Agriculture story in marathi, management of anthrax disease | Agrowon

अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण अावश्यक
डॉ. विशाल केदारी, स्वामिनी नवले
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण अावश्यक जिवाणूंमुळे उद्‌भवणाऱ्या जनावरांच्या सांसर्गिक रोगांपैकी अँथ्रॅक्‍स हा एक रोग आहे. या रोगाचे जिवाणू सहसा श्‍वसनाद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात अाणि ३ ते ७ दिवसांत लक्षणे दिसू लागतात.

अँ थ्रॅक्‍स किंवा फाशी हा रोग काळपूज, गोळी, पेळू, सुश्‍या, नरपडे, भामथ्रा, हुमंडा या नावानेसुद्धा ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगांची लक्षणे दाखविण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात.

अँथ्रॅक्‍स रोगावर प्रतिबंधात्मक लसीकरण अावश्यक जिवाणूंमुळे उद्‌भवणाऱ्या जनावरांच्या सांसर्गिक रोगांपैकी अँथ्रॅक्‍स हा एक रोग आहे. या रोगाचे जिवाणू सहसा श्‍वसनाद्वारे जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात अाणि ३ ते ७ दिवसांत लक्षणे दिसू लागतात.

अँ थ्रॅक्‍स किंवा फाशी हा रोग काळपूज, गोळी, पेळू, सुश्‍या, नरपडे, भामथ्रा, हुमंडा या नावानेसुद्धा ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगांची लक्षणे दाखविण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात.

जनावरांना अनेक रोग होतात. तिन्ही ऋतूंमध्ये विविध रोगांची साथ येते. जर जनावर अचानक मृत्युमुखी पडले आणि त्यांच्या मृत्यूचे कारण समजले नाही तर तत्काळ सर्व चाचण्या घ्याव्यात नाहीतर अँथ्रॅक्‍स हा रोग इतर जनावरांना आणि मनुष्यांनासुद्धा होऊ शकतो.
 
कारणे

हा रोग सस्तन प्राण्यांमध्ये बॅसिलस अँथ्रॅसिस या जिवाणूंमुळे होतो.  

रोग प्रसार

 • रोगाचा संसर्ग झालेल्या जनावरांच्या मलमुत्रातून, नाक अाणि डोळ्यांतून वाहणारे पाणी, रक्त व लाळ यांच्या संसर्गाने तसेच कुरणातील गवत, पाणी प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
 • कुरणात चरणाऱ्या जनावरांच्या जखमांत हे जिवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगांच्या लक्षणास सुरवात होते. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो.
 • अँथ्रॅक्‍सचे जिवाणू जमिनीत व संसर्गीत चारा-पाण्यामध्ये आढळतात. श्‍वसनाद्वारे व माश्यांमुळेसुद्धा हा आजार पसरतो.

लक्षणे

 • जनावराला फार ताप येतो. (१०४ ते १०८ अंश फॅरेनहाईट).
 • जनावरे चारा खात नाहीत, पाणी पित नाही. सुस्त होतात.
 • जनावरांचे पोट फुगते, झटके देते. दुधातून रक्त येते.  
 • अतितीव्र स्वरूपाच्या आजारात जनावर अचानक मृत्युमुखी पडते आणि मेलेल्या जनावराच्या तोंडातून, गुदद्वारातून, नाकातून, कानातून काळसर रंगाचे रक्त येते. हे रक्त गोठत नाही.
 • कातडीमध्ये रक्त जमा होते व शरीराच्या छिद्रामधून बाहेर पडते.
 • पाय लुळे पडतात.
 • शरीरावर, मानेवर सूज येते.
 • जनावराचा अचानक मृत्यू (२-३ तासांत) हे साधारण लक्षण आहे.

औषधोपचार

 • आजारपणाच्या सुरवातीच्या अवस्थेत जनावरे औषधोपचाराला चांगला प्रतिसाद देतात, यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या मदतीने तातडीने उपचार करावेत.
 • पावसाळ्यापूर्वीच लस टोचून घेणे हा एक उत्तम उपाय आहे.
 • हा एक तीव्र स्वरूपाचा रोग असल्याने जनावर लवकरच मरण पावते, त्यामुळे सहसा उपचार शक्‍य होत नाही.

प्रतिबंधक उपाय

जनावरांना वेळेवर प्रतिबंधक लसीकरण करावे.

निदान

या रोगाचे निदान बॅसिलस अँथ्रॅसिस हा जिवाणू रक्त, लाळ आणि जखमांमधून वेगळा करूनच केले जाऊ शकते.

संपर्क ः डॉ. विशाल केदारी, ९५६१३०७२३१
(कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी, जि. नगर)

 

टॅग्स

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....