agriculture story in marathi, Kiwifruit duplicated its vitamin C genes twice, ५० million and २० million years ago | Agrowon

किवी फळातील अधिक ‘क’ जीवनसत्त्वाचे रहस्य उलगडले
वृत्तसेवा
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अंदाजे ५० ते ५७ दशलक्ष आणि १८ ते २० दशलक्ष वर्षांपूर्वी दोन वेगवेगळ्या वेळी अचानक आपल्या गुणसूत्राची नक्कल केली. त्यामुळे फळातील क जीवनसत्त्वांच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झाली. परिणामी सध्याचे किवी फळ हे चिनी गुसबेरीच्या कुळातील असून, त्यात संत्र्यापेक्षा अधिक क जीवनसत्त्व आहे. हे संशोधन ‘आयसायन्स’मध्ये प्रकाशित झाले आहे.

किवी फळझाडाच्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अंदाजे ५० ते ५७ दशलक्ष आणि १८ ते २० दशलक्ष वर्षांपूर्वी दोन वेगवेगळ्या वेळी अचानक आपल्या गुणसूत्राची नक्कल केली. त्यामुळे फळातील क जीवनसत्त्वांच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झाली. परिणामी सध्याचे किवी फळ हे चिनी गुसबेरीच्या कुळातील असून, त्यात संत्र्यापेक्षा अधिक क जीवनसत्त्व आहे. हे संशोधन ‘आयसायन्स’मध्ये प्रकाशित झाले आहे.

उत्तर चीन शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक फळातील जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असण्यामागील कारणांचा शोध आहेत. येथील कृषी वनस्पती शास्त्रज्ञ क्षियीन वांग यांनी सांगितले, की अचानक एका रात्रीत जनुकांच्या हजारो अधिक प्रती तयार करण्याच्या उत्क्रांतीच्या घटनेला बहूगुणन (इंग्रजीमध्ये पॉलिप्लोयडी -Polyploidy) म्हणतात. या अतिरिक्त प्रतींमुळे वनस्पतींच्या गुणधर्मामध्ये प्रचंड वाढ होते. यातून जैविक प्रक्रियाच्या छाटणी आणि पुनर्जोडणीसाठी नैसर्गिक निवडीच्या अनेक संधी तयार होतात. अशा घटनांचा किवी फळातील मागोवा घेण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. त्यांनी किवी फळांच्या जनुकीय संरचनेची तुलना कॉफी आणि द्राक्षाच्या जनुकीय संरचनेशी केली आहे. किवी, कॉफी आणि द्राक्षे यांचे प्राचीन पूर्वज समान असून, जनुकीय माहितीचा मोठा भाग सारखा आहे.
जेव्हा वांग आणि त्यांच्या गटाने तिन्ही पिकांच्या जनुकांनी एकमेकांशी जुळवून घेतलेल्या हजारो जनुकांचे विश्‍लेषण केले. त्यात द्राक्ष आणि कॉफी पिकांच्या तुलनेमध्ये किवी फळांच्या जनुकीय संरचनेमध्ये एकेका जनुकांच्या चार ते पाच प्रती असल्याचे आढळले. या जादा जनुकांमुळे क जीवनसत्त्वाची निर्मिती आणि पुनर्वापराच्या जैवपातळीवरील बदल होतात.
 
क जीनवसत्त्वाचे महत्त्व
क जीवनसत्व हे केवळ मानवासाठी आरोग्यदायी आहे, असे नव्हे, तर त्यामुळे वनस्पतीची वाढ आणि प्रतिकारकताही अवलंबून असते. अत्युच्च पातळीवर क जीवनसत्त्वाच्या निर्मितीमुळे किवी फळझाडे ही उत्क्रांतीच्या खेळामध्ये पुढे निघून गेल्याच दिसते. याच्याविरुद्ध कॉफी झाडांच्या बियांमध्ये स्पर्धा करणाऱ्या शेजारच्या झाडांना मारणारे किंवा रोखणारे नैसर्गिक घटक (कॅफिन) तयार करण्याची क्षमता येते. अतितीव्र उष्णतेपासून संरक्षणासाठी द्राक्षामध्ये जांभळ्या रंगाचे पिगमेंटस तयार होतात.

उत्पादन आणि दर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त संशोधन

  • वांग आणि त्यांच्या गटाला अभ्यासामध्ये दोन उत्क्रांतीच्या घटना आढळल्या. त्या स्वयं बहुगुणनाच्या (auto-polyploidization) प्रक्रियेमध्ये स्वतःच्या जुनकांच्या प्रति तयार केल्या जातात. पर बहुगणन (allo-polyploidization) प्रक्रियेमध्ये आंतरपैदास होते. उदा. केळी, बटाटा आणि ऊस ही पिके स्वयं बहुगुणक आहेत, तर गहू, कपाशी आणि स्ट्रॉबेरी ही परबहुगुणक आहेत. अर्थात, पर बहुगुणक पिकांची संख्या ही स्वयं बहुगुणकांपेक्षा अधिक असल्याची नोंद संशोधक करतात.
  • किवी फळाच्या या प्रती काढण्याच्या तंत्रातून पोषकता वाढवणाऱ्या जनुकांची वाढ करण्याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. त्यात कृत्रिमरीत्या काही जनुकांच्या प्रती करणे शक्य झाल्यास रोग प्रतिकारक किंवा अधिक पोषक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे शक्य होणार आहे.
  • वांग यांचा गट किवी आणि अन्य वनस्पतींच्या जनुकांच्या विश्लेषणाचे काम करत आहे. त्यातून उत्तम फळे आणि भाज्या यांच्या जाती तयार करता येतील.

 

इतर बातम्या
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...