वेळापत्रकानुसार शेळ्यांच्या गोठ्याचे व्यवस्थापन
डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

वेळापत्रकानुसार शेळ्यांच्या गोठ्याचे व्यवस्थापन

शेळ्यांच्या चांगल्या अारोग्यासाठी गोठ्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे अावश्यक असते. अाजारी शेळ्या अोळखणे, गाभण शेळ्या, नवजात करडे अाणि पैदाशीच्या बोकाडाचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते.
 
शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन वेळापत्रक

१) सकाळी ७.०० (उन्हाळ्यात)

 • आजारी जनावरांची पाहणी व त्यांना वेगळे करावे.
 • शेळ्यांना मुख्य गोठ्यातून गोठ्याशेजारच्या मोकळ्या जागेत सोडावे.

२) सकाळी ८.०० (हिवाळा)

वेळापत्रकानुसार शेळ्यांच्या गोठ्याचे व्यवस्थापन

शेळ्यांच्या चांगल्या अारोग्यासाठी गोठ्याचे योग्य व्यवस्थापन ठेवणे अावश्यक असते. अाजारी शेळ्या अोळखणे, गाभण शेळ्या, नवजात करडे अाणि पैदाशीच्या बोकाडाचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते.
 
शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापन वेळापत्रक

१) सकाळी ७.०० (उन्हाळ्यात)

 • आजारी जनावरांची पाहणी व त्यांना वेगळे करावे.
 • शेळ्यांना मुख्य गोठ्यातून गोठ्याशेजारच्या मोकळ्या जागेत सोडावे.

२) सकाळी ८.०० (हिवाळा)

 • शेळ्यांना गोठ्याबाहेर सोडल्यावर पिण्यासाठी पाण्याची सोय करावी.
 • ज्या शेळ्या गाभण, विलेल्या असतील तसेच विक्रीसाठी तयार केले जाणाऱ्या बोकडांना दिवसाच्या एकूण खुराकापैकी अर्धा खुराक द्यावा.

३) सकाळी ८.३०

 • सर्व शेळ्यांना ओला चारा, वाळला चारा त्यांच्या वजनानुसार व शारीरिक स्थितीनुसार द्यावा.
 • गोठा झाडून स्वच्छ करून घ्यावा.
 • झाडल्यानंतर सर्व खत एकत्र करून त्याची योग्य साठवण करावी.

४) सकाळी ९.००  

 • पैदाशीचा नर माजावर अालेल्या माद्यांबरोबर सोडावा.
 • दूध देणाऱ्या माद्या गोठ्यात तशाच ठेवाव्या व त्यांच्या करडांना पिण्यासाठी एकत्र सोडावे.

५) सकाळी ९.०० ते दुपारी ३.००

या काळात रोजची वेगवेगळी कामे, जसे की लसीकरण, केस कापणे, शिंगकळी कापणे, करडांची नोंदणी करून कानाला बिल्ला मारणे, फार्मवरच्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या नोंदी करणे, खच्चीकरण, ट्रेनिंग, जनावरांचे डिपिंग करणे, जंतनिर्मूलन, निवड व विनाउपयोगी जनावरे कळपातून काढणे व इतर व्यवस्थापनातील महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात.

६) सायं ४.०० ते ७.००

 • शेळ्या बाहेरून परत एकदा गोठ्यात आणाव्यात.
 • सर्व शेळ्यांना ओला चारा, वाळला चारा त्यांच्या वजनानुसार व शारीरिक स्थितीनुसार द्यावा.
 • ज्या शेळ्या गाभण, विलेल्या असतील तसेच विक्रीसाठी जे बोकड तयार करत असतो, त्यांना दिवसाच्या एकूण खुराकापैकी अर्धा खुराक द्यावा.
 • शेळ्यांना स्वच्छ पाणी द्यावे.

७) रात्री ७.०० ते ९.००  

 • ज्या शेळ्या दूध देतात, त्यांचे आपल्या सोयीच्या वेळेनुसार दूध काढावे.
 • फार्मवर दिवे लावून शेळ्या शांत व निवांत बसतील अशी सोय करावी.

८) रात्री १०.३०
    आवश्‍यक असल्यास शेळ्यांना थोडासा चारा द्यावा.

शेळ्यांचे वर्षभराचे व्यवस्थापन वेळापत्रक
१) जानेवारी व फेब्रुवारी  

 • गाभण शेळ्यांना चार-सहा आठवडे अगोदर खुराक वाढवावा.
 • विण्याअगोदर दोन-तीन आठवडे गाभण शेळ्यांचे जंतनिर्मूलन करावे. एक वर्ष वयाच्या नर करडांचे पशुवैद्यकाकडून खच्चीकरण करावे.
 • शेळी विण्याच्या नोंदी, करडांची स्वच्छता, नाळ कापणे, जन्मतःचे वजन करणे, नवजात पिल्लांना चीक पाजवणे.
 • विलेल्या शेळ्यांना दुधासाठी खनिजमिश्रण व खुराकाची मात्रा वाढवणे.

