Agriculture story in marathi, management of goat farming | Agrowon

शेळीपालन व्यवसायात कष्ट, जिद्दीबरोबर ठेवा शास्त्रीय दृष्टिकोन
डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

शेळीपालन व्यवसाय अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवून, फसवणूक करून थोडे दिवस करण्यापेक्षा, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून, व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन आयुष्यभरासाठी फायदेशीर करता करता येतो. त्यासाठी गरज अाहे कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची ठेवण्याची.
 

शेळीपालन व्यवसाय अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवून, फसवणूक करून थोडे दिवस करण्यापेक्षा, शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून, व्यवसायातील चढउतार लक्षात घेऊन आयुष्यभरासाठी फायदेशीर करता करता येतो. त्यासाठी गरज अाहे कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची ठेवण्याची.
 
शेळीपालन मुख्य व्यवसाय म्हणून करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यशस्वी शेळीपालन व्यवसायासाठी आवश्यक तेवढी जागरूकता आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कष्ट आणि जिद्दीबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली, तरच या व्यवसायामध्ये आर्थिक यश मिळू शकते. हे लेक्षात ठेवूनच शेळीपालन व्यवसायाला सुरवात करावी.

शेळीपालनातील तंत्र - मंत्र

 • गोठ्याची जागा योग्य निवडली आहे का?, गोठ्याची रचना आवश्‍यकतेनुसार व वातावरणानुसार अाहे का? याची खात्री करावी. आजारी शेळ्या तसेच नवीन खरेदी केलेल्या शेळ्या ठेवण्यासाठी वेगळी जागा आहे का?
 • गोठ्यावरील विविध कामांचे वेळापत्रक अाणि जैविक संवर्धनाची सोय
 • शेळ्यांचे निराक्षण करून त्या कुठल्या रोगांना बळी पडत आहेत का, हे पाहावे व विशेष काळजी किंवा आवश्‍यक बदल करावा.
 • योग्य ठिकाणावरून योग्य वयाच्या शेळ्या आवश्‍यक शारीरिक स्थितीनुसार खरेदी कराव्यात.
 • शेळ्यांची वाहतुकीपूर्वी, दरम्यान व वाहतुकीनंतर योग्य काळजी घ्यावी.
 • गोठ्याची स्वच्छता अाणि प्रजनन व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे.
 • लसीकरण व जंतनिर्मूलन आवश्‍यकतेनुसार करणे अतिशय आवश्‍यक आहे.
 • गोठ्यामध्ये शेळ्या वेगवेगळ्या ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पे व शारीरिक स्थितीनुसार शेळ्यांची विभागणी करावी.
 • दैनंदिन व महिनाभराच्या कामांची यादी करणे आवश्‍यक.
 • नोंदवहीमध्ये रोजच्या नोंदी ठेवणे आवश्‍यक.
 • मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून आजार ओळखावा व इतर शेळ्यांवर त्यानुसार उपचार करावे.
 • वेळोवेळी शेळ्यांमध्ये रक्त, लेंडी या नमुन्यांच्या चाचण्या कराव्या. ज्याचा उपयोग योग्य व्यवस्थापनासाठी होईल.
 • वेगवेगळ्या ऋतुंनुसार व्यवस्थापनात आवश्‍यक बदल करावे.
 • गोठ्याचे आवश्‍यकतेनुसार निर्जंतुकीकरण करावे.
 • प्रथमोपचारानंतर शेळ्या बऱ्या होण्याची वाट बघण्यापेक्षा तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून तपासणी, उपचार व मार्गदर्शन घ्यावे.
 • चारा पिकांची लागवड करून ओला चारा व वाळला चारा व खुराकाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक.
 • शेळ्यांमध्ये योग्य वेळी, योग्य खाद्याची यादी बनविणे. उदाहरणार्थ, गाभण शेळीचा आहार, बोकडाचा आहार इत्यादी.
 • शेळ्यांना स्वच्छ पाणी द्या. शेळ्यांचा चारा गव्हाणीत द्या, जेणेकरून तो वाया जाणार नाही.
 • बोकडांचे विक्रीनियोजन करा व त्यानुसार पैदास करा.
 • शेळीपालन करताना कमीत कमी १० गोठे पाहा व व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण घ्या.
 • निरूपयोगी शेळ्या गोठ्यातून काढून टाका.
 • शेळ्यांचा विमा उतरवा.
 • कमीत कमी किंवा ० टक्के मरतूक अाणि बोकडांमध्ये चांगली वजनवाढ या व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी दोन गोष्टी आवश्‍यक आहेत.
 • शेळ्या जिवंत वजनावर विकणे फायदेशीर.
 • विक्रीनियोजनात स्वतःचे मटणाचे दुकान असल्यास जास्तीत जास्त फायदा.
 • * शेळीच्या मटणाच्या निर्यातीवर लक्ष व भर दिल्यास भरपूर फायदा.
 • दुसऱ्याचा गोठा बघून हुबेहूब कॉपी करण्याचा प्रयत्न न करता आपल्या स्थितीनुसार नियोजन केल्यास जास्त फायदा.
 • स्वतःच्या गोठ्यावर स्वतःचे लक्ष असणे अतिशय आवश्‍यक.
 • सुरवातीस खूप मोठा गोठा व खर्च टाळावा.
 • स्वतःच्या शेळ्यांची विक्री करताना सरळ शेवटच्या ग्राहकांशी व्यवहार केल्यास जास्तीत जास्त फायदा.
 • गोठ्यावर विविध नोंदी ठेवून त्या नोंदींचे वेळोवेळी पृथक्करण करून आवश्‍यक बदल फायद्याचे ठरतात.
 • शेळ्यांपासून दोन पिल्ले मिळावीत व दोन वेतातील अंतर जास्तीत जास्त आठ महिने असावे.
 • शेळीपालनातील नवीन बदल स्वीकारून मग योग्य नियोजन करणे आवश्‍यक.
 • विक्री व्यवस्थापनासाठी आपल्याकडील स्थानिक जत्रांची यादी करून पूर्वनियोजन करून विक्री करावी.
 • शेळ्यांची वंशावळ बघून व जातिवंतपणा बघून पैदास करावी व पैदाशीच्या शेळ्या म्हणून विक्री करावी.
 • एका वेळी २०+१ पेक्षा मोठ्या संख्येने सुरवात केल्यास जास्त अडचणी येतात.
 • रोगाची लागण झाल्यावर उपचारांवर जास्त खर्च करण्यापेक्षा गोठ्यावर रोग येणारच नाही असे व्यवस्थापन करावे.
 • नवीन शेळ्या कमीत कमी २१ दिवस गोठ्यावरील जुन्या शेळ्यांमध्ये मिसळणे टाळावे.
 • व्यवसायाचा मूळ उद्देश लक्षात घेऊन नियोजन करावे.
 • शेळ्यांना आवश्‍यकतेनुसार खनिजमिश्रण द्या.
 • शेळीपालन व्यवसाय हा शून्य खर्च व शून्य देखभाल (Zero maintenance) करून जास्तीत जास्त उत्पन्न पाहिजे असा अट्टहास करू नका.
 • शेळीपालन व्यवसायात नियमित सुधारणेबरोबरच संयम ठेवल्यास यश मिळतेच.
 • शेळीपालनात चुकीचे मार्गदर्शन करू नका. जेणेकरून व्यवसायाची बदनामी होईल.

