनावारापासून काय उत्पन्न मिळेल या गोष्टी कळतात.

तपासण्यासंबंधीच्या नोंदी (पाणी, माती, पीक इ.):
दिनांक, शेती प्लॉटचे नाव / ओळख / नंबर, तपासणी / परीक्षण दिनांक, कशाची तपासणी केली, तपासणीसाठी किती नमुना दिला, तपासणी अहवाल मिळाल्याची तारीख, तपासणी बिल नंबर, तपासणीवरील खर्च, तपासणी अहवालातील मुद्दे, केलेली आवश्यक उपाययोजना, उपाय योजनेवरील खर्च, एकूण खर्च.

सेंद्रिय खत वापरण्याविषयीच्या नोंदी:
शेतीच्या प्लॉटचे नाव / पिकाचे नाव, ओळख नंबर, पीक लागवडीखालील क्षेत्र, दिनांक, सेंद्रिय खताचे नाव, खत कोणाकडून विकत घेतले, खताची खरेदी किंमत, खतामधील घटक (शेण/ लेंडी व इतर), खत देण्याची तारीख, एकूण किती खत दिले, खत देण्यासाठी कामगारावरील खर्च, खतावरील एकूण खर्च.

मशागतीविषयीच्या नोंदी:
क्षेत्राचे नाव, लागवडीखालील क्षेत्र, दिनांक, मशागतीचा प्रकार, मशागतीचा उद्देश, मशागत कशाने केली, किती मजूर कामाला होते, दर दिवसाचा खर्च, मशागतीसाठी लागलेले एकूण दिवस, मशागतीसाठी आलेला एकूण खर्च.

गवडीच्या नोंदी:
पिकाचे नाव, लागवडीची सुरवातीचा दिनांक, लागवडीचे क्षेत्र, बियाण्याची जात व कंपनी, एकूण क्षेत्रासाठी किती बियाणे लागले, पिकाची अपेक्षित काढणीची तारीख, बियाणावरील एकूण खर्च, लागणीसाठी एकूण खर्च इ. नोंदी. यामध्ये कुठली लागवड पद्धत वापरावी, एकरी किती बियाणे लागते, कोणत्या कंपनीच्या बियाण्याचा उतारा सर्वोत्तम आहे. लागवडीवर किती खर्च आला हे कळते.

पाणी देण्याविषयीच्या नोंदी:
पिकाचे नाव, पहिल्या पाण्याची तारीख, पाणी देण्यासाठी लागलेले एकूण दिवस, दुसऱ्या पाण्याची संभाव्य तारीख, पिकाला एकूण किती पाणी लागतील, पाणी देण्यावरील खर्च याच्या नोंदी ठेवल्याने वेगवेगळ्या पिकांना किती पाणी लागले, सर्वोत्तम पाणी देण्याची पद्धत कोणती व पाणी देण्यावर किती खर्च येतो हे समजते.

रासायनिक खताच्या नोंदी:
पीक आणि लागवडीखालील क्षेत्र, रासायनिक खत, खत दुकानाचे नाव व बिल नंबर, खरेदी किंमत, खतामधील घटक, खत देण्याची तारीख, एकूण किती खत दिले, पुढच्या खताच्या मात्रेची अंदाजे तारीख, खत देण्यासाठी मजुरी खर्च, खतावरील एकूण खर्च. या नोंदीमुळे
कुठल्या रासायनिक खताची मात्रा वेगवेगळ्या पिकांना किती प्रमाणात लागली, ज्यामुळे सर्वोत्तम उत्पादन मिळाले हे कळते. कुठल्या खताचा परिणाम चांगला आहे, रासायनिक खतावर एकूण एकरी किती खर्च झाला हे समजते.

कीडनाशक फवारणीच्या नोंदी:
लागवड क्षेत्र, फवारणीसाठी कीडनाशक, दुकानदाराचे नाव व बिल नंबर, खरेदी किंमत, कीडनाशकातील घटक, फवारणी तारीख, एकूण किती कीडनाशक वापरले, पुढील फवारणीची अंदाजे तारीख, फवारणी खर्च. या नोंदीतून एकूण खर्च आणि कीड, रोग नियंत्रणासाठी झालेला परिणाम कळतो.

पीक काढणी आणि मळणीविषयीच्या नोंदी:
लागवडीखालील क्षेत्र, लागवड आणि काढणीची तारीख, काढणीसाठी मजूर खर्च, मळणी यंत्र वापर आणि लागलेले मजूर, काढणी व मळणी वरील एकूण खर्च, मिळालेले उत्पादन.

धान्य साठवण व विक्री विषयक नोंदी:
पिकाचे एकूण उत्पादन, धान्य किती दिवस वाळवले, कामगारांना दिलेले धान्य / खर्च , घरासाठी लागणारे धान्य, विक्रीची तारीख, एकूण किती धान्य विकले, किंमत काय मिळाली, कोणाला विकले, विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम, बिल नंबर, शिल्लक साठवणुकीची सोय. या नोंदीतून एकूण उत्पन्नाचा अंदाज येतो.

