जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
कृषिपूरक
जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता ठरलेल्या वेळी वेळापत्रकानुसार वेळोवेळी लसीकरण करावे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.
जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता ठरलेल्या वेळी वेळापत्रकानुसार वेळोवेळी लसीकरण करावे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा.
लसीकरण करण्यापूर्वी आठवडाभर आधी जनावरांना जंतनाशक पाजावे. जनावरांच्या शरीरावरील गोचीड, उवा, लिखा, पिसवांचे योग्य प्रकारे नियंत्रण करावे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. बैलांच्या शरीरावर ताण पडू नये म्हणून लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे. उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना चांगला आहार द्यावा. लसीकरण केल्यानंतर अति उष्ण व अति थंड वातावरणापासून संरक्षण करावे. दूरवरची वाहतूक टाळावी. लसीकरण केल्यानंतर काहीवेळा जनावरांमध्ये ताप येतो. तसेच मान न हलवणे अशी लक्षणे आढळतात. परंतु ही लक्षणे तात्कालीक आणि सौम्य स्वरुपाची असतात.
लस दिल्यानंतर मानेवर गाठी येऊ नयेत म्हणून त्या जागेवर हलके चोळल्यास गाठ येत नाही. आलेल्या गाठीला कोमट पाण्याने शेकले तर गाठ जिरुन जाते.
लसीकरणामुळे येणारा ताप व शारीरिक ताण यामुळे थोड्या प्रमाणात दूध उत्पादन कमी होऊ शकते. परंतु ते केवळ १ ते २ दिवस रहाते. नंतर पूर्वीप्रमाणेच दूध उत्पादन मिळते.
लसीकरणाचा फायदा
- रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न पहाता वेळापत्रकानुसार लसीकरण करावे.
- रोगाची साथ येण्याअगोदर लसीकरण केल्यामुळे दोन ते तीन आठवडे रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्याअगोदरच जनावरांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते. पुढे होणारे नुकसान टाळता येते.
लसीकरणासाठी योग्य वय
- घटसर्प व फऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सहा महिन्यांची वासरे किंवा मोठ्या वयाच्या जनावरांत करावे.
- लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण जर वासराच्या आईला केले नसेल, तर सहा ते सात आठवडे वयाची वासरे आणि त्यापुढील जनावरांना करावे.
- आंत्रविषार रोग नियंत्रणाची लस वासराच्या आईला दिली नसेल, तर ती वासराच्या पहिल्या आठवड्यात द्यावी. लस दिली असेल तर चार ते सहा आठवडे वयाच्या वासराला द्यावी.
रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर घ्यावयाची काळजी
- आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवून जागेवरच चारा, पाणी द्यावे. चाऱ्यासाठी बाहेर सोडू नये.
- डबके, नदीनाल्यातील पाणी पाजू नये.
- रोगाचा संसर्ग झालेल्या जनावरांवर वेळेत उपचार करावेत.
- रोगाची साथ आलेल्या भागात जनावरे नेऊ नयेत. त्या भागातील जनावरे इतर ठिकाणी नेऊ नयेत.
- रोगाची साथ आलेल्या भागातील बाजार, प्रदर्शने बंद ठेवावीत.
- मेलेले जनावर तसेच दूषित मलमूत्र, चारा यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी.
- जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
संपर्क ः डॉ. वैभव कदम, ९०९६५८२००४
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर )
- 1 of 17
- ››