Agriculture story in Marathi, importance of training and guidance in dairy | Agrowon

प्रशिक्षण, मार्गदर्शनातून कमी करा दुग्ध व्यवसायातील जोखीम
डॉ. सचिन रहाणे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

दुग्ध व्यवसाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर माहिती सहज उपलब्ध होत असली तरी, प्रमाणित माहिती ही योग्य प्राशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शनातूनच मिळू शकेल. मोठ्या गोठ्यांवर आहार, प्रजनन किंवा आरोग्य व्यवस्थापनात झालेली छोटीशी चूक उत्पादनच नव्हे, तर जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते.
 

दुग्ध व्यवसाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर माहिती सहज उपलब्ध होत असली तरी, प्रमाणित माहिती ही योग्य प्राशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शनातूनच मिळू शकेल. मोठ्या गोठ्यांवर आहार, प्रजनन किंवा आरोग्य व्यवस्थापनात झालेली छोटीशी चूक उत्पादनच नव्हे, तर जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते.
 
कुठल्याही व्यवसायात प्रशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शन महत्त्वाचे असते. आधुनिक दुग्ध व्यवसायात उत्पादनवाढीबरोबर जोखीमही वाढली आहे. पारंपरिक व आधुनिक दुग्ध व्यवसायात खाद्य व्यवस्थापनापासून दुधाच्या विक्रीच्या नियोजनात मोठा फरक आहे. वेळीच योग्य सल्ला मार्गदर्शन न मिळाल्यास दुग्ध व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागतो. योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन घेतले नसल्याने कसे नुकसान होते हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते.

सतीश यांनी शहरातील नोकरी सोडून साठवलेली रक्कम गुंतवून गावात दुग्ध व्यवसाय करावयाचे ठरवले. गोठ्याची सोय करून हरियाना राज्यातून एकाचवेळेस २० मुऱ्हा म्हशी खरेदी केल्या. मोठ्या उत्साहात व्यवसाय सुरू केला. परंतु २० म्हशींना किती चारा लागेल याचा अंदाज नसल्याने दहा गुंठ्यांतच केलेला चारा कमी पडू लागला. त्यात १५ दिवस पाऊस सलग सुरू राहिला. म्हशी आजारी पडू लागल्या व पहिल्या महिन्यातच १२ म्हशी घटसर्प रोगाने मृत्युमुखी पडल्या. सतीश यांनी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कुठलेही प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन घेतले नव्हते. म्हशी घेताना त्यांना केलेल्या लसीकरणाची माहिती नसल्यामुळे, अयोग्य व्यवस्थापन, जनावरांचा विमा उतरविलेला नसल्यामुळे व तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून जनावरांना उपचार न केल्यामुळे व्यवसाय दोन महिन्यांत मोठा तोटा सहन करून बंद केला.

प्रशिक्षण

 • प्रशिक्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीचे एखाद्या विषयाचे ज्ञान व कौशल्य वृद्धी करून त्याच्या व्यवसायाची क्षमता आणि उत्पादकता वाढविणे होय.
 • प्रशिक्षणाने दुधाळ जनावरांच्या नियोजनाचे ज्ञान, कौशल्य आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा दृष्टिकोन बदलून आरोग्य पूर्ण जनावरांचा सांभाळ करून प्रति जनावर दूध उत्पादन वाढविता येते.
 • नव्याने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांनी व्यवसायाची सुरवात करण्यापूर्वीच प्रशिक्षण घेणे फायद्याचे ठरते. व्यवसाय सुरू केल्यावर सुद्धा व्यवसाय वृद्धी करण्यासाठी किंवा प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.

