Agriculture story in Marathi, management of livestock feed | Agrowon

बुरशी टाळण्यासाठी करा खाद्याची तपासणी
धर्मेंदर भल्ला, डॉ. शांताराम गायकवाड
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

बुरशीयुक्त खाद्य जनावरांना दिल्यामुळे, अफ्लाटाॅक्सिनच्या सततच्या आहारात येण्याने जनावरे आजाराला बळी पडतात, त्यांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जनावराचे दूध उत्पादन घटते व दुधाची गुणवत्ता घसरते. त्यामुळे खाद्यातील बुरशीचा प्रादुर्भाव अोळखण्यासाठी खाद्याची तपासणी करणे अावश्‍यक अाहे.
 

बुरशीयुक्त खाद्य जनावरांना दिल्यामुळे, अफ्लाटाॅक्सिनच्या सततच्या आहारात येण्याने जनावरे आजाराला बळी पडतात, त्यांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो. जनावराचे दूध उत्पादन घटते व दुधाची गुणवत्ता घसरते. त्यामुळे खाद्यातील बुरशीचा प्रादुर्भाव अोळखण्यासाठी खाद्याची तपासणी करणे अावश्‍यक अाहे.
 
जनावरांना बुरशीयुक्त चारा खायला दिल्यामुळे बऱ्याच प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. घातक विषारी पदार्थांचे अंश दुधात येऊन असे दूध सेवन करणाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. बुरशीपासून तयार होणारे अफ्लाटाॅक्सिन हे जनावराच्या तसेच मानवी आरोग्याससुद्धा घातक आहे.

जनावरांच्या खाद्यातील बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी...

१. खाद्याची तपासणी
जनावरांचा हिरवा चारा, सुका चारा व पशुखाद्य देण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे तपासणी करावी.

२. अोला चारा

 • जनावरांना दररोज ताजा अोला चारा द्यावा. परंतु बऱ्याच वेळेस नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे असे करणे शक्य होत नाही.
 • चारा साठवताना तो उभा करून ठेवावा जेणे करून चाऱ्यामध्ये हवा खेळती राहील. चाऱ्यामध्ये उष्णता निर्माण होऊन त्यामुळे बुरशी होणार नाही.

३. सुका चारा

 • सुका चारा साठविताना तो पूर्णपणे सुकलेला असावा.
 • पावसाळ्यात सुका चारा भिजू नये म्हणून ज्या प्रमाणे वरून चारा झाकला जातो त्या प्रमाणे बाजूंनीसुद्धा चारा झाकावा.

४. मका भरडा व पेंडी

 • मका स्वस्त असल्याने बरेच पशुपालक मक्याचा भरडा जनावरांना खायला देतात.
 • मका साठविताना तो व्यवस्थित वाळला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. चांगल्या गुणवत्तेच्या पेंडीचा वापर करावा. पेंडीचा साठवणूक कोरड्या जागी करावी.

५. पशुखाद्य

 • पशुखाद्यातील अफ्लाटाॅक्सिनचे प्रमाण पुरवठादाराकडून पशुखाद्य खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्यावे.
 • पशुखाद्यातील अफ्लाटाॅक्सिनचे प्रमाण दिलेल्या (३० पीपीबी) प्रमाणापेक्षा जास्त असून, नये याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

६. बुरशीयुक्त बार्ली

 • काही किण्वन प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यामध्ये बार्ली किंवा स्टार्च किण्वन प्रक्रियेतून तयार होणारे उप-पदार्थ बऱ्याच प्रमाणात जनावरांना आहार म्हणून वापरले जातात.
 • हा आहार देताना तो योग्य वेळेत व ताजा असतानाच देणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच वेळेस हा आहार जनावरांना ताजा दिला जात नाही. असा अाहार २-३ दिवसांनी कधी कधी तर ८ दिवसांनी सुद्धा दिला जातो. त्यामुळे या खाद्यावर पांढऱ्या बुरशीचा थर जमा होतो.
 • असा आहार जनावरांना देणे हे अत्यंत अपायकारक असू शकते. अश्या आहारातून विषबाधा होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते.
 • बार्लीमुळे जरी जनावरांचे काही अंशी दुध वाढले किंवा आहारावरील खर्च कमी होत असला तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.
 • अाहारात सतत बुरशीयुक्त बार्लीचा वापर केल्यामुळे जनावराच्या पोटात जास्त प्रमाणात अफ्लाटोक्सीन जाते. त्यामुळे जनावराची उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता व आरोग्यावर घातक परिणाम होतात.

