Agriculture story in marathi, Introduction of Parasitoids | Agrowon

परोपजीवी मित्र-कीटकांची ओळख
विवेक सवडे, डॉ. धीरज कदम
बुधवार, 23 जानेवारी 2019

सध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या अविवेकी वापर केला जात असल्याने मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा स्थितीमध्ये परोपजीवी मित्रकीटकांची ओळख आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे.

सध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या अविवेकी वापर केला जात असल्याने मित्रकीटकांचे प्रमाण कमी झाले आहे. अशा स्थितीमध्ये परोपजीवी मित्रकीटकांची ओळख आणि संवर्धन काळाची गरज बनली आहे.

कीडनाशकांच्या अतिरेकी व अविवेकी वापरामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढत असून, नियंत्रण करणे अवघड होत आहे. सोबतच शेतातील मित्रकीटकांची संख्याही कमी होत आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग मोठा असून, त्यात शेतीसाठी नुकसानकारक असलेल्या किडीसोबतच असंख्य उपयुक्त कीटकही आहेत. अशा उपयुक्त कीटकांच्या साह्याने "जीवो जीवस्य जीवनम'' या मूलभूत तत्त्वावर किडींचे जैविक पद्धतीने नियंत्रण करणे शक्य आहे.

परोपजीवी मित्र कीटक
हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान असतात. ते किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहतात. किंवा किडींच्या शरीरामध्ये, शरीरावर अंडी घालून तिला हळूहळू खातात.
परजीवी मित्र-किडींचे वर्गीकरण
अंडी -परोपजीवी (Egg Parasitoid)
या परोपजीवी कीटकाची मादी यजमान किडीच्या अंड्यामध्ये अंडी घालते. त्यातून बाहेर आलेली अळी यजमान किडीच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाते. ३ ते ४ दिवसांत अळी कोषावस्थेत जाते. अशा प्रकारे अंडी, अळी व कोष या तिन्ही अवस्था यजमान किडीच्या अंड्यातच पूर्ण होतात. कोषातून बाहेर पडलेला प्रौढ अंड्याला छिद्र पाडून बाहेर पडतो. या प्रक्रियेमध्ये यजमान किडीची अंडी उबण्याआधीच नष्ट होतात.

परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड

 • ट्रायकोग्रामा चिलोनस - कपाशीवरील बोंड अळ्या, उसावरील कांडी कीड अणि भातावरील पाने गुंडाळणारी अळी इ.
 • ट्रायकोग्रामा जपोनिकम आणि टेलिनॉमस रोवाणी - भातावरील खोड कीड
 • टेलिनॉमस रीमस - तंबाकूची पाने खाणारी अळी
 • ट्रायकोग्रामा बॅक्टरी - कपाशीवरील गुलाबी बोंड अळी

अंडी - अळी- परोपजीवी (Egg-larval Parasitoid)
मादी परोपजीवी यजमान किडीच्या अंड्यांमध्ये अंडी घालते, परंतु त्यांच्या अळ्यांचा विकास होऊन प्रौढ हे यजमान किडीच्या अळी अवस्थेतून त्यांना नष्ट करून बाहेर येतात.

परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड

 • कोपिडोसोमा कोहेलेरी - बटाट्यावरील पाकोळी
 • चेलोनस ब्लॅकबर्नी - ठिपक्याची बोंड अळी

अळी - परजीवी (Larval Parasitoid)
मादी यजमान किडींच्या अळ्यांवर किंवा त्यांच्या शरीराच्या आत अंडी घालते. शरीरातील द्रव परजीवी किडीच्या अळ्या खाऊन टाकतात. त्यामुळे यजमान किडींच्या अळी मृत होते.

परोपजीवी मित्र कीटक - यजमान कीड

 • ब्रॅकोन ब्रेव्हीकोर्निस आणि ब्रॅकोन हेबेटर ः कापसावरील बोंड अळी, बटाट्यावरील पाकोळी, भेंडीवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, भात, मका व उसावरील खोड किडा, नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी
 • कोटेशिया प्लुटेला ः कोबी वरील चौकोनी ठिपक्याचा पतंग
 • गोनियोझस नेफॅन्टिडीस ः नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी
 • प्लॅटिग्यास्टर ओरायजी ः भातावरील गाद माशी
 • कॅम्पोलेटिस क्लोरीडा ः कापसावरील बोंड अळी
 • एरिबोरस ट्रोचेनन्टेरॅटस ः नारळावरील काळ्या डोक्‍याची अळी

डॉ. धीरज कदम, ९४२१६२१९१०, विवेक सवडे, ९६७३११३३८३
(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील सहयोगी प्राध्यापक असून, विवेक सवडे हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.) 

इतर ताज्या घडामोडी
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३५९० रुपये...अकोला ः हंगामाच्या तोंडावर पैशांची तजवीज...
कृषी सहायकांसाठी ग्रामपंचायतीत बैठक...मुंबई : शेतकरी आणि शासन यांच्यातला दुवा...
आकड्यांचा खेळ आणि पोकळ घोषणा : शेतकरी...पुणे ः राज्य अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची निराशा झाली...
राज्यावर पावणेपाच लाख कोटींचे कर्जमुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
अर्थसंकल्पावेळी विरोधकांचा सभात्यागमुंबई : अर्थसंकल्प विधिमंडळात सादर...
संत श्री निवृत्तिनाथ महाराज यांच्या...नाशिक  : आषाढी एकादशी वारीसाठी संत श्री...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...