प्रशिक्षण मिळण्याची ठिकाणे

 • दुग्ध व्यवसायाची प्रशिक्षणे अनेक संस्थांकडून आयोजित केली जातात. परंतु शक्यतो शासकीय किंवा नावाजलेल्या संस्थांमधूनच प्रशिक्षण घ्यावे.
 • प्रशिक्षणास तज्ज्ञ पशुवैद्यक किंवा तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असल्याची खात्री करून घ्यावी. खालील ठिकाणी प्रशिक्षण मिळू शकते.
 • पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष घटक योजनेतून मागासवर्गीयांसाठी जिल्हास्तरावर मोफत प्रशिक्षण आयोजित केले जाते.
 • पशुपालकांची मागणी असल्यास वेळोवेळी सशुल्क प्रशिक्षनेही आयोजित केली जातात.
 • पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रे यांच्या मार्फतही संपूर्ण अथवा विविध विषयांवर प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
 • महिला आर्थिक विकास महामंडळ, समाजकल्याण विभाग यांच्यामार्फत महिला, अपंग व मागास वर्गीय यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
 • सहकारी तसेच खासगी दूध संस्था, विविध बिगर शासकीय संस्था (NGO), विविध गोशाळा, नावाजलेल्या संस्था दुग्ध व्यवसायावर प्रशिक्षणे आयोजित करत असतात.
 • अनेक यशस्वी पशुपालक किंवा खासगी तज्ज्ञ पशुवैद्यक उत्कृष्ट नियोजन केलेल्या गोठ्यावर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण आयोजित करतात.

प्रशिक्षणाचे फायदे

 • परिपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमातून दुग्ध व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान एकाच वेळी मिळते, नियोजनातील बारकावे समजतात, त्यामुळे दुग्ध व्यवसाय फायद्याचा करता येतो.
 • व्यवसायातील धोके जोखीम अगोदरच समजल्याने खबरदारीच्या उपाययोजना करून नुकसान टाळता येते. आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तज्ज्ञ व्यक्ती, पशुवैद्यक किंवा यशस्वी पशुपालक यांच्याबरोबर संवाद साधता येतो.
 • प्रशिक्षणातून मिळणाऱ्या वाचन साहित्यातून वेळोवेळी उपयोगी पडणारी तयार स्वरूपाची माहिती उपलब्ध होते.
 • व्यवसाय अगोदरच सुरू केला असल्यास उत्पादन व उत्पन्नवाढीसाठी ठराविक विषयाच्या नवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती मिळवता येते.

सल्ला व मार्गदर्शन

 • दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी जसे प्रशिक्षण गरजेचे आहे तसे व्यवसाय सुरू असताना वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. पारंपरिक पशुपालनात असा सल्ला घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा गावातील त्या विषयातील माहितगाराकडून मिळत असे. परंतु आधुनिक पशुपालनात उद्भविणाऱ्या नव नवीन समस्या, यांत्रिकीकरण, नवीन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यक किंवा तज्ज्ञ तांत्रिक व्यक्तीकडून सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे झाले आहे.
 • दुग्ध व्यवसायात सल्ला किंवा मार्गदर्शन हे दोन प्रकारे घेतले जाते. पहिला प्रकार हा ठराविक समस्येवर उपाययोजना करणे आणि दुसरा प्रकार म्हणजे व्यवसाय सुरू असताना वेळोवेळी माहिती घेऊन उत्पादकता वाढविण्यासाठी किंवा उद्दिष्टे ठरवून ते गाठण्यासाठी नियोजन करणे.