संपर्क ः डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा )

इतर कृषिपूरक
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
प्रथमोपचाराने बरे होतील जनावरांतील आजारजनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व...
वाढत्या तापमानाचा जनावरांवर होणारा...जनावरांमध्ये दिसून येणाऱ्या उष्मा तणावासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या...जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे...
नियोजन स्वच्छ दूध उत्पादनाचे...दुग्ध व्यवसायात आर्थिक परिस्थिती, शास्त्रोक्त...
अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा...चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची...
संवर्धन खिलार गोवंशाचे...जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी...
शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार,...शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे...
झलक क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...इटली देशात दरवर्षी क्रिमोना आंतरराष्ट्रीय पशू...
जनावरांच्या संतुलित आहार...जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो...
जनावरांच्या आहारात कोरडा चारा वापरताना...महाराष्ट्रातील बहुतांशी भागात फेब्रुवारी ते...
कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबी...कमी जागेत, कमी पाण्यात अळिंबीची लागवड करता येत...
जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल करणे...कोवळा चारा, निकृष्ट दर्जाचा चारा किंवा बुरशीची...
जनावरांतील रोगनिदानासाठी प्रयोगशाळा...तात्काळ रोगनिदान व योग्य उपचार केल्यामुळे औषधांचा...
गाई, म्हशींची दुग्धोत्पादन क्षमता वाढवा...सध्याच्या काळात सेक्स सीमेन किंवा सॉर्डेड सीमेन,...
ओळखा लिस्टेरिओसिस आजाराची लक्षणेजनावरापासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने...
पशुसल्लावाढत्या तापमानात जनावरांच्या आहार...
प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी...सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने...
जनावरांमध्ये प्रसूतीनंतर येणाऱ्या समस्याजनावर गाभण असताना व विताना जर व्यवस्थित लक्ष दिले...
प्रक्रियेमुळे वाढेल ऊस वाढ्याची...वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात...