Agriculture story in Marathi, management of buffalo feed | Agrowon

समतोल आहारातून वाढेल दुग्धोत्पादन
डॉ. एम. व्ही. इंगवले
बुधवार, 17 जानेवारी 2018
म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता म्हशीच्या अाहार व्यवस्थापनाला फार महत्त्व अाहे. म्हशीपासून अपेक्षित दूध उत्पादन मिळवायचे असल्यास वासरे, वाढीच्या अवस्थेतील पारडी, वयात येणाऱ्या पारडी, गाभण म्हशी व भाकड म्हशी यांच्या व्यवस्थापनामध्ये अाहारावर लक्ष देणे अावश्‍यक अाहे.
 
म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता म्हशीच्या अाहार व्यवस्थापनाला फार महत्त्व अाहे. म्हशीपासून अपेक्षित दूध उत्पादन मिळवायचे असल्यास वासरे, वाढीच्या अवस्थेतील पारडी, वयात येणाऱ्या पारडी, गाभण म्हशी व भाकड म्हशी यांच्या व्यवस्थापनामध्ये अाहारावर लक्ष देणे अावश्‍यक अाहे.
 
म्हैस पालनामध्ये सर्वात जास्त खर्च (६० ते ६५ टक्के) हा म्हशीच्या अाहारावर होत असतो. त्यामुळे अधिक नफा मिळण्याकरिता अाहाराचे नियोजन हे चोख असणे गरजेचे अाहे. म्हशीच्या विविध अवस्थांमध्ये अाहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्व, खनिज मिश्रण व पाणी यांचे समतोल प्रमाण असावे.

म्हशीच्या अाहारातील विविध घटकांचे महत्त्व
१) प्रथिने ः
शरीराच्या वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्याकरिता रवंथ पोटातील जिवाणूच्या वाढीसाठी इ.
२) कर्बोदके ः
शरीराला ऊर्जा पुरविणे, दूधवाढीसाठी व दुधातील सातत्य टिकविण्यासाठी, चयापचय क्रियेसाठी इ.
३) स्निग्ध पदार्थ ः
अधिकची ऊर्जा मिळविण्याकरिता, संप्रेरकाच्या स्त्रावासाठी, फॅट मिळविण्यासाठी, काही जीवनसत्त्वे उपलब्ध होण्यासाठी. इ.
४) खनिज मिश्रण ः
चयापचायाच्या क्रियेसाठी, दूध उत्पादनवाढीसाठी व टिकून राहण्याकरिता, शरीर पोषणासाठी, वाढीसाठी, उत्तम प्रजननासाठी उपयोगी इ.
म्हशीच्या आहारामध्ये चारा (वाळलेला व हिरवा), पशुखाद्य, खनिज मिश्रण, पाणी इत्यादी घटक असणे आवश्‍यक आहे. आहारामध्ये चाऱ्याचे प्रमाण ६०-६५ टक्के तर पशुखाद्याचे प्रमाण ४०-२५ टक्के असावे.
 
गाभण म्हशीचा आहार

 • गाभण म्हशींना शरीरपोषणासाठी दररोज २ किलो पशुखाद्य व आठवड्यानंतर शेवटी दोन महिन्यामध्ये दररोज १ ते १.५ किलो संतुलित पशुखाद्य द्यावे.
 • गाभण म्हशींना दररोज ५० ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
 • मुबलक हिरवा चारा, कोरडा चारा तसेच चांगले स्वच्छ पाणी द्यावे.
 • गाभण म्हशींना हलका व्यायाम द्यावा.

