agriculture story in marathi, koi fish (Anabas Testudineus) rearing | Agrowon

गोड्या पाण्यातील संवर्धनासाठी कोई मासे
उमेश सूर्यवंशी, सोमनाथ यादव
मंगळवार, 27 मार्च 2018

कोई माशांचे संवर्धन अत्यंत सोपे व अधिक फायदेशीर आहे. हा मासा चविष्ट असतो व त्यात पोषकतत्त्वेदेखील मुबलक असतात. अलीकडच्या काळातील संवर्धन पद्धती अाणि पाैष्टिक गुणधर्मामुळे गोड्या पाण्यातील छोट्या तलावामध्ये कोई माशांचे संवर्धन करता येते.
 
कोई मासे (ऍनाबस टेस्टुडिनीअस ः Anabas Testudineus) गोड्या पाण्यात, नदी, नाले, कालवे, दलदल इ. ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने हा मासा बांगलादेशमध्ये जास्त प्रचलित आहे.

कोई माशाचे संवर्धनयोग्य गुणधर्म

कोई माशांचे संवर्धन अत्यंत सोपे व अधिक फायदेशीर आहे. हा मासा चविष्ट असतो व त्यात पोषकतत्त्वेदेखील मुबलक असतात. अलीकडच्या काळातील संवर्धन पद्धती अाणि पाैष्टिक गुणधर्मामुळे गोड्या पाण्यातील छोट्या तलावामध्ये कोई माशांचे संवर्धन करता येते.
 
कोई मासे (ऍनाबस टेस्टुडिनीअस ः Anabas Testudineus) गोड्या पाण्यात, नदी, नाले, कालवे, दलदल इ. ठिकाणी आढळतात. प्रामुख्याने हा मासा बांगलादेशमध्ये जास्त प्रचलित आहे.

कोई माशाचे संवर्धनयोग्य गुणधर्म

 • या माशांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे.
 • प्रदूषित पाण्यामध्येही कोई माशांचा मरतुकीचा दर कमी असतो.
 • संवर्धन जास्त संचयन घनता ठेवून करता येते.
 • छोट्या तळ्यामध्ये अथवा पिंजरा संवर्धनासाठी कोई माशांचा वापर करता येतो.
 • कोई माशांचा संवर्धन कालावधी कमी म्हणजेच ३-४ महिन्यांपासून एका वर्षात २ ते ३ वेळा उत्पादन घेणे शक्‍य आहे.
 • कोई माशांची रोगप्रतिकारक क्षमता इतर माशांच्या तुलनेत जास्त असते.
 • संवर्धनाचा खर्च कमी असतो.
 • माशांसाठी घरगुती खाद्य वापरता येत असल्यामुळे खाद्यावर होणारा खर्च कमी केला जाऊ शकतो.

संवर्धनाचे प्रकार
कोई माशांचे संवर्धन छोटे तळे किंवा सिमेंटच्या टाकीमध्ये करता येते.
१) तळ्यातील संवर्धन ः
सवर्धन तळे मोकळ्या हवेशीर ठिकाणी अाणि मूबलक सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी असावे. तळ्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे काढून टाकावीत. कमीत कमी आठ तास सूर्यप्रकाश तळ्यावर पोचेल अशी तळ्याची व्यवस्था असावी.

 • छोट्या तळ्यामध्ये कोई माशांची वाढ जलद होते.
 • माशांच्या चांगल्या वाढीसाठी ०.०५ ते ०.२ हेक्‍टर क्षेत्रफळाचे तळे सोयीचे असते. छोट्या क्षेत्रफळाचे तळे सहजतेने हाताळता येते.
 • सुरवातीला तळ्यामधील शक्‍य असल्यास पूर्ण पाणी काढून तळे चांगले सुकवावे. तलाव पूर्णपणे सुकल्यानंतर नंतर प्रती ४० चौरस मीटरसाठी १ किलो चुना थोड्या पाण्यामध्ये विरघळवून वापरावा.
 • चुन्याची मात्रा दिल्यानंतर तलावात स्वच्छ गाळलेले पाणी भरावे.
 • तळ्यामध्ये ५ किलो ताजे शेण, २०० ग्रॅम युरिया अाणि २०० ग्रॅम टीएसपी (ट्रीपल सुपर फॉस्फेट) प्रति ४० चौ.मी. साठी वापरावे.
 • खताची मात्रा दिल्यानंतर ५ ते ६ दिवसांनी कोई माशाची बोटुकली तळ्यामध्ये सोडावी.
 • तळे सुकविणे शक्‍य नसेल तर तळ्यातील इतर जलचर प्राण्यांचा व दुसऱ्या प्रजातीच्या मत्स्य भक्षक माशांचा नायनाट करून कोई माशांची बोटुकली तळ्यात सोडावी.
 • तळ्यातील इतर परभक्षक मासे जलचर प्राणी व वनस्पती काढल्यानंतर प्रति ४० चौरस मीटरसाठी १ किलो चुना मिसळावा त्यानंतर ३ ते ५ दिवसांनी प्रति ४० चौ.मी. साठी ५ किलो या प्रमाणात ताजे शेणखत मिसळावे. पाण्यात २०० ग्रॅम युरिया व २०० ग्रॅम टीएसपी प्रति ४० चौरस मीटरसाठी मिसळावे.
 • पाण्याचा रंग फिकट हिरवा होईल तेव्हा पाण्यात कोई माशांची बोटुकली सोडावी. कोई माशांची संचयन घनता जास्तीत जास्त ५ ते ६ नग/ चौ.मी. व सरासरी ३ नग/ चौ.मी. एवढी ठेवली जाते.
 • बोटुकली श्‍वसनासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येत असल्याने सहजरीत्या पक्ष्यांचे भक्ष बनू शकतात त्यासाठी पक्षी प्रतिबंधक जाळे तळ्यावर बसविणे अनिवार्य असते. व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाण्याची प्रत वेळोवेळी तपासणे आवश्‍यक अाहे.

