माळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता

माळीवाडा (ता. पाथरी) ः शाळेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले.
माळीवाडा (ता. पाथरी) ः शाळेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले.

पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (ता. पाथरी) येथील आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. २५) पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (एम.आय.ई.बी.) स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळांतर्गत राज्यातील १३ शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. या शाळांचा माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतराष्ट्रीय ओजस असे नामकरण आणि लोकार्णपण सोहळा मंगळवारी (ता. २५) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माळीवाडा (ता. पाथरी) येथील शाळेत करण्यात आले. शाळेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मोहनभाऊ फड, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते, शिक्षणाधिकारी आशाताई गरुड, मंगलताई गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुदाम चिंचाणे यांनी केले. सूत्रसंचालन डोंगरे आणि श्रीमती पाटील, तर आभार सुरेश इखे यांनी मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com