७. खाद्याची साठवण

 • पशुखाद्य साठविताना त्याचा जमिनीला संपर्क येईल असे न ठेवता फळ्या किंवा पेलेटस वर ठेवावे.
 • पशुखाद्य भिंतीला चिटकून न ठेवता हवा खेळती राहण्यासाठी भिंतीपासून अर्धा ते एक फूट अंतरावर ठेवावे. जेणेकरून भिंतीतील दमटपणा पशुखाद्यास न लागल्यामुळे बुरशीची वाढ टाळली जाईल.

७. टाॅक्सिन बाइंडरचा वापर

 • बऱ्याच वेळेस काळजी घेऊनसुद्धा किंवा बुरशी दिसत नसल्यामुळे अफ्लाटाॅक्सिनचा काही भाग हा जनावराच्या पोटात जाण्याची शक्यता असते, यासाठी आपण टाॅक्सिन बाइंडरचा वापर करू शकतो.
 • वेगवेगळ्या प्रकारचे बाइंडर आहारातून आलेल्या अफ्लाटाॅक्सिनला बाइंड करून (बांधून) शेणातून बाहेर टाकण्यास मदत करतात.
 • टोक्सिन बाइंडरचे वेगवेगळे प्रकार असून, काही पशुखाद्य कंपन्या त्यांच्या पशुखाद्यात नियमितपणे ऋतुमानानुसार किंवा अफ्लाटाॅक्सिनच्या प्रमाणानुसार टाॅक्सिन बाइंडर घालत असतात. त्यामुळे जनावरांना आवश्यक मात्रा ही पाशुखाद्यातूनच मिळते.
 • ज्या ठिकाणी असे पशुखाद्य देणे शक्य नाही, त्या वेळी ठराविक मात्रा त्या जनावराच्या आहारात म्हणजे पशुआहार, पाणी किंवा पिठाचा गोळा करून त्यातून देता येते.

संपर्क ःधर्मेंदर भल्ला, ०२१६६ - २२१३०२
(गोविंद मिल्क ॲँड मिल्क प्रोडक्ट्स, फलटण, जि. सातारा)

 

इतर कृषिपूरक
पशु सल्ला खरेदी केलेल्या जनावराची प्रदर्शनासाठी किंवा इतर...
शेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्वपैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड...
गाभण गाई, म्हशींची काळजी घ्यागायीचा गाभण काळ ९ महिने ९ दिवस आणि म्हशीचा गाभण...
आर्थिक नुकसान टाळण्याकरिता काढा...आधुनिक म्हैसपालन करताना भविष्यासाठी मोठी रक्‍कम...
उन्हाळ्यात जपा शेळ्यांनाउन्हाळ्यात शेळ्यांना पोषणतत्त्वांच्याअभावी बरेचसे...
डोंगरावर फुलविले एकात्मिक शेतीचे आदर्श...खिंगर (ता. महाबळेश्‍वर, जि. सातारा) गावातील...
जाणून घ्या मत्स्यबीज निर्मितीचे तंत्रमत्स्यशेतीच्या वाढत्या प्रमाणामुळे मत्स्यबीजांची...
दारोकार भावंडाचा कुक्कुटपालन...छोटीशी सुरवातदेखील मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू...
पंजाबमधील पशुपालकांचा सुधारित तंत्रावर...पंजाबमधील पशुपालक गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी...
शंभरहून अधिक देशी गायींचे संगोपननाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यापासून सहा...
आधुनिक म्हैसपालनाकरिता लागणारी उपकरणेआधुनिक म्हैसपालनामध्ये नवीन अद्ययावत...
लेअर पक्ष्यांतील अंडी उत्पादन घटण्याची...पक्ष्यांच्या निरीक्षणातून अाजार अाणि शारीरिक...
सुधारित तंत्रातून पंजाबची दुग्ध...पंजाबमधील पशुपालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
मका वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात सोयाबीन व हरभरा पिकाच्या भावात...
जनावरांचे आगीपासून करा संरक्षणअागीची झळ बसलेली जनावरे पूर्णपणे बरी होण्यासाठी...
चाराटंचाईमध्ये म्हशींना द्या मूरघासउन्हाळ्यातील चाराटंचाईमध्ये म्हशींना पोषक चारा...
वाढत्या तापमानात जनावरांची घ्या काळजीवाढत्या तापमानात जनावरासाठी छत तयार करून सावलीची...
थायलेरियोसीस, बबेसियोसीस रोगाकडे...गोचीड बबेसियोसीस, थायलेरियोसीस या रोगांचा प्रसार...
जनावरांतील पोटफुगीची कारणे अन् उपायजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड...
पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...