agriculture story in marathi, innogration of international school in maliwada, pathri, dist. Parbhani | Agrowon

माळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता
माणिक रासवे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (ता. पाथरी) येथील आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. २५) पार पडला.

पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (ता. पाथरी) येथील आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे नामकरण आणि लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. २५) पार पडला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची (एम.आय.ई.बी.) स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळांतर्गत राज्यातील १३ शाळांना आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. या शाळांचा माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतराष्ट्रीय ओजस असे नामकरण आणि लोकार्णपण सोहळा मंगळवारी (ता. २५) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण माळीवाडा (ता. पाथरी) येथील शाळेत करण्यात आले. शाळेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मोहनभाऊ फड, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते, शिक्षणाधिकारी आशाताई गरुड, मंगलताई गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुदाम चिंचाणे यांनी केले. सूत्रसंचालन डोंगरे आणि श्रीमती पाटील, तर आभार सुरेश इखे यांनी मानले. 

इतर ग्रामविकास
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
विकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...
पिंगोरीची दुष्काळावर मात, भाजीपाला... अगदी २०१२ पर्यंत दुष्काळी असलेल्या पिंगोरी...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
एकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम...लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) गावाने...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
पाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत...हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
कृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...
सांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडेनगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार...
माळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा... पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (...
प्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध...लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील...
पेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध...यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
एकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...