२) सिमेंट टाकीमधील संवर्धन
कोई माशांच्या बोटुकलीचे सिमेंटच्या टाकीमध्येदेखील संवर्धन करता येते. टाकीच्या तळाशी १५-२० सें.मी. एवढा मातीचा थर द्यावा. टाकीमधील पाण्याचा पृष्ठभाग ३० ते ४० टक्के जलवनस्पतींनी अच्छादलेला असावा. त्यामुळे माशांना नैसर्गिक वातावरण प्राप्त होते. टाकीमधील संवर्धनासाठी बोटुकलीचे आकारमान कमीत कमी ६.५ सें.मी. व वजन ५ ग्रॅम एवढे असावे. टाकीमधील बोटुकलीची संचयन घनता साधारणपणे ५० ते ७० नगर प्रति चौ.मी. एवढे ठेवतात.

खाद्य व्यवस्थापन
खाद्यामध्ये साधारण २५ टक्के मत्स्यकुटी, ३० टक्के भाताचा कोंडा, २५ टक्के पेंड, २० टक्के इतर खाद्य पदार्थ यांचे मिश्रण (शेंगदाणा/सोयाबीन पेंड) पुरवावे.

 • बाजारपेठेत उपलब्ध असलेले उत्तम दर्जाचे पूरक खाद्य पुरविले जाऊ शकते. पूरक खाद्यात पॅलेट खाद्य दिल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. पॅलेट खाद्यामध्ये साधारणपणे ३० ते ३५ टक्के प्रथिने असावेत.
 • कोई माशांच्या संवर्धन कालावधीच्या सुरवातीचे काही दिवस शारीरिक वजनाच्या तुलनेत जास्त खाद्य पुरवावे लागते. नंतर जसजसा संवर्धन कालावधी वाढतो तसतसे खाद्याचे प्रमाण शरीराच्या वजनाच्या तुलनेत कमी करावे. (परंतु एकूण खाद्य वाढत जाते) सुरुवातीला म्हणजे पहिल्या महिन्यात माशांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्के, दुसऱ्या महिन्यात ६ टक्के व तिसऱ्या महिन्यात ३ टक्के खाद्य पुरवावे.
 • प्रत्येकी १००० कोई बोटुकलीसाठी खाद्याचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे केले जाते.

वय (दिवस) - खाद्य (ग्रॅममध्ये)  
०-१५ - ४००
१६-३० - ६००
३१-४५ - ८५०
४६-६० - १०००
६१-७५ - १२००
७६-९० - १३००
९१-१०५ - १३५०
१०६-१२० - १४००

कोई संवर्धनातील काही महत्त्वाच्या बाबी

 • पाण्याचा दर्जा उत्तम राखणे.
 • पाण्याचा सामू नियंत्रणात ठेवणे.
 • वनस्पती प्लवंगांचे व शेवाळाचे प्रमाण कमी ठेवणे.
 • पावसाळ्यात तळ्याच्या आजूबाजूला जाळी लावावी जेणेकरून मासे तळ्याबाहेर पडणार नाही.
 • नेहमी दर्जात्मक खाद्य वापरावे.

माशांना पकडणे
कोई मासे विक्रीयोग्य साधारणपणे ३-४ महिन्यांच्या कालावधीमध्ये होतात. विक्रीयोग्य माशांचे वजन ४० ते ८० ग्रॅमपर्यंत असते. कोई मासे पकडणे सोईस्कर होण्यासाठी तलाव रिकामा करून मासे पकडतात.
 
संपर्क ः उमेश सूर्यवंशी, ९०९६९००४८९
(मत्स्य साधनसंपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर) 

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....
जनावरांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्वेजीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जनावरांचे स्वास्थ्य...
तापमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात...उन्हाळ्यात तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत...
जनावरांतील उष्माघाताची कारणे, लक्षणे,...वाढते तापमान आणि प्रखर उन्हामुळे जनावरांमध्ये...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...