अवजारे कमी करतील महिलांचे श्रम

टोकणयंत्र
टोकणयंत्र

मध्यम ते मोठ्या आकाराच्या बियाण्याची टोकण पद्धतीने पेरणी तसेच विरळ झालेल्या पिकात तूट लावण्यासाठी टोकणयंत्र उपयुक्त आहे. ओळीमध्ये पेरणी केलेल्या पिकात आंतरमशागत करण्यासाठी चाकाचे हात कोळपे फायदेशीर ठरते. धनलक्ष्मी विळ्यामुळे पीक कापताना बोटाला इजा होत नाही.   टोकणयंत्र ः

  • भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने एका महिलेस सहज चालविता येईल असे टोकणयंत्र विकसित केले आहे.
  • सोयाबीन, मका, कापूस, इत्यादी मध्यम ते मोठ्या आकाराच्या बियाण्याची टोकण पद्धतीने पेरणी करण्यासाठी व विरळ झालेल्या पिकात तूट लावण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे.
  • यंत्रास एक हँडेल, बीजपेटी, बियाणे टोकण्यासाठी रोलर व जबड्यासारखा फण आहे.
  • रोलर फिरविण्यासाठी लीव्हरचा वापर करण्यात येतो.
  • बीजपेटीतील बियाणे भरून योग्य ठिकाणी ठेवावे. हँडलवर समोरील बाजूस हलका दाब दिला असता लीव्हरच्या ताणामुळे रोलर फिरतो. जबडा उघडला जाऊन बी टोकले जाते.
  • टोकणयंत्राची क्षमता १० ते १२ गुंठे प्रतिदिवस एवढी असून एक महिला किंवा पुरुष सहज चालवू शकते.
  • पारंपारिक पद्धतीपेक्षा कष्ट व वेळ कमी लागतो. बियाणे टोकण्यासाठी वारंवार वाकण्याची गरज नाही. बियाण्याची बचत होते.
  • अंदाजे किंमत ः २५०० रूपये
  • चाकाचे हात कोळपे ः

  • ओळीमध्ये पेरणी केलेल्या पिकात आंतरमशागत करण्यासाठी उपयुक्त.
  • कोळप्यामध्ये एक चाक, व्ही आकाराची पास आणि हँडल अाहे.
  • हे कोळपे एक महिला उभे राहून ढक्कल पद्धतीने सहज चालवते. ओढा व ढकला पद्धतीने चालविल्यामुळे तण निघून त्याचे बारीक तुकडे होतात. ते मातीमध्ये मिसळते.
  • पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनंतर ज्या वेळी तण एक ते दीड इंच उंच असते त्या वेळी हे कोळपे अांतरमशागतीसाठी वापरावे. हे कोळपे उभे राहून चालविल्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी कष्ट पडतात. मजुरांची कार्यक्षमता वाढते.
  • अंदाजे किंमत ः १३०० रुपये.
  • दोन चाकाचे निंदणी यंत्र ः

  • यंत्र भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने विकसित केले आहे.
  • एक महिला किंवा पुरुषास हे यंत्र सहज चालविता येते.
  • पिकांमधील निंदणी व आंतरमशागतीसाठी यंत्राचा वापर पिकाच्या दोन ओळीमध्ये करता येतो. ओढा व ढकला पद्धतीने काम करत असल्यामुळे रोपांना मातीचे आच्छादन मिळते, मातीमधील हवा खेळती राहून पिकाची जोमाने वाढ होते.
  • दोन चाकाच्या निंदणी यंत्राने दोन इंचापर्यंतचे गवत काढता येते. आठ ते दहा तासात एक एकर क्षेत्राची निंदणी करता येते.
  • यंत्राची लांबी १.३ मीटर, रुंदी ०.४६ मीटर, उंची एक मीटर असून वजन ४.५ किलो आहे.
  • अंदाजे किंमत ः ८०० रुपये
  • धनलक्ष्मी विळाः

  • विळ्याने गवत, भात, गहू चांगल्याप्रकारे कापता येतो.
  • पात्याला दिलेल्या विशिष्ट बाकामुळे हाताला चांगली पकड येऊन पीक, गवत कापताना बोटाला इजा होत नाही. विशिष्ट रचनेमुळे पीक, गवत जमिनीलगत कापणे शक्य होते.
  • विळा वजनाला हलका असून वजन अंदाजे १७५ ते २०० ग्रॅम आहे.
  • विशिष्ट प्रकारचे पोलाद वापरल्याने विळ्याला वारंवार धार करावी लागत नाही.
  • एक महिला एका दिवसात ०.१२ हेक्टर क्षेत्रावरील गवत, पीक कापून घेऊ शकते.
  • अंदाजे किंमत ः ८० रूपये
  • संपर्क ः डॉ. एस. एस. वाणे ९४२३४७३६२९ (कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com