चारापीक लागवडीविषयक नोंदी:
पिकाचे नाव, लागवडीची तारीख, लागवडीखालील जमीन, उत्पादन खर्च, पहिल्या कापणीसाठी अपेक्षित तारीख, शेवटच्या कापणीची अपेक्षित तारीख, एकूण अपेक्षित उत्पादन (क्विंटल), विक्रीतून मिळालेली रक्कम. या नोंदीमुळे जनावरांसाठी लागणारा चारा, उत्पादन, चाराविक्रीमधून मिळालेला फायदा समजतो.
 
शेती जमा खर्च विषयीच्या नोंदी:
खर्चाच्या नोंदी, तारीख, कशावर खर्च केला, खर्चाचे कारण, एकूण रक्कम, रक्कम कुणाला दिली, मिळकतीच्या नोंदी तारीख, कशातून मिळकत झाली, मिळकतीचे कारण, एकूण रक्कम, रक्कम कुणाकडून मिळाली. यामुळे शेतीमधील जमा व खर्च याचा दर महिन्याचा लेखाजोखा कळतो. जमा झालेला आणि खर्च झालेला पैसा याच्या नोंदी ठेवल्यामुळे व्यवासायामध्ये फायदा की तोटा होत आहे हे समजते.

मजुरांविषयीच्या नोंदी व हजेरीपत्रक:
मजुराचे नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, कामावर रुजू झाल्याची तारीख, दर दिवसाचा पगार, पगाराची रक्कम, पगाराची तारीख, काम सोडल्याची तारीख, अतिरिक्त पैशाची रक्कम व तारीख, वर्षभरातील सर्व महिन्याची हजेरीपत्रक. यामुळे आपणाला मजुराविषयी सर्व नोंदी कळतात. सध्याच्या मजुरामुळे शेती सुधारणा झाल्या आहेत की नाहीत ते कळते. दर, महिन्याची हजेरी कळते, त्यांचा पगार करण्यास सोयीस्कर होते तसेच त्यादिवशी आपण पर्यायी व्यवस्था काय केली व शेतीवर काही गैरसोय झाली का हे कळते.

विमा तपशील:
पीक लागवडीखालील एकूण क्षेत्र, विमा पॉलिसी क्रमांक, विमा पॉलिसी किती तारीखेपासून सुरू, विमा पॉलिसी किती तारीखेला संपते, पैसे भरल्याची तारीख, विमा रक्कम किंवा शासकीय विम्याच्या सर्व नोंदी. यामुळे आपणाला विम्याच्या संदर्भातील गोष्टी कळतात. विमा कुठल्या कंपनीचा केला, कधी केला, विमा पॉलिसी काळ, कधी संपते आहे. किती रकमेचा हप्ता आहे. पीक व्यवस्थापनात गैरसोय झाली तर आवश्यक निर्णय घेता येतात.

प्रक्षेत्रावरील स्थायी सामानविषयक नोंदी:
नाव आणि क्रमांक, सामानाचे वर्णन आणि कंपनी, खरेदीची तारीख, बिल क्रमांक, खरेदी किंमत व सध्याची किंमत, विक्रेत्याचे नाव, पत्ता, मोबाईल, वापरासाठी किती व कधी दिली, वस्तू किती तारखेला तपासल्या. वस्तू तपासणी केल्यानंतरचा अहवाल, शिल्लक, अंदाजे किंमत, विल्हेवाट लावल्याची तारीख व नंबर, शेरा. यामुळे आपणाला आपल्या शेतीवर कोणच्या वस्तू घेतल्या, कधी घेतल्या, कुठल्या कंपनीचे घेतले, खरेदी किंमत, सध्याची किंमत त्या सामानाची सद्यःस्थिती याविषयी माहिती महत्त्वाची असते.

डॉ. तेजस शेंडे ः ९९७०८३२१०५
(सहायक प्राध्यापक, पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

इतर कृषिपूरक
पशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...
जनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...
वासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...
जनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
कासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...
कोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...
गाभण जनावरे, नवजात वासरांना जपागाभण काळात जनावरांची काळजी घेतल्यास जनावराचे...
चारा टंचाई काळातील जनावरांच्या आरोग्य...पाणी व चाराटंचाईमुळे जनावरांमध्ये क्षार व...
कुक्कुटपालन सल्ला हिवाळ्यात कोंबड्याना इतर पक्ष्यांच्या तुलनेत अधिक...
‘दिशा’ देतेय महिला बचत गटांना आर्थिक...बुलडाणा शहरातील ‘दिशा’ महिला बचत गट फेडरेशनने...
वेळीच ओळखा जनावरांतील प्रजनन संस्थेचे...जनावरांच्या संगोपनामध्ये उच्च फलनक्षमता किंवा...
थंडीचे प्रमाण वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश...
शेती, पशूपालनाच्या नोंदी महत्त्वाच्या...व्यवसाय फायद्यात चालवायचा असेल तर त्यातील नोंदीला...
कॅल्शियमची गरज ओळखून करा आहाराचे नियोजनगाय म्हैस विल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शियमची...
संक्रमण काळातील गाई, म्हशींचे व्यवस्थापनगाई-म्हशींमधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर व तीन...
जनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
थंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...