२) मार्च व एप्रिल

 • चार आठवड्यांच्या पिलांचे आंत्रविषार व टिटॅनसचे लसीकरण करावे.
 • चार ते सहा आठवड्यांच्या पिलांना कानाला बिल्ले मारावेत.
 • विलेल्या शेळीला विल्यानंतर चार आठवडे खुराक सुरू ठेवावा.
 • करडे शेळीच्या मागे फिरायला लागल्यावर (चरणे सुरू केल्यावर) त्यांचे जंतनिर्मूलन करावे.

३) मे व जून

 • कमी उत्पादन देणाऱ्या व प्रजननाचे विकार असलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात. (एकूण संख्येच्या २० टक्के).त्यांच्या जागी नवीन जातिवंत व चांगल्या शेळ्या निवडाव्यात.
 • नवीन पैदाशीचे बोकड निवडावेत.
 • शेळ्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींवर लक्ष ठेवावे.
 • शेळ्यांच्या प्रजननाची व पैदाशीची तयारी करावी.

४) जुलै व ऑगस्ट

 • शरीरावरील परजीवींच्या वाढीकडे लक्ष द्यावे.
 • नवीन करडांचे जंतनिर्मूलन करावे व सर्व शेळ्यांचे आंत्रविषार, पीपीआर, टिटॅनससाठी लसीकरण करून घ्यावे.
 • पैदासक्षम शेळ्यांना खुराक वाढवा.
 • पैदाशीच्या बोकडांची पैदाशीसाठी तयारी करावी. जर एका वेळी शेळ्यांना गाभ घालवायचे असेल तर माज ओळखण्यासाठी माज ओळखणारा बोकड (Teaser Buck) गोठ्यात ठेवावा.

५) सप्टेंबर व ऑक्‍टोबर  

 • माज ओळखणारा बोकड गोठ्यापासून वेगळा व दूर ठेवावा.
 • पैदाशीच्या योग्य नोंदी ठेवाव्यात.
 • पैदाशीच्या माद्यांमध्ये परजीवींचे प्रमाण तपासावे व आवश्‍यकतेनुसार जंतनिर्मूलन करावे.
 • शेळ्यांचे वाढलेले खूर कापून घ्यावेत.

६) नोव्हेंबर व डिसेंबर

 • पैदाशीचे बोकड शेळ्यांपासून वेगळे ठेवावेत.
 • विणाऱ्या शेळ्यांसाठी गोठ्यात स्वतंत्र व्यवस्था करावी.
 • गाभण जनावरांचा आहार व आरोग्यावर लक्ष ठेवावे.

संपर्क : डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

इतर कृषिपूरक
पैदाशीच्या वळूचे आहार व्यवस्थापनप्रजोत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूंच्या...
सुधारित यंत्रामुळे वाढेल उत्पादनांची...वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन आपल्या...
गाय-वासराच्या संगोपनातील महत्त्वाच्या...भारत हा कृषिप्रधान देश असून, पशुसंवर्धन हे...
जनावरांतील जखमांवर वेळेवर उपचार...जनावरांना काही कारणास्तव जखमा होतात. या जखमांमुळे...
सुदृढ, निरोगी जनावरांसाठी व्यवस्थापनात...दुग्धव्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर जनावरांच्या...
प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजांसाठी अंडे...आपल्या रोजच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे...
स्वच्छता राखा, अन्नविषबाधा रोखाजैव रासायनिक प्रक्रियेमुळे फळे व भाजीपाल्याची...
कोथिंबीर लागवडीबाबत माहितीकोथिंबिरीची लागवड आपल्याकडे सर्व प्रकारच्या...
योग्य वयात करा बोकडाचे खच्चीकरणशेळीपालन व्यवसायात जे बोकड पैदाशीसाठी वापरायचे...
पौष्टिक, लुसलुशीत चाऱ्यासाठी पेरा ओटओट पिकाचा पाला हिरवागार, पौष्टिक व लुसलुशीत असतो...
मानसिक अारोग्यासाठीही मधमाशीचे महत्वविविध अवजारांवरील आयुर्वेदिक उपचारांमध्ये मधाचा...
खाद्यातील बुरशीमुळे कोंबड्यांना होऊ...कोंबड्यांतील मरतुकीच्या अनेक कारणांपैकी बुरशीमुळे...
अाजारापासून वाचवा निरोगी जनावरांनाजनावरांमध्ये विविध प्रकारचे जिवाणूजन्य,...
सुधारित पद्धतीने गूळ उत्पादन कसे करावे? ऊसतोडणीनंतर ६ ते १२ तासांच्या आत उसाचे गाळप...
अाजार टाळण्यासाठी लसीकरणाची वेळ...कोणताही रोग झाल्यावर लागणाऱ्या खर्चाच्या पटीत...
सोयाबीन, हळदीच्या फ्यूचर्स भावात वाढगेल्या सप्ताहात हळद वगळता सर्वच पिकांचे भाव उतरले...
निरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रसभारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा...
वेळापत्रकानुसार शेळ्यांच्या गोठ्याचे...वेळापत्रकानुसार शेळ्यांच्या गोठ्याचे व्यवस्थापन...
मधमाश्यांची कार्यपद्धतीपोळ्यातील राणीमाशीने अंडी दिल्यानंतर त्यातून...
वेळीच रोखा दुधाळ जनावरांतील कासदाह अाजारकासदाह हा अाजार दुधाळ जनावरांतील कासेचा प्रमुख...