चारा उत्पादनाचे नियोजन

 • म्हशीकरिता वाळलेल्या चाऱ्याकरिता ज्वारीचा कडबा, मक्‍याचा कडबा, गहू किंवा तांदळाचा पेंढा यांचा प्रामुख्याने वापर होतो.
 • हिरव्या चाऱ्यामध्ये एकदल म्हणून ज्वारी, मका, बाजरी तर द्विदल प्रथिनयुक्त चाऱ्याकरिता ल्युसर्ण, बरसीम इ. चा वापर प्रामुख्याने होतो.
 • बहुवार्षिक चाऱ्यासाठी धारवाड हायब्रीड नेपियर, जयवंत, यशवंत इ. चारा पिके प्रामुख्याने घेतली जातात. बहुवार्षिक चाऱ्यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असल्यामुळे (१० ते १२ टक्के) व गोड असल्यामुळे म्हशीसाठी उपयुक्त ठरते.
 • दर दोन ते अडीच महिने अंतराने चाऱ्याची कापणी करता येते.
 • प्रथम लावल्यानंतर तीन महिन्यांनंतर कापणी योग्य होतो.
 • एकदल चारापिके जसे मका, ज्वारी ही फुलोऱ्यात असताना कापणी करून उपयोग करावा.
 • म्हशीची संख्या, प्रकार, उपलब्ध वाळलेला चारा यावरून हिरव्या चाऱ्याचे नियोजन करावे.
 • साधारणपणे १० म्हशीकरिता एक एकरवर बहुवार्षिक चारा पिके लावावीत व दीड ते दोन एकर वर एकदल चाऱ्याचे नियोजन करावे.
 • हिरवा चारा चवदार, पचण्यास सुलभ, दूध उत्पादन टिकवण्यासाठी व प्रजनन आरोग्याकरिता आवश्‍यक अाहे. खनिजांचे व अ जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असल्यामुळे फायदेशीर व महत्त्वाचा असतो.

म्हशीच्या आहारातील महत्त्वाच्या गोष्टी

 • म्हशींना हिरवा तसेच वाळलेला चारा कुट्टी करून द्यावा. चाऱ्याचे साधारणपणे १ ते १.५ इंच आकाराचे तुकडे करावेत. वाळलेला तसेच हिरवा चारा एकत्र दिल्यास चारा आवडीने खाल्ला जातो. कुट्टी केल्याने चारा वाया जात नाही व पचन सुलभ होते.
 • शक्‍यतो चारा दिवसातून दोन वेळा विभागून द्यावा. म्हशींना सारखा चारा टाकू नये यामुळे रवंथ करण्यास वेळ मिळत नाही.
 • १० लिटर किंवा त्याहून अधिक दूध देणाऱ्या म्हशींना पशुखाद्य हे उत्तम प्रतीचे व त्यामध्ये बायपास प्रथिने असलेले (४० टक्के) वापरावे.
 • एकूण पशुखाद्यामध्ये ६० टक्के रवंथ पोटात विरघळणारे व ४० टक्के रवंथ पोटात न विरघळणारे प्रथिने असलेले पशुखाद्य द्यावे, यामुळे दूध उत्पादन टिकून राहते.
 • १० लिटर व त्याहून अधिक दूध देणाऱ्या म्हशीमध्ये स्निग्ध पदार्थांचा वापर दूध उत्पादनाकरिता व प्रजननाकरिता फायदेशीर असतो.
 • म्हशीच्या आहारामध्ये हिरवा चारा किंवा कडबा उपलब्ध नसेल अशावेळी तंतुमय पदार्थ देणे गरजेचे आहे, अन्यथा पोटामध्ये आम्लता होण्याची शक्‍यता राहते व पचन बिघडते.
 • बहुतांश पशुपालक पशुखाद्य म्हणून म्हशींना सरकी किंवा सरकी ढेप देतात. यामध्ये जास्त प्रथिने असतात, यामुळे ऊर्जा कमी मिळते व दूध उत्पादन कमी होते.

संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला.

 

 

इतर कृषिपूरक
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
पशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
उष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
रेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...
दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...
कृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...
जनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...
पोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...
वासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...
रेबीज रोगाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची...पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज या...
दूध गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजनादुधातील फॅट (स्निग्धांश) व एसएनएफ (स्निग्धेतर...
जनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचनबऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून...
पशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजनाजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण...
योग्य प्रजनन व्यवस्थापनातून वाढवा...दुधाळ जनावरांची योग्य देखभाल व योग्य नियोजन...
दुधातील घटकांवर परिणाम करणारे घटक दुधातील स्निग्ध पदार्थ व एसएनएफ यांच्या...
दुग्धोत्पादन, प्रजननासाठी खनिज मिश्रणेजनावरांना हिरवा अाणि वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात...
टंचाई टाळण्यासाठी चाऱ्याचे नियोजन अावश्...भविष्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध...
योग्य उपचाराने दूर करा मायांग बाहेर...दुधाळ जनावरांतील गायी व म्हशींमध्ये विण्यापूर्वी...