मसाल्याचे आहारातील गुणधर्म

 	समतोल अाहार
समतोल अाहार

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, परंतु हे मसाले चांगल्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहेत.

मसाल्यांशिवाय 'रसदार' आहार परिपूर्ण होऊ शकत नाही. स्वयंपाकात चव, रंग आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाला स्वतःचा विशेष 'गुण' आहेत. मसाल्याच्या पदार्थांचे आहारशास्त्रीय गुणधर्म आणि त्यांची शरीरांतर्गत उपयुक्तता खूप जास्त अाहे. दैनंदिन अाहारात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये अनेक अाैषधी गुणधर्म अाहेत. १. लवंग अ, ब, क, के जीवनसत्वे, पोटॅशिअम, मॅंगेनीज, लोह अाणि सिलेनियम चा चांगला स्त्रोत. श्वासाची दुर्गंधी टाळण्यासाठी मळमळ व उलटीवर उपायकारक व प्रतिओक्सिडीकारक. २. जायफळ कॉपर, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅंगेनीज, लोह चा चांगला स्त्रोत. अतिसार व पोटाचे आजार थांबविण्यासाठी, फंगल इन्फेक्षन कमी करण्यासाठी, उत्साहवर्धक. ३. जायपत्री अ आणि क जीवनसत्वे, लोह आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत. सुयोग्य प्रमाणात पाचकरस तयार होण्यासाठी, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी, अन्नाच्या सुरळीत व जलद पचनासाठी उपयुक्त. ४. दालचिनी कवकनाशक (anti fungal), जीवाणुविरोधी (anti bacterial), प्रती ऑक्सिडीकारक , रक्तातील इन्शुलिन ह्या संप्रेरकाचे कार्य सुरळीत करून साखरेची पातळी तसेच कोलेस्टेरॉलचे पातळी कमी करण्यात मदत करते. वजन घटविण्यासाठी अपचन अजीर्ण, पोटदुखीत गुणकारी. ५. खसखस कॅल्शिअम, लोह, तंतुमय पदार्थ, पोटॅशिअम, कॉपर, झिंक या खनिजांचा उत्तम स्त्रोत. कोलेस्टेरॉल कमी करणे, बद्धकोष्टतेवर औषधी. कफावर गुणकारी. ६. केशर सर्दी, कफ व अस्थमा, झोप न येणे यावर उपयुक्त. ७. मसाल्याचा वेलदोडा अ, क, ई आणि के, जीवनसत्व, तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात. -पाचकरस तयार होण्यासाठी, जठराच्या आरोग्यासाठी रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे रक्तात गुठळ्या होऊ नयेत त्यासाठी महत्त्वाचे कार्य करते. निरोगी आणि पांढऱ्या दातांसाठी आवश्यक.   कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com