नियोजन रब्बी हंगामाचे : करडई, जिरायती गहू

करडईची सुधारित तंत्राने लागवड करावी.
करडईची सुधारित तंत्राने लागवड करावी.

करडई

  • जमीन ः मध्यम ते भारी (खोल) जमीन निवडावी. ४५ सें. मी. पेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. शेतात पाणी साठवून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो.
  • जाती : काटेरी जाती ः भीमा, फुले-कुसुमा, फुले करडई - ७३३, एस. एस. एस. ७०८ बिगर काटेरी जाती ः नारी - ६, नारी एन. एच. १.
  •   पेरणी वेळ ः पेरणी योग्य वेळी करणे महत्त्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबर पहिला पंधरवड्यात) केल्यास पिकाचे पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तर उशिरा पेरणी केल्यास (आॅक्टोबरचा दुसरा आठवडा) पीक वाढीची अवस्था थंडीच्या काळात आल्याने माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आॅक्टोंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करून घ्यावी. बागायती करडईची पेरणी आॅक्टोबर अखेरपर्यंत करावी.
  • पेरणी अंतर : कोरडवाहू क्षेत्रात करडईची पेरणी ४५ x २० सें.मी. अंतरावर करावी. त्यासाठी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते.
  • बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझीम २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. म्हणजे उगवणीनंतर करडईचे पीक बुरशीजन्य रोगापासून सुरक्षित राहिल. त्यानंतर अॅझोटोबॅक्टर अथवा अॅझोस्पीरीलम २५ ग्रॅम अधिक २५ ग्रॅम पी. एस. बी. प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते.
  • खत व्यवस्थापन ः हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे. पेरणीकरते वेळी दोन गोण्या युरिया व तीन गोण्या सिंगल सुपर फाॅस्फेट प्रति हेक्टरी दोन चाडयाच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती करडईस अडीच गोणी युरिया व साडेतीन गोण्या सिंगल सुपर फाॅस्फेट द्यावे.
  • जिरायती गहू

  • जाती जिरायती : पंचवटी (एनआयडीडब्लू - १५), शरद (एनआयएडब्लू - २९९७-१६) जिरायती व मर्यादित सिंचनाची व्यवस्था : नेत्रावती (एनआयएडब्लू - १४१५)
  • पेरणीची वेळ : ऑक्टोबरचा दुसरा आठवडा
  • पेरणीचे अंतर : २२.५ से.मी.
  • बियाणे : ७५ ते १०० किलो प्रति हेक्टरी
  • बीजप्रक्रिया : प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा+१.२५ ग्रॅम कार्बेन्डॅझिम(७५ डब्लूपी) व २५ ग्रॅम अॅझोटोबॅक्टर व २५ ग्रॅम पीएसबी.
  • खते : ४० किलो नत्र((८७ कि. युरिया) आणि २० किलो स्फुरद (१२५ किलो एसएसपी)
  • डाॅ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com