सल्ला, मार्गदर्शन कुठून मिळेल

 • नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून स्थानिक परिस्थितीनुसार योग्य सल्ला अाणि शासकीय योजनांची माहिती सहज मिळू शकते.
 • पशुवैद्यकीय महाविद्यालये, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रे यांच्या विस्तार विभागाकडूनही पशुपालकांना मार्गदर्शन केले जाते.
 • टोल फ्री दूरध्वनी क्रमांक – पशुपालकांना विविध विभागांच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळू शकते.
 • वृत्तपत्र, मासिके यांच्यातून प्रकाशित होणाऱ्या तांत्रिक लेखांतून ठराविक समस्याबद्दल किंवा नवीन तंत्रज्ञानाबद्दल लेखकांबरोबर संपर्क साधून अधिक माहिती घेता येते.
 • सर्वांत सहज उपलब्ध असणारे सल्लागार म्हणजे मोबाईल, इंटरनेटद्वारे विविध संकेतस्थळे (website), गुगल, यू-ट्यूब, ब्लॉग्ज, विविध अॅपवरून माहिती तेथे प्रतिक्रिया नोंदवून मिळवता येते. (परंतु ही माहिती खात्रीशीर अाहे किंवा नाही याची खात्री करणे अावश्‍यक असते) शासनाच्या किंवा विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रमाणित शास्त्रीय माहिती उपलब्ध असते.
 • चर्चा सत्रे, परिसंवाद, कार्यशाळा येथून ठराविक विषयाची माहिती उपलब्ध होऊ शकते.
 • औषध कंपन्या, पशुखाद्य कंपन्या, दुग्ध व्यवसायातील विविध उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यासुद्धा त्यांच्या उत्पादनाशी संबंधित ठराविक सल्ला व मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देतात.
 • खासगी पशुवैद्यक किंवा तज्ज्ञ सल्लागार व्यक्तींकडूनही सल्ला व मार्गदर्शन मिळते.

सल्ला, मार्गदर्शनाचे फायदे

 • दुग्ध व्यवसायाचे ध्येय व उद्दिष्टे ठरवून, ते गाठण्यासाठी प्रयत्न करता येतात.
 • प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य आहार नियोजन, गोठ्यावरील दैनंदिन नियोजन इ. मध्ये सुधारणा करून खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करता येतात.
 • व्यवसायात उद्भविणाऱ्या समस्यांची कारणे शोधून, योग्य नियोजनाद्वारे समस्यांचे निराकरण करता येते.
 • उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करून उत्पादकता व उत्पन्न वाढविणे शक्य होते.

संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१
(पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, बुर्ली, ता. पलूस, जि. सांगली)

इतर कृषिपूरक
भारतीय मागूर माशांचे बिजोत्पादन...कमी संवर्धन कालावधी (सहा ते सात महिने), कमी...
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...
प्रतिबंधात्मक उपचारांनी टाळा जनावरांतील... जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघात...
देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या...
स्वच्छता, योग्य व्यवस्थापनातून टाळा...शेडमधील अस्वच्छता अाणि अनियोजित व्यवस्थापनामुळे...
पूर्वतयारीनेच करा मत्स्यबीजाचे संवर्धनमत्स्यसंवर्धनामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास...
कृत्रिम बुद्धिमत्ता करते गाईंच्या...परदेशातील पशुपालकांकडे पीक लागवड क्षेत्राच्या...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
पशुपालन सल्ला शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी दोन वर्षाला...
जनावरांमध्ये वजन मापनाचे महत्त्वजनावरांना दैनंदिन व्यवस्थापनात त्यांच्या शरीर...
अोळखा जनावरांतील शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
उत्तम आर्थिक नियोजनातून व्यावसायिक...आंतरवाली (ता. नेवासा, जि. नगर) येथील अंकुश कानडे...
पशुपालन सल्लावाढत्‍या उष्‍णतेमुळे जनावरांच्या आहारावर विपरीत...
जिरायती भागात आठ वर्षे यशस्वी पोल्ट्री...चिंचनेर वंदन (ता. जि. सातारा) या सैनिकी परंपरा...
शस्त्रक्रियेने बरा होतो जनावरांतील...मूतखडा हा रोग प्रमुख्याने खच्चीकरण केलेला बैल,...
जनावरांतील गर्भाशय संसर्ग ः लक्षणे अन् ...प्रसूतीनंतर उद्‌भवणारा गर्भाशय संसर्ग हा त्या...
कुक्कुटपालन सल्लाकुक्कुटपालन व्यवसायात ६५ टक्के फायदा...
गाभण गाईंचे योग्य व्यवस्थापन ठेवा...गाभण गाईची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. गर्भाची...